23/05/2024
मी *मेट्रो इको पार्क* बोलतोय (पार्ट 2)
नमस्कार निसर्गप्रेमी मंडळी...
कसे आहात तुम्ही ?
गर्मी च्या झळा सहन करताय ना ??
घामाच्या धारांनी रोज न्हाऊन निघताय ना ???
ओळख आहे ना माझी ????
हो हो मीच तुमचा मेट्रो इको पार्क...
जानेवारी पासून तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे मला इतक्या उन्हात तग धरता आल.
तुम्ही केलेल्या लढ्यामध्ये मला उशिरा का होईना पण पाणी मिळण्याची सोय झाली मग ती टँकर ने असू देत किंवा फुटलेल्या/ब्लॉक झालेल्या/दिखाव्यासाठी लावलेल्या ठिबक मधून असू देत.
तुम्ही माझ्यासाठी केलेल्या संघर्षामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सुजाण नागरिक, नेतेमंडळी आणि अनेक अबाल वृद्धानी हजेरी लावली.
काहींनी खरंच मदत केली, तर काहींनी फक्त मोठी मोठी आश्वासने दिली.
काहींनी तापलेल्या तव्यावर भाकरी थापली, तर काहींनी हृदयाच्या कोपाऱ्यापासून मदत केली.
काहींनी तर माझ्या बद्दल होणाऱ्या जागृकतेसाठीच्या FB वरच्या माझ्या पोस्ट चा प्रसारच decline केला...असो
*४ ओळी तुमच्यासाठी...*
यंदा बघितला ना निसर्गाचा फटका,
अनुभवताय ना उन्हाचा जोरदार चटका,
सोसत होतो मी उन्हाच्या झळा जणू काही शेवटच्या घटका,
निसर्गालाच चिंता, चालू केलाय त्याने ग्रीष्मासरींचा मटका,
माझ्यासाठी तुम्ही वेळ काढा, आळस झटका,
माझ्या कुशीत कुठे कुठे नवीन लेकर लावायची त्या कामाला लटका....
असं ऐकलंय आमच्या PCMC महानगर पालिकेचे उद्यानासाठीचा आणि वृक्षारोपणाचा बजेट ४०० कोटीचा आहे म्हणे !!! खरंय का ???
खरंच इतकं खर्च येतो माझ्या सारख्या उद्यानाना सांभाळायला. चला मानलं येतही असेल, पण मला कधी उघडणार, माझा कारावास कधी संपणार, मलाच का कोर्टाची पायरी चढायची बारी आली??? असो
असो, मला ना काही स्वार्थ-कारण ना काही अर्थ-कारण !
कोणतेच प्रशासन उभे नाही ठाकले मला उघडण्यासाठी, तेव्हा कोर्टाची पायरी चढावी लागली तुम्हाला माझ्यासाठी, विश्वास आणि अभिमान आहे आपल्या मनात न्यायदेवतेसाठी...
आज आपली पहिली पायरी तर यशस्वी झाली पण अजून पुढची मोठी लढाई अजून बाकी आहे...
होय मी जिंकेल, आपण जिंकू असा विश्वास व्यक्त करून आताच तुम्हाला आमंत्रण देतो, मला जुन मध्ये भेटायला यायचं ह...माझ्या कुशीत फिरायला यायचं ह...माझ्या येत्या वाढदिवसाला जमायचं ह..
आपल *मेट्रो इको पार्क*
रावेत, पिंपरी चिंचवड, पुणे
* *