07/10/2026
सृष्टीतील काव्य शब्दबद्ध करणारे, आधुनिक मराठी कवितेचे उदयबिंदू कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
संतकाव्य आणि पंतकाव्याच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन मराठी कवितेला नवे विषय, नवे विचार आणि आधुनिकतेची नवी दिशा देणारे केशवसुत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जातात. त्यांच्या काव्याने मराठी साहित्याला नवी वाट दाखवली आणि अनेक कवींना प्रेरणा दिली.
#केशवसुत #कृष्णाजी_केशव_दामले