Amol Dhanraj Kendre

Amol Dhanraj Kendre धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष

SRPF जवानांच्या जिल्हा बदलीचा कोटा 20% करण्याची मागणी.....पहिले खाकी, मग बाकी…!SRPF जवानांच्या जिल्हा बदलीचा कोटा २० टक्...
03/09/2026

SRPF जवानांच्या जिल्हा बदलीचा कोटा 20% करण्याची मागणी.....

पहिले खाकी, मग बाकी…!
SRPF जवानांच्या जिल्हा बदलीचा कोटा २० टक्के करण्याची मागणी; तसेच २०२५/२०२६ DG Loan प्रकरणेही तातडीने निकाली काढण्याची मागणी.
SRPF जवानांच्या जिल्हा बदलीचा सध्याचा १० टक्के कोटा वाढवून किमान २० टक्के करावा, तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या सन २०२५-२६ मधील प्रलंबित DG Loan प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
SRPF जवानांना दंगल, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती तसेच नक्षलग्रस्त भागात दिवस-रात्र कर्तव्य बजावताना अनेकदा वर्षानुवर्षे कुटुंबापासून दूर राहावे लागते. या दीर्घकाळाच्या कौटुंबिक दुराव्यामुळे निर्माण होणारा मानसिक ताण, कौटुंबिक अडचणी आणि काही जवानांकडून घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे.
यासाठी जिल्हा बदलीचा कोटा २० टक्के करून जवानांना कुटुंबाजवळ राहण्याची संधी वाढवावी, तसेच जवानांसाठी समुपदेशन व मानसिक आधाराची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन देण्यात आले. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून कार्यवाहीच्या सूचना दिल्या, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही सकारात्मक भूमिका घेतली.
“जवानाने राज्याच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावले; आता शासनानेही जवानांच्या कुटुंबासाठी एक पाऊल पुढे यावे,” अशी भूमिका धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे यांनी व्यक्त केली.
लवकरच सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांची महाराष्ट्र पोलिस महासंचालक सदानंद दाते साहेबांच्या सोबत बैठक होणार असून मागण्या बाबत सकारात्मात चर्चा होईल अशी आशा आहे.
जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत धडाकेबाज युवा प्रतिष्ठान आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार पोलिस परिवार प्रतिष्ठान माध्यमातून अमोल धनराज केंद्रे आणि मनोज बोढरे आणि टीम लढा सुरूच ठेवणार आहेत.
— धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष : अमोल धनराज केंद्रे
मो नंबर 8652155328

राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..
01/09/2026

राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..

Happy birthday 🎂
31/07/2026

Happy birthday 🎂

दिवा शहरातून सिंगापूर जाण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने रस्ता बनवण्याचे काम गेल्या 10 वर्षा पासून चालू आहे.त्यामुळे दिवा श...
30/07/2026

दिवा शहरातून सिंगापूर जाण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने रस्ता बनवण्याचे काम गेल्या 10 वर्षा पासून चालू आहे.त्यामुळे दिवा शहरातील विकासाला प्राधान्य मिळाले आहे.ठाणे महानगर पालिका प्रशासनास याबाबत रस्त्यातील गटार अवॉर्ड देऊन सन्मानित करायला हवे...
#आमचनेता #पॉवरफुल #ठाणे #महानगर #पालिका #ठाण्याची #शिवसेना #साहेबांचीशिवसेना # #

आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्तृत्ववान, अभ्यासू आणि पोलिसांप्रती आत्मीयता जपणाऱ्या नेतृत्वाचा... मा. सुधीरभाऊ...
30/07/2026

आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्तृत्ववान, अभ्यासू आणि पोलिसांप्रती आत्मीयता जपणाऱ्या नेतृत्वाचा... मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस!

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मला अनेक किस्स्यांपैकी एक अनुभव सांगावासा वाटतो...

DG Loan चा तब्बल तीन वर्षे रखडलेला सुमारे ₹1700 कोटींचा प्रश्न सोडविताना भाऊंची महाराष्ट्र पोलिसांप्रती असलेली आपुलकी मी अत्यंत जवळून अनुभवली आहे.

मंत्री असूनही स्वतःहून फोन करून,
"अरे मनोज, काय झालं? कुठपर्यंत आली आपली DG लोनची फाईल? "
अशी विचारपूस करणारे नेते मंडळी आजच्या काळात फारच दुर्मिळ आहेत. तो त्यांचा केवळ फोन नव्हता, तर महाराष्ट्र पोलिसांच्या वेदना समजून घेणाऱ्या एका संवेदनशील नेतृत्वाची जाणीव होती.

तीन वर्षांपासून रखडलेला हा महत्त्वाचा विषय भाऊंनी अवघ्या सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मार्गी लावला. हजारो पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळवून देण्यात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

म्हणूनच आज अनेक महाराष्ट्र पोलीस कर्मचारी त्यांचा उल्लेख प्रेमाने...

"पोलीसहृदयसम्राट, पोलिसांचे दैवत, पोलिसांचे कैवारी"

असा करतात.

मा. सुधीरभाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेची अखंड ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Sudhir Mungantiwar Office of Sudhir Mungantiwar

29/07/2026
HAPPY BIRTHDAY AK BOSS......
26/07/2026

HAPPY BIRTHDAY AK BOSS......

महाराष्ट्र राज्याच्या मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
26/07/2026

महाराष्ट्र राज्याच्या मंत्री नामदार पंकजाताई मुंडे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Address

Thane

Telephone

+918652155328

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Dhanraj Kendre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share