25/08/2022
मी मूळचा शेतकरी असल्याने शेतकऱ्यांची काळजी होती म्हणूनच या क्षारपडमूक्त प्रकल्पाकरिती कर्ज देण्याचे धाडस केले.
डाॅ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील जयसिंगपूर-उदगांव सहकारी बॅंक लि; जयसिंगपूरची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनते पासून उद्योजकापर्यंत अर्थवाहिनी असलेली डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बँक यशस्वी वाटचाल करीत आज मल्टिस्टेटचा दर्जा प्राप्त केल्याने आणखी जोमाने कार्य करण्याची ऊर्जा निर्माण होत आहे. बँक मल्टिस्टेट करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांनी परिश्रम घेतलेबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
स्व. साहेबांनी उभारलेल्या या बँकेने सातत्याने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. आज ही वाटचाल पाहून सार्थ अभिमान वाटतो आहे. येणाऱ्या काळात एक हजार कोटी रुपयांचे ठेवींचे ध्येय पूर्ण करून शेड्युल्ड बॅंकेत रूपातंर करून ग्राहकांना चांगल्याप्रकारे सेवा देण्याच्या कार्य करण्यात येणार आहे. डिजिटल युगात आपली बॅंकही अग्रेसर असेल. आपण सर्व सभासदांनी एका मतांनी सगळ्या विषयांना मंजूरी दिलीत यावरून आपली बॅंकेवर असलेली दृढ विश्वास पाहून आणखी कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होते.
तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या क्षारपड जमीनींना कर्ज देण्यास कोणी तयार नव्हते. परंतु मी मुळचा शेतकरी असल्याने मला या प्रकल्पावर विश्वास होता. जमिनीतून अतिरिक्त क्षार निघून गेल्यानंतर जमिन पुन्हा सुपिक होणार व शेतकरी समृध्द होणार आणि जमिन सुपिक झाल्यानंतर शेतकरी कर्जाची रक्कम परतफेड करेल. असा ठाम विश्वास होता आणि याच विश्वासावर आज या प्रकल्पाची अनुकरण देशात होताना पाहतांना मिळत आहे.
यावेळी माझ्यासोबत ज.पूर नगरपालिकेच्या मा. नगराध्यक्ष डाॅ. निता माने, उद्योगपती अशोक कोळेकर, नगरसेवक संजय पाटील कोथळीकर, राजू पाटील, के.आर. चव्हाण, उदयसिंह जगदाळे, धनाजी पाटील, दत्त साखर कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, शिरोळ तालुका खरेदी विक्री संघ, दत्त भांडारचे सर्व संचालक, अधिकारी, यांच्यासह बॅंकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद व मान्यवर उपस्थित होते.