Maharashtra Rajya Koshti Samaj Seva Mandal

Maharashtra Rajya Koshti Samaj Seva Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra Rajya Koshti Samaj Seva Mandal, Social service, Thane.

29/01/2026

स्टॉल ला नक्की भेट द्या ....
01/02/2026

20/01/2026

चला अहिल्यानगर 😍😍😍
एक वेगळा अनुभव घेण्यासाठी अवश्य भेट द्या .
दि. १ फेब्रुवारी २०२६ , सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत .

📢📢 *उठा उठा दिवाळी आली, किल्ला ⛰️बनवायची वेळ झाली* 😁🥳 *महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज मंडळाला* *गणेशोत्सव* आणि *नवरात्री उ...
15/10/2025

📢📢 *उठा उठा दिवाळी आली, किल्ला ⛰️बनवायची वेळ झाली* 😁🥳

*महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज मंडळाला* *गणेशोत्सव* आणि *नवरात्री उत्सवामध्ये* मिळालेल्या उदंड🔥प्रतिसादानंतर यंदाच्या सर्वांच्या आवडीच्या दिवाळी उत्सवामध्ये आम्ही घेऊन येत आहोत अजून एक उपक्रम
👉🏻 **किल्ले बांधणी स्पर्धा* ⛰️

सर्व कोष्टी समाज परिवारातील सदस्यांनी 👬👬👭आपण स्वतः बनवलेल्या किल्ल्यासोबतचा फोटो📷 आणि किल्ल्याचा डिटेल व्हिडीओ तुमच्या पूर्ण नाव, किल्ल्याचे नाव आणि संपूर्ण पत्तासहित खालीलपैकी कोणत्याही एका नंबरवर पाठवावा📩.👇🏻

*हर्षदा वाडेकर - 7757951063*
*सोनाली चिचे - 7248989630*

⏰ व्हिडिओ पाठवण्याची *अंतिम तारीख २६ ऑक्टोबर* आहे, त्यानंतर आलेले नावे ग्राह्य धरले जाणार नाही.
❌ *नोट- कोणीही ग्रुपवर व्हिडिओ टाकू नये.*

⛰️ *किल्ले बांधणी स्पर्धेसाठी नियमावली*
१.या स्पर्धेसाठी वयाचे कुठलेही बंधन नाही.
२.किल्ल्याला नाव हवे आणि किल्ल्याची प्रतिकृती खऱ्या किल्ल्याची ओळख देणारी असावी
३.किल्ला बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तु नैसर्गिक, पर्यावरण पूरक असाव्यात.
४.कृतिम वस्तूचा वापर टाळावा किंवा कमीत कमी वापर करावा (स्पर्धेचा नंबर काढताना याचा विचार करण्यात येईल)
५.किल्ला बनवण्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तूंची यादी पाठवणे अनिवार्य आहे.
६.किल्ल्यासोबतचा फोटो📷 आणि पूर्ण किल्ल्याचा डिटेल व्हिडीओ तुमच्या पूर्ण नाव, किल्ल्याचे नाव आणि संपूर्ण पत्तासहित पाठवावा.
७.बनवलेल्या किल्ल्याची थोडक्यात माहिती सांगावी.
८.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

या स्पर्धेच्या माध्यमातून *फक्त वरील नियमांचा विचार करून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि एक उत्तेजनार्थ बक्षीस😎* काढण्यात येईल आणि आपल्या मंडळाचा जो पुढील कार्यक्रम होईल त्यावेळेस बक्षीस देण्यात येईल.

*बक्षीसाचे स्वरूप- प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह*

*किल्ले बांधणी* उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रातून घेत आहोत त्यामागचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की लहान मुलांना गड किल्ल्याची / इतिहासाची माहिती व्हावी. दिवाळीच्या सुट्टीमध्ये लहान मुले मोबाईल सोडून आपल्या मातीशी एकरूप 🤝व्हावी. 🙏🏻

तसेच या *उपक्रमासाठी जर कोणाला स्पॉन्सरशिप द्यायची असेल तर त्या व्यवसायिकांचे किंवा उद्योजकांचे स्वागतच आहे.🙏🏻* त्यासाठी त्यांनी खालील सभासदांकडे संपर्क साधावा.
*चारुशीला मंचरकर - 9819300407*
*स्वाती राशीनकर - 9011135668*
*स्नेहल फलटणे- 9604730894*
*निलेश घोडके - 8149351012*

*🙏🏻धन्यवाद🙏🏻*

26/09/2025

*🙏🏻नमस्कार कोष्टी समाज परिवार 🙏🏻*

*महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज मंडळाने* गणेशोत्सवामध्ये राबवलेल्या🛕 *गणपती आणि गौरी सजावट* स्पर्धेला मिळालेल्या आपल्या सर्वांच्या उदंड🔥 प्रतिसादानंतर यंदाच्या नवरात्री उत्सवामध्ये आम्ही घेऊन येत आहोत अजून एक उपक्रम
👉🏻 *जागर स्त्रीशक्तीचा- भजन/भक्तीगीत गायन स्पर्धा*🎤🪗

सर्व कोष्टी समाज परिवाराने आपल्या भजनाचा/अभंगाचा किंवा भावगीत/भक्तीगीताचा व्हिडीओ तुमच्या पूर्ण नाव / ग्रुपचे नाव आणि पत्तासहित खालीलपैकी कोणत्याही एका नंबरवर पाठवावा.👇🏻

*हर्षदा वाडेकर -7757951063*
*दिपाली खराडे- 7219751139*

⏰ व्हिडिओ पाठवण्याची *अंतिम तारीख ५ ऑक्टोबर* आहे, त्यानंतर आलेले नावे ग्राह्य धरले जाणार नाही.
❌ *नोट- कोणीही ग्रुपवर व्हिडिओ टाकू नये.*

