04/05/2026
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏*
*💯🌹 #स्वामीकृपेच्या अनुभूती🌹💯*
*धन्वंतरी..! माझी गुरुमाऊली.....‼️*
*👉 #परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार मुजरा, मला एक फार विचित्र #प्रकारचा आजार झाला होता. माझ्या गालावर पूर्ण सूज आली व माझी जीभ #अजिबात हलत नव्हती. मी पूर्ण घाबरुन गेलो होतो. मनात नाही नाही ते विचार येत होते. काय करावं काही समजत नव्हतं. कोणीतरी मला, 'श्री स्वामी समर्थ केंद्रात जा,' असे सांगितले. त्यानुसार आमच्या येथील #सेवाकेंद्रात गेलो. सेवेकऱ्यांनी मला #महामृत्युंजय मंत्राची सेवा करण्यास सांगितले.*
*👉 #ती सेवा सुरुच होती त्याचवेळी आम्ही दोन तीन दवाखान्यांमध्ये माझे रिपोर्ट #डॉक्टरांना दाखविले. त्यावर डॉक्टरांनी म्हटले की, 'लवकरात लवकर उपचार सुरु करावे लागतील.' मग आम्ही मुंबईतील अजून एका #नामवंत दवाखान्यात रिपोर्ट दाखविले. तेथील डॉक्टरांनी तर 'माझी जीभ कापावी लागेल' असा सल्ला दिला आणि आणखी एका दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगितले. त्यांच्या #उपचाराने जर काही फरक पडला तर थोड्या कमी प्रमाणात जीभ कापावी लागेल असे सूचवले.*
*👉 #मग आम्ही त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे जायचं ठरवलं. ह्या कठीण प्रसंगातही आमची मनोभावे सेवा सुरु होती. #केंद्रातही सेवेकऱ्यांमध्ये माझ्या #आजाराविषयी व उपचारांविषयी चर्चा सुरुच होत्या त्यामुळे दोन तीन सेवेकरी सतत घरी येऊन विचारपूस करत असत.*
*👉 #दोघा-तिघांनी पुढाकार घेत माझ्या आजाराविषयी #परमपूज्य गुरुमाऊलींना सांगून बघू असे ठरविले व ते लोक स्वतःच माझी फाईल घेऊन पहिले श्री #गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर व परमपूज्य #गुरुमाऊलींकडे निघाले. श्री गुरुपीठात आदरणीय श्री. #चंद्रकांतदादांना सर्व सांगितले त्यावर त्यांनी, 'त्यांना काहीही होणार नाही.' असे सांगून स्वतः जवळची #सप्तरंगीची मुळी व आरोग्य यंत्र माझ्यासाठी दिले.*
*👉 #त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींकडे हे लोक गेलेत. तिथेही #परमपूज्य गुरुमाऊलींना सर्व वृत्तांत कथन केल्यावर परमपूज्य गुरुमाऊली म्हणालेत, ही व्यक्ती पूर्ण बरी होईल. जीभ कापावी लागणार नाही, पुन्हा दवाखान्यात जाण्याची वेळ पण येणार नाही.' असे सांगितले. परमपूज्य #गुरुमाऊलींनी स्वतःजवळची रानभेंडीची मुळी औषध म्हणून दिली.*
*👉 #परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय श्री. #दादासाहेब यांनी दोघांनी दिलेली औषधी व सेवा माझ्या #घरातल्यांनी सुरु केल्यात. त्यानंतर बरोबर आठ दिवसांनी माझ्या #जीभेखालून काहीतरी घनपदार्थ स्वरुपात तोंडातून बाहेर पडला व रक्तस्त्राव होऊ लागला जो #थोड्यावेळाने आपोआप थांबला.*
*👉 #दुसऱ्या दिवशी पण तसेच घडले त्यानंतर मात्र मला जीभेची थोडीफार #हालचाल होते आहे असे जाणवले. पुढे काही दिवसात डॉक्टरांची अपॉइन्टमेंट होतीच, तेव्हा डॉक्टर म्हणाले 'थोडा फरक होऊ लागलाय पण अजून फरक पडणे अपेक्षित आहे.' पुन्हा काही सेवेकरी दिंडोरीला गेले आणि परमपूज्य गुरुमाऊलींना सर्व काही सांगितले. पुन्हा परमपूज्य #गुरुमाऊलींनी औषध म्हणून #वेखंड गोमुत्रात वाटून त्याचे चाटण घेण्यास सांगितले. हा उपचार सुरु करण्यापूर्वी मी केंद्रात गेलो व आजीवन सेवा करीन असे वचन स्वामींना देऊन आलो आणि नंतर #औषधोपचार सुरु केले. दुसऱ्याच दिवशी रात्री झोपताना स्वामींना मनोमन विनंती केली की,'महाराज, या आजारातून मला पूर्ण बरे करा.' नंतर मला झोप लागली. रात्री दोन-तीन तासांनी झोपेत असतानाच अचानक माझ्या तोंडातून जीभेखालून #रक्तस्त्राव सुरु झाला व बराच वेळ तसाच होत राहिला नंतर आपोआप रक्तस्त्राव थांबला. सकाळी जाग आली तेव्हा दिसले की, #गालाची सूजही कमी झाली आहे व जीभेची हालचालही बऱ्यापैकी होऊ लागली आहे. ही सर्व परमपूज्य गुरुमाऊलींचीच जादू.*
*👉 #करण रमण मढवी, दिवा-कोळीवाडा, मुंबई*
*‼️श्री स्वामी समर्थ #गुरुमाऊली‼️*