23/08/2026
🚔 म्हसवड पोलीस स्टेशन
दिनांक २२/८/२०२६ रोजी शिंगणापुर चौक, म्हसवड येथे विशेष नाकाबंदी मोहिमेचे आयोजन करून बेशिस्त वाहनचालक तसेच कॉलेज व एसटी स्टँड परिसरातील रोड रोमिओ यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात आली. 🚨
मोटार वाहन कायद्यान्वये एकूण ८० केसेस करून ₹५६,०००/- दंड वसूल करण्यात आला. 💰
तसेच १० वाहनांचे कर्कश आवाजाचे सायलन्सर व ६ प्रेशर हॉर्न जप्त करून उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. 👮♂️🔊
माननीय श्री निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा, माननीय श्रीमती वैशाली कडकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, माननीय रणजित सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पोमण, प्रभारी अधिकारी, म्हसवड पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस अंमलदार पोपट चव्हाण, युवराज खाडे, राहुल थोरात व पोलीस अंमलदार प्रकाश इंदलकर, विकास ओंबासे, संतोष काळे यांनी सदरची कारवाई केली आहे. 👮♂️👏
🚔 पुसेगाव पोलीस ठाणे
दिनांक २९/०७/२०२६ रोजी विसापूर फाटा व शिवाजी चौक, पुसेगाव येथे विशेष नाकाबंदी मोहिमेचे आयोजन करून रस्त्यावर बेशिस्त वाहनचालक आणि फटाके वाजविणारे रोड रोमिओ यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. 🚨
एकूण ६७ केसेस करून ₹४८,०००/- दंड वसूल करण्यात आला. 💰
तसेच ६ वाहनांचे कर्कश आवाजाचे सायलेन्सर व ६ प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या रोड रोमिओंना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सायलेन्सर व प्रेशर हॉर्न जप्त करून उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. 🔊🚫
मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा, मा. श्रीमती वैशाली कडकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा. श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. जनार्दन पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक शेख अलीशेर, वाहतूक पोलीस अंमलदार संतोष बागल, बापूराव नद्रे, राहुल जायभाय, अविनाश घाडगे यांनी सदरची कारवाई केली आहे. 👮♂️👏
🚦 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच!
🛑 वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित प्रवास करा!