29/05/2026
🪷 भारतीय जनता पार्टी – वसई विरार जिल्हा 🪷
📌 शुक्रवार, दिनांक 29/05/2026
🕔 वेळ : सायंकाळी 5.00 वाजता
📍 स्थळ : एकविरा पार्टी हॉल, अलकापुरी मार्केट रोड, नालासोपारा (पूर्व)
भारतीय जनता पार्टी वसई-विरार जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अध्यक्षा मा. सौ. प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत जिल्हा अध्यक्षा मा. सौ. प्रज्ञाताई पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन विस्तार, पक्षाची भूमिका आणि आगामी उद्दिष्टांबाबत मौल्यवान विचार मांडले. तसेच नालासोपारा विधानसभा आमदार मा. राजन आप्पा नाईक यांनीही उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते मा. मनोज पाटील, बोईसर विधानसभा अध्यक्ष मा. महेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस मा. जोगेंद्र प्रसाद चौबे, मा. मनोज बारोट, मा. कपिल म्हात्रे, मा. बिजेंद्र कुमार यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा अध्यक्ष, जिल्हा आघाडी, सेल व प्रकोष्ठ संयोजक, नगरसेवक/नगरसेविका, मंडळ अध्यक्ष, मंडळ महामंत्री तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व आगामी काळातील कार्यक्रमांसाठी प्रभावी नियोजन करण्यात आले.