02/01/2026
महंमदवाडी चौक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित गावकी–भावकी बैठकीत आज मोठ्या उत्साहात उपस्थित राहण्याचा मान मिळाला. स्थानिक नागरिक, वरिष्ठ मान्यवर आणि ग्रामस्थ यांच्यासोबत विविध विकासकामांवर, प्रभागातील गरजा, पुढील योजना आणि सर्वसमावेशक प्रगती यावर मनमोकळा संवाद साधला.
बैठकीदरम्यान नागरिकांनी दाखवलेले प्रेम, आपुलकी आणि ठाम विश्वास मनाला नवी ऊर्जा देणारे आहे. प्रत्येकाच्या नजरेतून दिसणारा अपेक्षांचा प्रकाश आणि साथ देण्याची तयारी यामुळे लढण्याचे बळ आणखी वाढले आहे.
आपल्या पाठिंब्यामुळेच प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकहिताचे निर्णय अधिक वेगाने, अधिक प्रभावीपणे पुढे नेता येतील—याची खात्री मिळाली.
आपल्या विश्वासासाठी मनःपूर्वक आभार…
आपण सोबत आहात, हीच खरी ताकद आहे!