Assistant Director Other Backward Bahujan Welfare Pune

  • Home
  • India
  • Pune
  • Assistant Director Other Backward Bahujan Welfare Pune

Assistant Director Other Backward Bahujan Welfare Pune Assistant Director Other Backward Bahujan Welfare Pune

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे तर्फे शासकीय वसतीगृहाचे सन २०२५-२०२६ साठीचे प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक.
03/09/2025

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे तर्फे
शासकीय वसतीगृहाचे सन २०२५-२०२६ साठीचे प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक.

*‘भटके विमुक्त दिवस' कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती*पुणे: ३१ ऑगस्ट २०२५ रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महा...
01/09/2025

*‘भटके विमुक्त दिवस' कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती*
पुणे: ३१ ऑगस्ट २०२५ रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे मॉडर्न कॉलेज, डेक्कन येथे 'भटके विमुक्त दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विभागाचे विविध अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम भटके विमुक्त समाजाला सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री. लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून या समाजाच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, "कुत्र्या-मांजरासाठी मोर्चे निघतात, पण या 'क्रिमिनल' जातींसाठी साधी माणुसकी दाखवली जात नाही." त्यांनी या समाजाला संविधानांतर्गत न्याय देण्याची आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेट तयार करण्याची मागणी केली.
या प्रसंगी इतर मागास विभागाचे सहसंचालक श्री. हराळे साहेब, प्रादेशिक उपसंचालक श्री. खुशाल गायकवाड साहेब, सहायक संचालक श्री. प्रदीप संकपाळ साहेब, यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
कार्यक्रमात मा. भरत विटकर आणि माजी शिक्षण संचालक श्री. पवार साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षण आणि रोजगाराचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे होते. हा कार्यक्रम भटके विमुक्त समाजाच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

30/08/2025

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे आयोजित जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे आयोजित भटके विमुक्त दिवस.
29/08/2025

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे आयोजित भटके विमुक्त दिवस.

शासकीय वसतीगृह असलेल्या जिल्ह्यांसाठी सन २०२५-२६ साठी वसतीगृह, पंडीत दीनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार ...
29/08/2025

शासकीय वसतीगृह असलेल्या जिल्ह्यांसाठी सन २०२५-२६ साठी वसतीगृह, पंडीत दीनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार यासाठी अर्ज करण्यचे वेळापत्रक खालीलप्रमाणे....

27/08/2025

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त कै. रामराव गेणुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय मुखई येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा...

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त इंदापूर आश्रमशाळेत जिल्...
27/08/2025

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त इंदापूर आश्रमशाळेत जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा...

27/08/2025

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे आयोजित
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

26/08/2025

इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे अंतर्गत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सोमवारी (दि.२५) करण्यात आले होते.

26/08/2025
राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटके जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसति...
23/08/2025

राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटके जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्यक्ष स्वयंम योजना अंतर्गत वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात विद्यार्थ्यांची मागणी झाल्याने सदर प्रवेश प्रक्रिया सुलभतेने सोडविण्याच्या दृष्टीने मुदतवाढ देण्यात येत आहे. तत्संबंधी दि.३०.१०.२०१५ चे परिपत्रक देण्यात आलेले निर्देश सदर वेळापत्रकासाठी लागू राहतील, याची नोंद घेण्यात यावी.

Address

Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan, Vishrantwadi Road, Yerwada
Pune
411006

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Assistant Director Other Backward Bahujan Welfare Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share