Diksha Nikhil Tarawade

Diksha Nikhil Tarawade महादेववाडी-उंड्री प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध.!

घुले व कटके  परिवारातील चि. श्रवण आणि चि.सौ.का. तनुजा यांच्या साखरपुडा समारंभास नक्षत्र मंगल कार्यालय, भिवरी पुणे येथे उ...
13/09/2026

घुले व कटके परिवारातील चि. श्रवण आणि चि.सौ.का. तनुजा यांच्या साखरपुडा समारंभास नक्षत्र मंगल कार्यालय, भिवरी पुणे येथे उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. दोघांच्या भावी आयुष्यास प्रेम, आनंद, सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!

29/08/2026
प्रभाग क्रमांक ४१ मधील भव्य दहीहंडी उत्सव २०२६! शिवछत्रपती तरुण मंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भव्य Reel...
25/08/2026

प्रभाग क्रमांक ४१ मधील भव्य दहीहंडी उत्सव २०२६!

शिवछत्रपती तरुण मंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भव्य Reels स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे!

तुमची Reel बनवा, तुमची क्रिएटिव्हिटी आणि टॅलेंट दाखवा आणि जिंका iPhone 17 Pro!

या दहीहंडीच्या जल्लोषात तुमची Reelही गाजली पाहिजे!

प्रभाग क्रमांक ४१ मधील सर्वात मोठी दहीहंडी येतेय… काय मग, तयार आहात ना?शिवछत्रपती तरुण मंडळ व नगरसेवक अतुलदादा नारायण तर...
25/08/2026

प्रभाग क्रमांक ४१ मधील सर्वात मोठी दहीहंडी येतेय… काय मग, तयार आहात ना?

शिवछत्रपती तरुण मंडळ व नगरसेवक अतुलदादा नारायण तरवडे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६!

यंदाच्या उत्सवात सिनेअभिनेत्री हृता दुर्गुळे, प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांची विशेष उपस्थिती, तसेच सेलिब्रिटी अँकर आर.जे. अक्षय यांच्या दमदार सूत्रसंचालनाने उत्सवाची रंगत आणखी वाढणार!

DJ Music | आकर्षक विद्युत रोषणाई
विजेत्या गोविंदा पथकासाठी तब्बल ₹७,७७,७७८/- चे भव्य पारितोषिक!
Social Media Creators साठी भव्य Reels स्पर्धा — जिंका iPhone 17 Pro!

हा फक्त उत्सव नाही…
हा आहे आपल्या एकजुटीचा, उत्साहाचा आणि संस्कृतीच्या अभिमानाचा जल्लोष!

📅 शनिवार, ५ सप्टेंबर २०२६
⏰ सायंकाळी ६:३० वाजता
📍 तरवडे वस्ती, पोलीस स्टेशनसमोर, डी.पी. रोड

नक्की या… आम्ही वाट पाहतोय!
गोविंदा गोपाळा… गोविंदा गोपाळा! 🚩

📍 मनपा प्राथमिक शाळा, पिसोळी व उंड्रीस्वातंत्र्य दिनानिमित्त मनपा प्राथमिक शाळा, पिसोळी व उंड्री येथे आयोजित ध्वजारोहण स...
15/08/2026

📍 मनपा प्राथमिक शाळा, पिसोळी व उंड्री

स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपा प्राथमिक शाळा, पिसोळी व उंड्री येथे आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून राष्ट्रध्वजास अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्र...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन'..!
८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

01/08/2026

साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ, महादेववाडी यांच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहिले.

यावेळी लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांसमवेत त्यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक समता, स्वाभिमान आणि मानवतेचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

19/07/2026

आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी मतदार यादी विशेष सखोल पडताळणी (SIR) प्रक्रियेत सहभागी व्हा.

३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) आपल्या घरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. त्यांनी दिलेला Enumeration Form आवश्यक कागदपत्रांसह वेळेत भरून जमा करा आणि त्यांना पूर्ण सहकार्य करा.

जर आपले नाव २००२ च्या मतदार यादीत असेल, तर आवश्यक मॅपिंग करून प्रक्रिया पूर्ण करा. इतर सर्व पात्र मतदारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या कुटुंबीय, नातेवाईक व परिसरातील प्रत्येक मतदारापर्यंत नक्की पोहोचवा.

19/07/2026

महिलांसाठी आनंदाचा एक अविस्मरणीय क्षण!

नगरसेवक श्री. अतुलदादा नारायण तरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. दिक्षा निखिल तरवडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 41 मधील महिला भगिनींसाठी ‘तुला पाहता‘ चित्रपटाच्या विशेष मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते.

दैनंदिन जबाबदाऱ्या आणि धावपळीच्या जीवनातून काही क्षण स्वतःसाठी मिळावेत, मनाला विरंगुळा मिळावा आणि चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diksha Nikhil Tarawade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category