MANGO speaker आमचा आवाज

MANGO speaker आमचा आवाज Mango Speaker is dedicated to spreading messages of humanity, kindness, and compassion In a world

03/09/2026

लाखो ट्रकचालक दिवसरात्र महामार्गावरून धावतात आणि जीवनावश्यक साधन सामुग्री, औद्योगिक साहित्य व सर्व प्रकारचा माल औषधे इंधन देशाच्या काना कोपऱ्यात पोहोचविण्याचे काम अव्याहतपणे करत असतात भारताच्या गतिशील अर्थव्यवस्थेची गती या चालकांच्या हातातील स्टिअरिंग मध्येच आहे यामुळे या ट्रक ड्रायवर क्लिनर या दुर्लक्षित घटकांचा विचार सरकार कडून झाला पाहिजे यांना रस्त्यावर येणाऱ्या खालील समस्यांच समाधान केलं गेल पाहिजे
• ठिकठिकाणी शुद्ध थंड पाणी पिण्यासाठी पाणपोई
• ठिकठिकाणी स्वच्छ शौचालय स्नानगृह व्यवस्था
• ठिकठिकाणी CCTV सुसज्ज असलेली सुरक्षित पार्किंग व विश्रांती व्यवस्था
• ठिकठिकाणी अल्पदरात उत्तम जेवण देणारी सरकारी भोजनगृहे
• NHAI मार्फत फक्त या ट्रकर्स करता कोणता अपघाताचा किंवा चोरीचा लूटमारीचा प्रसंग त्यांच्यावर ओढवल्यास जलद मदत कृती दल व त्यांचा विनाशुल्क दूरध्वनी क्रमांक दिला जावा

अजूनही काही सुचवायचे असेल तर कॉमेंट मध्ये सुचवावे

#आमचाआवाज



24/08/2026

#महाराष्ट्रातकावडयात्रा
ापाईप्रवास!!
#आमचाआवाज

#वाईतेलोणीभापकरपाईप्रवास
#तीर्थयात्रा

Social Media News सुद्धा प्रभावी असते याची अनुभूती आली  ...भद्रेश्वर पूल वाई अनेक महिने अपूर्ण असणारे सिमेंटिकरन काम तात...
18/08/2026

Social Media News सुद्धा प्रभावी असते याची अनुभूती आली ...भद्रेश्वर पूल वाई अनेक महिने अपूर्ण असणारे सिमेंटिकरन काम तातडीने पूर्ण झाले..
यासोबतच वाई स्टँड ते पसरणी घाट हे सुद्धा काम पूर्ण केले गेले आहे आता ट्रॅफिक जाम मधून लोकांनी पर्यटकांनी मोकळा श्वास घेतला आहे...कंत्राटदारांचे आभार व अभिनंदन 👍🙏💐

15/08/2026

😭





15/08/2026
13/08/2026

PWD MSIDC आणि MTDC यांना विनंती जरा लक्ष घाला.. सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर रस्ता शासनाकडून दुर्लक्षित प्रवाशांचे व पर्यटकांचे हाल विडीओ माध्यमातून सविस्तर ग्राउंड रिपोर्ट देण्याचा प्रयत्न आहे , पाहून महामहीम शासनाने कृपया लक्ष घालावे आणि जसा सातारा ते मेधा केलघर महाबळेश्वर रस्ता आपण उत्तम दर्जाचा बनवला आहे तसाच हा देखील बनवावा .

13/08/2026

पाचगणी नगर परिषदेस प्रश्न ' प्रवासी कर घेता मग शहरातले अंतर्गत रस्ते खड्ड्यात का ?

भरमसाठ पर्यटन कर वसूल केला जातो पर्यटकांकडून मग त्यांना सुस्थितीत असलेले रस्ते देणे पालिकेची जबाबदारी नाहीका ? अगदी नाही पण पडलेले खड्डे दर तीन दिवसांत भरणे हे तरी करता येऊ शकते , 08 ऑगस्ट 2026 रोजी अगदी पर्यटन कर वसुली बूथ जवळच असलेले खड्डे नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत तरी आज 13 ऑगस्ट पर्यंत कोणतीही डागडुजी झालेली दिसली नाही .

#आमचाआवाज
#पाचगणीटोलनाका
#पाचगणीरस्ते

#महाबळेश्वर
#महाबळेश्वररस्ते



व्हिडिओ८ऑगस्ट२०२६

05/08/2026

MSRTC कडून त्वरित कार्यवाही अपेक्षित !

आज सकाळी सातारहून ST लालपरी बसणे पुण्याला जात असताना निदर्शनास आलेली गोष्ट तिकीटींग मशिन मध्ये महत्वाचे बस थांबे add केलेलेच नाहीत ज्यामुळे विनाकारण प्रवाशांना जास्त पैसे द्यावे लागतात , कात्रज सारखा महत्वाचा बस थांबा बऱ्याच बसेसच्या तिकीटींग मशीनमध्ये नाही, येनार व जाणार प्रवाशांना स्वारगेटचे तिकीट दिले जाते यामुळे 25 रुपये प्रत्येक तिकिटामागे प्रवाशांकडून लुटले जात आहेत , हजारो प्रवासी रोज प्रवास करतात लाखो रुपयांची हि अवैध वसुली थांबली जावी , संपूर्ण महाराष्ट्र भरातले असे अनेक महत्वाचे बस थांबे जिथे प्रवासी जास्ती संख्येने चढउतार करतात ते या मशिन मध्ये किमान तिकीट दरासह सहभागी केले जावोत उगाचच पुढच्या थांब्यांचे तिकीट हातावर टेकवू नये हि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सामान्य प्रवाशांकडून विनंती व आदेश !!


"आम"चा आवाज ऐका
Mango speaker 📢

Address

Sr1, Runwal , Karve Nagar
Pune
411052

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MANGO speaker आमचा आवाज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category