District Information Office Thane

District Information Office Thane Official page of District Information Office, Thane

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने...
04/08/2026

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या उपस्थितीत SIR बाबत कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

CMOMaharashtra Chief Electoral Officer Maharashtra Maharashtra DGIPR Collector Thane DEOThane Ddikonkan Konkanbhavan

ऐरोली येथील मदर तेरेसा प्रेमदान अनाथाश्रमातील 40 अनाथ व्यक्तींचे   करिताचे Emuneration Form तहसिलदार अमोल कदम यांच्या उप...
04/08/2026

ऐरोली येथील मदर तेरेसा प्रेमदान अनाथाश्रमातील 40 अनाथ व्यक्तींचे करिताचे Emuneration Form तहसिलदार अमोल कदम यांच्या उपस्थितीत Digitize करण्यात आले.

CMOMaharashtra Maharashtra DGIPR Chief Electoral Officer Maharashtra Collector Thane DEOThane Ddikonkan Konkanbhavan

अन्न व औषध प्रशासनाची तक्रार निवारण प्रणाली... #अन्नऔषधप्रशासन  #भेसळयुक्तअन्न  #महाराष्ट्रशासन
04/08/2026

अन्न व औषध प्रशासनाची तक्रार निवारण प्रणाली...

#अन्नऔषधप्रशासन #भेसळयुक्तअन्न #महाराष्ट्रशासन

04/08/2026
सामान्य नागरिकांची शासकीय कामे सुरक्षित आणि सुलभ करणारी ही आहेत ‘मोबाईल अ‍ॅप्स'
04/08/2026

सामान्य नागरिकांची शासकीय कामे सुरक्षित आणि सुलभ करणारी ही आहेत ‘मोबाईल अ‍ॅप्स'

नवी मुंबईतील एसआयआर (SIR) कामाचा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला आढावा        ठाण...
03/08/2026

नवी मुंबईतील एसआयआर (SIR) कामाचा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला आढावा

ठाणे,दि.3(जिमाका): नवी मुंबई शहर क्षेत्रात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 'एसआयआर' (SIR) चे काम वेगाने सुरू आहे. या कामाच्या प्रगतीचा आणि एकूण वाटचालीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या उच्चस्तरीय बैठकीत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि विविध पथकांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पालिका क्षेत्रात 'एसआयआर' अंतर्गत ८ ऑगस्टपासून हे विशेष अभियान राबवले जात आहे. या मोहिमेत बेलापूर विधानसभा मतदारसंघात १ हजार ५०५ आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात १५६ अशी एकूण १ हजार ६६१ विशेष पथके प्रत्यक्ष मैदानावर कार्यरत आहेत. ही पथके घरोघरी जाऊन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती आणि प्रमाणीकरणाचे काम अत्यंत बारकाईने करत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, मतदार याद्यांचे काम अत्यंत पारदर्शक, अचूक आणि विहित वेळेत पूर्ण झाले पाहिजे. कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून सुटणार नाही आणि मतदार यादीतील चुका त्वरित दुरुस्त केल्या जातील, याची दक्षता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच या प्रक्रियेत नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पालिका प्रशासनाकडून या कामाला सर्वतोपरी सहकार्य दिले जात असल्याचे सांगत, सर्व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील कामावर प्रत्यक्ष लक्ष ठेवावे, असे निर्देश दिले. निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी हे काम वेळेत आणि पूर्ण अचूकतेने पूर्ण करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.
या महत्त्वाच्या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, बेलापूर व ऐरोली विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CMOMaharashtra Chief Electoral Officer Maharashtra Maharashtra DGIPR Collector Thane Navi Mumbai Municipal Corporation Ddikonkan Konkanbhavan

 #भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भे...
31/07/2026

#भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच प्रभावीपणे #बचावकार्य राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी #मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या वतीने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्तीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही देत मंत्री श्री. महाजन यांनी दुर्घटनेतील मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

CMOMaharashtra Girish Mahajan Maharashtra DGIPR Collector Thane Collector Thane Ddikonkan Konkanbhavan

सर्वसामान्य, गरजूंसाठी मेहनत घेवून, पारदर्शकतेने काम करू या...! - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे      ठाणे,दि.30(जिमाका...
30/07/2026

