22/01/2026
सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे अंतर्गत पिंपळवाडी येथे “शेळी लसीकरण शिबिर” यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश शेळीपालन करणाऱ्या शेतकरी कुटुंबांमध्ये जनावरांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच PPR (पेस्ट दे पेतित्स रुमिनंट्स) या घातक आजारापासून शेळ्यांचे संरक्षण करणे हा होता.
या शिबिरात एकूण 18 कुटुंबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, 95 शेळ्यांना PPR लस देण्यात आली. लसीकरणामुळे शेळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असून, आजारामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येणार आहे. यामुळे शेळीपालन व्यवसाय अधिक सुरक्षित व उत्पन्नवाढीस सहाय्यक ठरणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. शुभम पाटील यांचे मौल्यवान सहकार्य लाभले. त्यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्यासोबतच उपस्थित शेतकऱ्यांना शेळीपालन, रोगप्रतिबंधक उपाययोजना व लसीकरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुधन आरोग्य सुधारण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जात असून, याचा थेट लाभ शेतकरी व ग्रामीण कुटुंबांना होत आहे. या उपक्रमाबद्दल सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व भविष्यात अशा उपक्रमांची मागणी केली.
सर्व सहभागी कुटुंबे, सहकार्य करणारे तज्ञ व आयोजकांचे मनःपूर्वक आभार.
Join us in the movement of rural development - Gramoday.
#सेवा सहयोग फाउंडेशन
#ग्रामोदय_प्रकल्प
#भूजल अभियान
#भूजल दिंडी प्रमुख
#शेळी_लसीकरण
PPR_लस
पशुधन_आरोग्य
ग्रामीण_विकास
पिंपळवाडी
शेळीपालन
शेतकरी_सशक्तीकरण