Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार

  • Home
  • India
  • Pune
  • Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार

Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार गाव तिथे वाचनालय, संगणक साक्षरता अभियान,सायकल बँक चळवळ व युवा कल्याण उपक्रम राबविणारी चळवळ

गांव तिथे वाचनालय,शाळा तिथे ग्रंथालय,संगणक साक्षरता अभियान,सायकल बँक, युवा कल्याण विषयक उपक्रम राबवीणारी युवा चळवळ

शहादा तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील अनाथ,निराधार, एकलपालक (आई किंवा वडील/दोन्हीचा मृत्यू)असलेली बालके,कर्करोग,एच.आय. व्ह...
11/07/2026

शहादा तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील अनाथ,निराधार, एकलपालक (आई किंवा वडील/दोन्हीचा मृत्यू)असलेली बालके,कर्करोग,एच.आय. व्ही आजाराने ग्रस्त पालकांची बालके, कोरोना काळात निधन झालेल्या पालकांची बालके,विधवा विधुर,घटस्फोटीत पालकांची बालके ज्यांचे वय 0 ते 18 दरम्यान आहे अशा बालकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

-o ते 18 वर्ष वयोगटातील एक पालक असलेली( एका पालकाचा मृत्यू,घटस्फोट,पालक विभक्तीकरण,अविवाहित मातृत्व,गंभीर आजार इ.कारणामुळे कुटुंब विघटित झालेली बालके),आई वडील नसलेली, कुष्ठरोग, HIV, कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त पालकांची मुले, जन्मठेेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची मुले,भिक्षा मागणारी बालके,40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली,अंध, दिव्यांग बालके,तीव्र कुपोषित,दुर्धर आजार असलेली,दोन्ही पालक दीव्यांग असलेली बालके तसेच कोविड सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने दोन्ही / एक पालक गमावलेली बालके तसेच अनाथ, निराश्रित,दुर्धर व काळजी संरक्षणाची गरज असलेल्या o ते 18 वर्ष वयोगटातील मुलं मुलींना पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरण ऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे यासाठी शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना लागू केली आहे. या योजने अंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ,निराधार बालकांचे संगोपन करणाऱ्या कुटुंबीयास मात्र वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रु.पेक्षा कमी असलेल्या पालकांचे बालक 18 वर्ष वयाचे होईपर्यंत प्रतीमाह 2250/- रू. दरमहा मदत देण्यात येते.
तरी शहादा तालुक्यातील o ते 18 वर्ष वयोगटातील एक पालक असलेली,वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेल्या पालकांनी
1) बालकांचे आधार कार्ड,8 पासपोर्ट साईज फोटो
2) आई /वडील/ आजी/आजोबा/ पालक यांचे आधार कार्ड,8 पासपोर्ट साईज फोटो
3)आई/वडील यांचा मृत्यू दाखला/घटस्फोटीत असल्याचे प्रमाणपत्र
4) बालकाचा जन्मदाखला/ शाळेचे बोनाफाईड
5) पालकांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असावे)
6) पोलिस पाटील/ सरपंच/ ग्रामसेवक यांचा रहिवाशी दाखला
7) पालकांचे /बालकांचे बँक खाते पासबुक प्रत (बँक खाते आधार सीडिंग करून ठेवावे)
8) राहत्या घरासमोरील पालक व बालक यांचा एकत्रित फोटो( 4 बाय 6 चे 2 फोटो)
9) पालक / बालक दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वचे प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रांच्या 2 - 2 प्रती झेरॉक्स इ.कागदपत्रे तयार ठेवावीत व 9529125396 या क्रमांकावर संपर्क करावा.संस्थेचे कर्मचारी घरी येऊन प्रस्ताव तयार करून देतील व मंजूर करून आणतील.

संपर्क - 9529125396
युवकमित्र परिवार संस्था कोठली ता.शहादा संचलीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना कोठली तालुका शहादा

सदर प्रस्ताव निःशुल्क तयार होणार असून मंजुरीसुद्धा मिळवण्यात येणार आहे.पूर्ण प्रक्रिया मोफत आहे.

संपर्क मो.9529125396
प्रवीण महाजन,संस्थापक युवकमित्र परीवार संस्था कोठली तालुका शहादा
ईमेल - [email protected]

संकेतस्थळ - www.yuvakmitra.org

जाहिरात - युवकमित्र संस्थेच्या विविध शासनमान्य प्रकल्पासाठी MSW पात्रताधारक उमेदवार पाहिजेत.
28/06/2026

जाहिरात - युवकमित्र संस्थेच्या विविध शासनमान्य प्रकल्पासाठी MSW पात्रताधारक उमेदवार पाहिजेत.

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन व शैक्षणिक साहित्य वाटपयुवकमित्र परिवार कोठली ता.शहादा संचलीत क्रांतिज्योती सावित्रीबाई ...
26/06/2026

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन व शैक्षणिक साहित्य वाटप

युवकमित्र परिवार कोठली ता.शहादा संचलीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना कार्यालयामार्फत राजर्षी शाहू महाराज यांना त्यांची जयंती तसेच सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.तसेच बालसंगोपन योजनेच्या काही लाभार्थी बालकांना शैक्षणिक साहित्य तसेच भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविका वाटप करण्यात आल्या.
गटसाधन केंद्र शहादा याठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती वनिता पटले हे होते तर उमेद अभियानाच्या भारती वाडीले तसेच दीपाली बावा,ज्योती भील, रुबीनाबी खाटिक, मंदा रामराजे,अजय रामराजे हे उपस्थित होते.यावेळी संविधान प्रचारक तथा बालसंगोपन योजनेच्या कार्यकर्त्या अश्विनी गिरी यांनी उपस्थितांना भारतीय संविधान आणि मार्गदर्शक तत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.आभार दीपाली बावा यांनी मानले.

EPPS School SP office Area नंदुरबार या इंग्रजी माध्यम शाळेत कॉम्प्युटर लॅब उदघाटन  व शाळा प्रवेशोस्तव उत्सव साठी प्रमुख ...
19/06/2026

EPPS School SP office Area नंदुरबार या इंग्रजी माध्यम शाळेत कॉम्प्युटर लॅब उदघाटन व शाळा प्रवेशोस्तव उत्सव साठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री.मधुकर माळी साहेब,माजी पंचायत समिती सभापती कमलेशदादा महाले,पत्रकार तथा शिरीषकुमार मित्र मंडळाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे साहेब,प्राचार्य,शिक्षक वृंद उपस्थित होते.संगणक लॅब स्थापन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना AI आधारित संगणक शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

- प्रवीण, रा.कोठली

युवकमित्र च्या महिला सबलीकरण उपक्रम अंतर्गत.....
15/06/2026

युवकमित्र च्या महिला सबलीकरण उपक्रम अंतर्गत.....

11/06/2026
युवकमित्र आयोजित मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर,कोठली तालुका शहादा
10/06/2026

युवकमित्र आयोजित
मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर,कोठली तालुका शहादा

08/06/2026

Address

At Kothali Post Kukawal Tal Shahada
Pune
425423

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार:

Shortcuts

Share