11/02/2026
दिनांक: 10/02/2026
वार: मंगळवार
स्थळ: रामपाडा
🌼 पोषण आहार कार्यक्रम अहवाल 🌼
आज रामपाडा येथे 'पोषण आहार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत महिलांना पौष्टिक आणि चविष्ट अशा पावटा भात, पालक भजी आणि मुळ्याचा पराठा या रेसिपींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
कार्यक्रमाचा तपशील:
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:30 वाजता झाली. सर्वप्रथम उपस्थित महिलांना आज बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची माहिती देऊन त्यातील पोषणमूल्ये समजावून सांगण्यात आली. त्यानंतर रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची सविस्तर ओळख करून देण्यात आली.
पाककृती व कृती:
१. पावटा भात: यामध्ये पावट्याचे दाणे (वाल), टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि विविध खमंग मसाल्यांचा वापर करून पौष्टिक भात तयार करण्यात आला.
२. पालक भजी: ताज्या पालकाची पाने, बेसन पीठ, जिरे, चवीनुसार मीठ आणि मसाले वापरून कुरकुरीत भजी बनवण्यात आली.
३. मुळ्याचा पराठा: किसलेला मुळा, हळद, गरम मसाला, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ यांचे सारण भरून खमंग पराठे तयार करण्यात आले.
सर्व महिलांनी एकत्रितपणे स्वयंपाकाचा आनंद घेतला. पदार्थ तयार झाल्यानंतर सर्व उपस्थित महिलांनी एकत्र बसून भोजनाचा आस्वाद घेतला.
उपस्थित महिला = 12
लेखन - दर्शना उंबरकर, समन्वयक, महिला सक्षमीकरण व बाल विकास, सेवा सहयोग फाऊंडेशन.
www.sevasahayog.org | [email protected] | +91 85510 44285