सर्वसामान्य, गरजूंसाठी मेहनत घेवून, पारदर्शकतेने काम करू या...! - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ठाणे,दि.30(जिमाका):- शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्यांचे लोकसेवक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गरजूंसाठी मेहनत घेऊन पारदर्शकतेने काम करू या, असे प्रोत्साहनात्मक उद्गार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे काढले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, भूसंपादन, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, माधवी नाईक, विक्रांत पाटील, कुमार आयलानी, जितेंद्र आव्हाड, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, मुद्रांक अधीक्षक उपस्थित होते.
सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी विषयनिहाय महसूल मंत्री महोदयांना संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील महसूल विभागाचा कामकाज आढावा सादर केला.
याबाबत श्री.बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करणारे शासन आहे. प्रशासन म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की शेवटच्या घटकापर्यंत आपले शासकीय लाभ पोहोचायला हवेत. आपण लोकांचे सर्व प्रकारे रक्षक बनले पाहिजे. आपले काम पारदर्शकपणे मानवी संवेदना जागृत ठेवून करावे. अनावधानाने झालेली चूक निश्चित क्षमापित केली जाईल मात्र विशिष्ट हेतूने, निष्काळजीपणाने, बेफिकीरपणाने केलेली चूक कदापि माफ केली जाणार नाही तर त्याबाबत संबंधिताला कठोरात कठोर शासन मात्र नक्कीच केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील रस्त्यांची मोजणी, रस्त्यांचे सीमांकन आदी प्रकारची कामे 26 जानेवारी 2027 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ हे राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे नमूद करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले, त्यामुळे भविष्यातही ठाणे जिल्ह्यात अधिकाधिक चांगली, लोकाभिमुख, नाविण्यपूर्ण कामे होतील, असा विश्वासही व्यक्त केला.

CMOMaharashtra Chandrashekhar Bawankule Maharashtra DGIPR Revenue Department, Government of Maharashtra Collector Thane Ddikonkan Konkanbhavan

ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणारठाणेकरांच्या मालमत्ता आणि हक्क सुरक्षेसाठी शासन ...
30/07/2026

ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणार

ठाणेकरांच्या मालमत्ता आणि हक्क सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश

