04/09/2026
पुणे महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 'सर्पदंश व्यवस्थापन' प्रशिक्षण संपन्न
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मेट्रोपॉलिटन सव्हिलन्स युनिटच्या (MSU) वतीने २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता 'सर्पदंश व्यवस्थापन' या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा जुना जी.बी. हॉल, पुणे महानगरपालिका येथे संपन्न झाली. याप्रसंगी १५,००० हून अधिक सर्पदंश रुग्णांना जीवदान देणारे सुप्रसिद्ध तज्ज्ञ मा. डॉ. सदानंद राऊत यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. सर्पदंश हा टाळता येण्यासारखा, शेती संदर्भात होणारा गंभीर अपघात असून तातडीने योग्य उपचार मिळाल्यास विषारी सर्पदंश झालेला गंभीर रुग्ण वाचू शकतो, असे प्रतिपादन जागतिक सर्पदंशतज्ज्ञ व राष्ट्रीय सर्पदंश तांत्रिक सल्लागार समितीचे मा. सदस्य डॉ. सदानंद राऊत यांनी केले.
या प्रशिक्षणामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्पदंश रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता येतील असा विश्वास मा. डॉ. वैशाली जाधव ऑफिसर इन्चार्ज एमएसयू तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी व्यक्त केला. या प्रशिक्षण कार्यशाळेस महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी आणि एमएसयू स्टाफ असे एकूण ११८ जण उपस्थित होते.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवा. PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
https://fxurl.co/PMCCARE