01/08/2026
राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या सामरिक क्षमतेला बळकटी देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदानाचा गौरव म्हणून लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने प्रदान करण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील आणि जबाबदारीच्या भूमिकेत राहून श्री. अजित डोवाल यांनी दिलेले नेतृत्व, त्यांची दूरदृष्टी, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठ सेवा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणजे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेप्रती असलेल्या समर्पणाचा गौरव होय.
या गौरवपूर्ण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राष्ट्रीय सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रत्येक सुरक्षा दलातील अधिकारी, जवान आणि राष्ट्रसेवकांना हा सन्मान प्रेरणा देणारा आहे.
प्रतिष्ठेच्या 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार'ाबद्दल श्री. अजित डोवाल यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!