🪗🎤 *ग्रुप भजन स्पर्धेसाठी नियमावली* 🎯
१ कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त सात जणांचा ग्रुप असावा
२ साथीला *पेटी, तबला, टाळ, घुंगरू, चिपळ्या* इत्यादी वाद्ये असावी.(या साथीदारांचा समावेश ग्रुपच्या संख्येत होणार नाही)
३ *भजन सादर करण्याची वेळ सात ते आठ मिनिटे* आहे, यात आपण *देवीचा गोंधळ, जोगवा किंवा देवीचे गीत* सादर करू शकता
४ दोन अभंग किंवा भजन सादर करू शकता.(एक देवीचा गोंधळ आणि दुसरे कोणत्याही देवाचे भजन किंवा अभंग)
५.आपला पोशाख म्हणजेच ड्रेपरीला सुद्धा मार्क दिले जातील.
६.ग्रुप मधील किमान एक किंवा दोन तरी सदस्य हे आपल्या समाजाचे असावे हे बंधनकारक आहे. (हा आपल्या समाजासाठीचा उपक्रम आहे .)
७.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

🎤 *एकल गायन म्हणजेच वैयक्तिक भजनगीत/भावगीत/भक्तीगीत गायन स्पर्धा नियमावली*🎯
१ स्पर्धकांनी कोणतेही एक गीत सादर करावे
२ गीताचा कालावधी जास्तीत जास्त 5 मिनिटांचा असावा. कालावधीचे काटेकोरपणे पालन करावे
३ पेटी, तबला साथीदार असतील तर फार उत्तम, नसले तरी चालेल
४ परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

या स्पर्धेच्या माध्यमातून *फक्त वरील नियमांचा विचार करून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि एक उत्तेजनार्थ बक्षीस😎* काढण्यात येईल आणि आपल्या मंडळाचा जो पुढील कार्यक्रम होईल त्यावेळेस बक्षीस देण्यात येईल.

*बक्षीसाचे स्वरूप- प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह*

*जागर स्त्रिशक्तीचा* उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रातून घेत आहोत त्यामागे एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की सगळा कोष्टी समाज परिवार एकत्र जोडला जावो🤝 🙏🏻

तसेच या *उपक्रमासाठी जर कोणाला स्पॉन्सरशिप द्यायची असेल तर त्या व्यवसायिकांचे किंवा उद्योजकांचे स्वागतच आहे.🙏🏻* त्यासाठी त्यांनी खालील सभासदांकडे संपर्क साधावा.
*चारुशीला मंचरकर - 9819300407*
*स्वाती राशीनकर - 9011135668*
*स्नेहल फलटणे- 9604730894*
*निलेश घोडके - 8149351012*

*🙏🏻धन्यवाद🙏🏻*

22/08/2025
🙏🏻 *नमस्कार कोष्टी समाज बांधव* 🙏🏻आज सकाळी एका ग्रुपवर मेसेज आला की, तवली फाटा, नाशिक येथे असलेले जैन गुरुकुल वसतिगृह इथे...
07/08/2025

🙏🏻 *नमस्कार कोष्टी समाज बांधव* 🙏🏻

आज सकाळी एका ग्रुपवर मेसेज आला की, तवली फाटा, नाशिक येथे असलेले जैन गुरुकुल वसतिगृह इथे २/३ दिवसापूर्वी शॉट सर्किट झाल्यामुळे आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु त्यांचे खाण्याचे सगळे सामान आगीत जळून गेले.

या वसतिगृहात सध्या 60 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत इथले धान्याचे गोडाऊन पूर्णपणे जळून गेले होते त्यामुळे तिथे धान्यरुपी मदतीची खूप गरज होती.

*महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज सेवा मंडळाला* याची माहिती मिळताच मंडळाच्या कार्यकारी सदस्यांमध्ये याबाबत चर्चा झाली आणि त्वरित सर्वांनी मदत करण्याची तयारी दर्शवली.

आम्ही सर्वांनी दुपारी 3 वाजेपर्यंत पैशाची जमवाजमव केली यात मंडळाने सुद्धा काही पैसे टाकले.
दुपारी ४ वाजता *गहू, तांदूळ, तूरडाळ, मुगडाळ, साखर, चहा पावडर, मिरची पावडर, रवा, पोहे* असे सगळे किराणा सामान घेऊन आम्ही आश्रमात जाऊन तिथल्या मुलांपर्यंत ते सामान पोहोचते केले.

यामध्ये खालील *महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज सेवा मंडळाच्या* कार्यकारी सभासदांचा आणि इतर काही समाज बांधवांचा देखील समावेश होता.
1.चारुशीला मंचरकर
2.मुकेश कोष्टी
3.मकरंद खराडे
4.विजय चिचे
5.योगेश बेळे
6.हर्षदा वाडेकर
7.स्वाती राशीनकर
8.रेवती नाटे
9.छाया पोंदे
10.लतिका कासार
11.निलेश घोडके

मदत छोटीशी का असेना वेळेत पोहोचणं गरजेचं होतं.
आपण सर्वांनी आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून ती वेळेवर पोहोचवली त्यासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏🏻🙏🏻

असेच मंडळासोबत रहा .अशीच साथ असू द्या 👍👍🤝🤝🙏🙏

*महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज सेवा मंडळ आणि कार्यकारी सभासद*

11/06/2025

महाराष्ट्र राज्य कोष्टी समाजसेवा मंडळ

Maharashtra Rajya Koshti Samaj Seva Mandal
27/05/2025

Maharashtra Rajya Koshti Samaj Seva Mandal

Address

Thane
421605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Rajya Koshti Samaj Seva Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category