03/09/2026
घुलेवस्ती येथील कल्पतरू सोसायटीला भेट देऊन सोसायटीच्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येची पाहणी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून सोसायटीतील ओला कचरा विघटन करणारी मशीन बंद असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांना मशीन तातडीने सुरू करून ओल्या कचऱ्याचे सोसायटी स्तरावरच विघटन करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच सध्या साचलेला कचरा तात्काळ उचलून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
नागरिकांचे आरोग्य आणि परिसराची स्वच्छता हीच प्राथमिकता!