Global Vision Foundation

Global Vision Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Global Vision Foundation, Social service, Pune.

Global Vision Foundation is a NGO (Non Governmental Organisation) working for social cause and active in conducting free health check up camps, mainly eye check up in urban slum and rural tribal areas since it started in 2006.

दृष्टीचा छुपा चोर : काचबिंदूडोळ्याने पाहिलेली दृश्य माहिती ऑप्टिक नर्व्हद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचत असते. डोळ्यातील ...
28/02/2022

दृष्टीचा छुपा चोर : काचबिंदू

डोळ्याने पाहिलेली दृश्य माहिती ऑप्टिक नर्व्हद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचत असते. डोळ्यातील अतिरिक्त द्रवामुळे डोळ्याचा दाब वाढतो व ऑप्टिक नर्वला हानी पोहोचते. यालाच काचबिंदू बोलले जाते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 6 ते 12 मार्च 2022 दरम्यान जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा केला जात आहे.

यनिमित्त ग्लोबल आय हॉस्पिटल, पिंपळे सौदागर येथे 1 ते 31 मार्च महिनाभर मोफत काचबिंदू निदान शिबीर आयोजित केले आहे.

काचबिंदू हा अंधत्वाच्या महत्वाच्या करणापैकी एक आहे. काचबिंदू मुळे गेलेली नजर शक्यतो परत येत नाही. वेळीच उपचार न केल्यास काचबिंदूमुळे हमखास अंधत्व येऊ शकते. त्यामुळे काचबिंदू होऊ नये आणि झाल्यास डोळ्याला जास्त इजा होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

वेळोवेळी नेत्रतज्ञाकडून तपासणी केल्यास आणि काचबिंदूचे लवकर निदान झाल्यास येणारे अंधत्व टाळता येऊ शकते.

जगामध्ये जवळपास 8 कोटी लोक काचबिंदूचे रुग्ण आहेत. विशेष म्हणजे यापैकी निम्म्या लोकांना आपल्याला काचबिंदू हा विकार आहे हेच माहित नसते. विकसनशील देशात हे प्रमाण अजून जास्त असण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे काचबिंदूची लक्षणे सुरवातीला दिसत नाहीत.

वय वाढण्यासोबत तसेच घरामध्ये कोणाला काचबिंदू असल्यास काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. मधुमेह, रक्तदाब इ आजार असणाऱ्या व्यक्तिमध्ये देखील काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते.

डोळ्याचा दाब तपासण्यासाठी टोनो मेट्री तसेच दृष्टी नष्ट होतेय का पाहण्यासाठी पेरिमेट्री या तपासण्या केल्या जातात, ज्या ग्लोबल आय मध्ये उपलब्ध आहेत.

जागतिक काचबिंदू सप्ताह हे काचबिंदूकडे लक्ष वेधण्यासाठी उचललेलं एक पाऊल आहे. लोकांनी वेळेवर डोळे तपासणी करून आपल्याला काचबिंदू आहे की नाही याची जाणीव करून घ्यावी. लवकर निदान लवकर उपचार केल्यास भविष्यामध्ये येणारे अंधत्व टाळता येऊ शकते.

डॉ बबन डोळस
वरिष्ठ नेत्रतज्ञ
ग्लोबल आय, पिंपळे सौदागर
नित्यसेवा हॉस्पिटल, सांगवी
8800668455

Free eye check up camp at Pimpri today.
16/02/2022

Free eye check up camp at Pimpri today.

Happy to be part of this noble cause... Cyclothon for awareness to increase Eye Donation
23/09/2020

Happy to be part of this noble cause... Cyclothon for awareness to increase Eye Donation

Pledge to donate eyes compaign continues नेत्रदानाचा संकल्प करा आणि मोफत नेत्र तपासणी करा
13/09/2020

Pledge to donate eyes compaign continues
नेत्रदानाचा संकल्प करा आणि मोफत नेत्र तपासणी करा

06/09/2020

Address

Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Global Vision Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Global Vision Foundation:

Share

Category