शिव उद्योग सहकार सेना महासंघ - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • Home
  • शिव उद्योग सहकार सेना महासंघ - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

शिव उद्योग सहकार सेना महासंघ - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्योजक, व्यवसायिक आणि कामगार वर्ग यांना एकत्र आणून
सहकारातून उद्योगवाढ व समाजाची समृद्धी करणे

 #लड़ेंगे_जीतेंगे! ✅
21/07/2026

#लड़ेंगे_जीतेंगे! ✅

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे!देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, भविष्...
16/07/2026

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे!

देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, भविष्याचा आणि घटनात्मक हक्कांचा प्रश्न आज गंभीर बनला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक शांततामय मार्गाने संघर्ष करत आहेत.

या विषयावर आंबेडकरी युवक अभिजीत दिपके आणि त्यांच्या युवा सहकाऱ्यांनी सुरू केलेली जनजागृती आज देशभरात आवाज बनत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, संविधानिक हक्कांचा आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाचा हा लढा आता प्रत्येक जागरूक भारतीयाचा लढा बनला आहे. या तरुणांच्या पुढाकाराचे मनापासून कौतुक आणि त्यांना सलाम!

जे व्यक्तिमत्त्व देशासाठी संशोधन करते, सैन्यदलासाठी काम करते, पर्यावरण आणि शिक्षणासाठी आयुष्य वाहते, त्या व्यक्तीला आपल्या मागण्या मांडण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो, ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी शिक्षण मंत्रालयावर येते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रश्नाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी आमची स्पष्ट मागणी आहे.

केंद्र सरकारने तातडीने सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा. लोकशाहीमध्ये संघर्षाचे उत्तर दडपशाही नसून संवाद असतो.

देशातील सर्व प्रसारमाध्यमांनी, सामाजिक संघटनांनी, विद्यार्थी संघटनांनी आणि जागरूक नागरिकांनी या विषयाला प्राधान्य द्यावे. हा कोणत्याही एका व्यक्तीचा प्रश्न नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.

India
Maharashtra
Information Bureau (PIB)
माझा Marathi @लोकमत @सकाळ Times Lokmat

– प्रशांत तुळवे
जिल्हा अध्यक्ष
शिव उद्योग सहकार सेना महासंघ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

*अखिल भारतीय शिवउद्योग - सहकार सेना महासंघाच्या उप विभाग अध्यक्ष (वर्सोवा विधान सभा) पदी  श्री साजिद गफ्फार भगवानी**दिना...
14/06/2026

*अखिल भारतीय शिवउद्योग - सहकार सेना महासंघाच्या उप विभाग अध्यक्ष (वर्सोवा विधान सभा) पदी श्री साजिद गफ्फार भगवानी*

*दिनांक: १३ जून २०२६*

*आज रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित अखिल भारतीय शिवउद्योग - सहकार सेना महासंघाच्या वर्सोवा विधानसभा उप विभाग अध्यक्ष पदी श्री साजिद गफ्फार भगवानी यांची निवड/नियुक्ती करण्यात आली आहे*.

*महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवभक्त हर्षद नेगिनहाळ यांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री उदय भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष श्री एहतेशाम पेनवाला व सरचिटणीस श्री सतीश नायर याच्या सहकार्याने श्री साजिद गफ्फार भगवानी यांच्या सक्रिय कार्याची दखल घेउन उप विभाग अध्यक्ष पदी निवड/नियुक्ती करण्यात आली आहे*

*शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्सोवा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान व लोकप्रिय आमदार श्री हरून खान यांचे शुभहस्ते महासंघाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले असून श्री हारून खान यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघाचे सक्रिय कार्य करणार असल्याचे मत श्री भागनानी यांनी व्यक्त केले*

 #अखिल_भारतीय_शिव_उद्योग_सहकार_सेना  #महासंघ – सदस्य नोंदणीPUNE DISTRICT PRESIDENTAll India Shiv Udyog Sahakaar Sena Fed...
09/05/2026

#अखिल_भारतीय_शिव_उद्योग_सहकार_सेना #महासंघ – सदस्य नोंदणी
PUNE DISTRICT PRESIDENT
All India Shiv Udyog Sahakaar Sena Federation चे अधिकृत सदस्य होण्यासाठी कृपया खालील Virtual Collection Account (VCA) वर ₹1000/- सदस्य नोंदणी शुल्क जमा करावे.
Account Details:
VCA Name: ALL INDIA SHIV UDYOG SAHAKAAR SENA FEDERATION
Bank Name: AXIS BANK LIMITED
Branch: CENTRALISED COLLECTION HUB
IFSC Code: UTIB0CCH274 (0 = Zero)
VCA No: 9262PNA99227381741423
पेमेंट केल्यानंतर कृपया खालील प्रक्रिया पूर्ण करा:
1️⃣ I-Card साठी Passport Size फोटो अपलोड करा
2️⃣ पेमेंटचा Screenshot सेव्ह करा
3️⃣ खालील लिंकवर फॉर्म भरून Screenshot अपलोड करा
🔗 https://puneaisussf.netlify.app/
महत्वाची सूचना:
पेमेंटचा Screenshot अपलोड करणे अनिवार्य आहे. Screenshot शिवाय सदस्य नोंदणी पूर्ण होणार नाही.
धन्यवाद 🙏
अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ

विनम्र अभिवादन!
07/05/2026

विनम्र अभिवादन!

Address

411001, Pune, MH, India

411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिव उद्योग सहकार सेना महासंघ - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share