ठाणे, दि.30(जिमाका):- ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आले असून, हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
त्याबरोबरच ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि दोन नवीन तहसील कार्यालय देखील होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या पुढाकारातून ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील शिवसमर्थ विद्यालयात आज आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार संजय केळकर, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रांत पाटील, आमदार माधवी नाईक, आमदार रविंद्र फाटक, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, ॲड. संदीप लेले यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी आणि मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यक्रमस्थळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी प्रवेश केल्याबरोबर त्यांनी विविध शासकीय स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर महसूल मंत्री श्री. बावनकुळेंसह उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गिय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध कामाचे विशेष अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात आलेल्या या सेवा उपक्रमात महसूल खात्यासह महिला व बालविकास, क्रीडा, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन आणि आदिवासी विकास अशा सर्वच विभागांनी एकत्र येत राज्यात १० लाख कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात ठाणे जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली असून आमदार संजय केळकर यांनी एकट्या आपल्या मतदारसंघात ८ हजार कुटुंबांना लाभ मिळवून दिला, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले, असे महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी नमूद केले.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी ठाणे आणि पालघर परिसरासाठी शासनाने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. कल्याण-अंबरनाथ भागात कृषी उत्पन्न बाजार समिती व मल्टी-मॉडेल हब उभारणीसाठी, तसेच वाढवण बंदराला जोडणाऱ्या प्रकल्पांसाठी महसूल विभागाने मोफत जमीन उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय पर्यावरण रक्षणासाठी ७३.७३ एकर जागा कांदळवनासाठी, ठाण्यात ॲग्री-युनिट व कन्व्हेन्शनल सेंटर, बीएसएनएलच्या 60 टॉवर्ससाठी जमीन, अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नवोदय विद्यालय, तसेच मीरा-भार्इंदर येथे एमटीपी प्लांट व कोस्टल रोडसाठी २५ एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मीरा- भाईंदरमधील 318 एकर व पिंपरी येथील 13 एकर जमिनीला 'वर्ग-2' चा दर्जा देऊन झोपडपट्टी विकास व शासकीय जमिनींचे संरक्षण करण्यात आले असून,268 कर्मचाऱ्यांचा अनुकंपातत्त्वावर भरतीचा प्रश्नही निकाली काढण्यात आला आहे.
नागरिकांना दिलासा देणाऱ्या कायदेशीर निर्णयांवर प्रकाश टाकताना श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, बिगरशेती (NA) परवानग्यांची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली असून तुकडेबंदी कायदा मागे घेण्यात आला आहे. यामुळे 15 ऑक्टोबर 2023 पूर्वी ठाण्यात बांधण्यात आलेल्या लहान प्लॉट्सवरील सुमारे 1 लाख कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत. तसेच 1 जानेवारी 2011 पूर्वी शासकीय जागांवर असलेल्या सर्व घरांना पट्टे वाटप करून ते नियमित केले जाणार आहेत. येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात राज्यातील सर्व फ्लॅटधारकांना हक्काचे 'प्रॉपर्टी कार्ड' देण्याचा आणि जगातील अत्याधुनिक 'लँड टायटलिंग कायदा' (Land Titling Act) मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासन घेणार आहे. यामुळे डिजिटल चिपयुक्त स्मार्ट प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि जमिनीची 15 दिवसांत मोजणी, नोंदणी व म्युटेशन ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व सुलभ होईल, असा विश्वास महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी या शिबिरास उपस्थित नागरिकांच्या अडचणी, तक्रारी, समस्यांची लेखी निवेदने स्वीकारली आणि त्यांच्या निवेदनांवर त्वरीत कार्यवाही करण्याचे संबंधितांना आदेश दिले.
आमदार संजय केळकर यांनी संपूर्ण राज्यात आणि ठाण्यात ‘महाराजस्व अभियान’ यशस्वीपणे राबवल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पाचे तसेच जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच महायुती सरकारचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात उभारण्यात आलेल्या 20 हून अधिक स्टॉल्सचा आणि विविध शासकीय सेवांचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणातून केले.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी 'महाराजस्व अभियाना'च्या माध्यमातून शासकीय सेवा जनतेच्या दारात आणल्याबद्दल आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. या अभियानामुळे महसूल प्रशासन अधिक जागृत व गतिमान झाले असल्याचे सांगत, त्यांनी नवी मुंबईतील नागरिकांसाठी 15 ऑगस्टनंतर असेच भव्य शिबिर आयोजित करण्याची मागणी केली.
आमदार निरंजन डावखरे यांनी ब्रिटिशकालीन क्लिष्ट महसुली कायद्यांमध्ये अमूलाग्र बदल करून ते लोकहितार्थ सुलभ केल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक केले. 'महाराजस्व अभियाना'च्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत (अंत्योदय) योजनांचे लाभ पोहोचत असून, या शिबिरासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या तत्परतेचा त्यांनी विशेष गौरव केला.
आमदार विक्रांत पाटील यांनी बिगरशेती (NA) मंजुरी रद्द करणे, शेत-रस्ते अतिक्रमणमुक्त करणे आणि २०११ पूर्वीची बांधकामे नियमित करणे यांसारख्या ऐतिहासिक महसुली निर्णयांबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक केले. 'महाराजस्व अभियाना'च्या माध्यमातून मंत्रालयातील योजना थेट जनतेच्या दारात आणून एकाच छताखाली हजारो लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
आमदार माधवी नाईक यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना सांगितले की, राज्य सरकारने राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याचे मोठे काम झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच हे रयतेचे राज्य असल्याचे सांगत, सर्व लाभार्थ्यांनी या योजनांची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवून राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविकात, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’च्या पहिल्या टप्प्यात 76 हजार लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे सांगत आदिवासी बांधवांना हक्काचा 7/12 देण्याचा आणि 5 ब्रास मोफत रेती वाटपाचा निर्णय प्रभावीपणे राबवल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघांत हे अभियान यशस्वीपणे राबवून महसुली प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 'सामाजिक अर्थसहाय्य योजना', 'वनहक्क कायदा' आणि 'गौण खनिज नियम' या तीन महत्त्वपूर्ण माहिती पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना शासन निर्णय, परिपत्रके व योजनांची अचूक माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना दाखले आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ठाण्याचे नायब दिनेश पैठणकर यांचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रम संपल्यानंतर महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पा मारल्या त्यांच्या प्रश्नांचीही मनमोकळी उत्तरे दिली. त्यांच्या समस्या समजून घेत शासन त्यांच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.

CMOMaharashtra Chandrashekhar Bawankule Revenue Department, Government of Maharashtra Maharashtra DGIPR Collector Thane ZILLA PARISHAD THANE Ddikonkan Konkanbhavan

 #थेटप्रक्षेपणछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर | ठाणे
30/07/2026

#थेटप्रक्षेपण
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर | ठाणे

ठाणे । छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून LIVE

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Information Office Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to District Information Office Thane:

Shortcuts

Share