Bjp4vasaivirar

Call

Bjp4vasaivirar भाजप वसई विरार जिल्हा अधिकृत फेसबुक पेज
जिल्हा अध्यक्षा सौ प्रज्ञा कमलाकर पाटील

✨ भव्य उद्घाटन सोहळा! ✨🇮🇳 वसई-विरारच्या कला-क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा!कार्यक्रम १....
02/10/2026

✨ भव्य उद्घाटन सोहळा! ✨

🇮🇳 वसई-विरारच्या कला-क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा!

कार्यक्रम १.
🏟️ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा भव्य शुभारंभ

📅 उद्या | शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ सकाळी १०.०० वाजता
📍 ठिकाण - म्हाडा संकुल, विरार पश्चिम.

कार्यक्रम २.
🎭 मजेठीया नाट्यगृहाचा शुभारंभ

📅 उद्या | शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ दुपारी १२.०० वाजता
📍 ठिकाण - मजेठीया नाट्यगृह, आचोळे, नालासोपारा पूर्व

या भव्य उद्घाटन सोहळ्यास
प्रमुख मान्यवर नेते

🌷 पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार
डॉ. हेमंत विष्णू सवरा जी

🌷 नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार
श्री. राजन नाईक जी

🌷 वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.स्नेहाताई दुबे पंडित जी

यांची उपस्थिती लाभणार आहे.

🏟️ क्रीडा क्षेत्राला नवी उंची!
🎭 सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा!

वसई-विरारच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हे दोन्ही महत्त्वपूर्ण उपक्रम एक नवे पाऊल ठरणार आहेत.

🙏 या दोन्ही शुभारंभ सोहळ्यांना मोठ्या संख्येने आपल्या सहकाऱ्यासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आपली,
सौ. प्रज्ञा कमलाकर पाटील
जिल्हा अध्यक्ष भाजपा वसई-विरार.

02/10/2026

गेल्या १२ ते १३ वर्षांपासून रखडलेले आचोळे नाट्यगृह आणि जवळपास ९ वर्षांहून अधिक काळ रखडलेले विरार-बोळींचे क्रीडा संकुल नागरिकांच्या सेवेत उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार राजन नाईक आणि आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांच्यासह आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांनीही दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामांचा आढावा घेतला.

या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आचोळे नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, क्रीडा संकुलाचे कामही प्रगतीपथावर आहे.

मात्र, या पार्श्वभूमीवर महापौरांच्या लेटरहेडवरून उद्घाटनाचे निमंत्रण फिरत आहे, तर महापालिका आयुक्त आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

महापालिकेच्या मालकीच्या वास्तूंचे उद्घाटन करताना अधिकृत प्रोटोकॉल काय आहे...? याचा खुलासा महापालिका आयुक्तांनी करावा, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. यासंदर्भात आम्ही, आमचे आमदार आणि खासदार यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

त्यामुळे आज रात्रीपर्यंत महापालिका प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर उद्या आमचे दोन्ही आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि वसई-विरारच्या जनतेच्या उपस्थितीत या दोन्ही वास्तूंचे लोकार्पण करण्याची सूचना महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे.

या दोन्ही वास्तू वसई-विरारच्या जनतेच्या आहेत आणि जनतेच्या सेवेसाठीच उपलब्ध झाल्या पाहिजेत.

त्यामुळे उद्या जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाची निश्चित वेळ काही तासांत जाहीर करण्यात येईल.

देशाची स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र..!
02/10/2026

देशाची स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र..!

बळीराजाचा आधार, आपले सरकारशेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी  आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात  ...
02/10/2026

बळीराजाचा आधार, आपले सरकार

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ राबवली जात आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ३,२७,२५० पात्र शेतकऱ्यांना ₹३,१६०.४३ कोटींचा लाभ वितरित करण्यात आला आहे.

बळीराजाच्या आर्थिक अडचणींमध्ये दिलासा देण्यासाठी आपल्या भाजपा-महायुती सरकारचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या संकटकाळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लाडके देवाभाऊ त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत.

01/10/2026

राजशिष्टाचाराचा फज्जा उड़वत क्रीडा संकुलाचे बेकायदेशीर उद्घाटन करण्याचा प्रयत्न!

भाजप आक्रमक, अतिरिक्त आयुक्तांना धरले धारेवर

प्रतिनिधी

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नवनिर्माणाधीन क्रीडा संकुलाचा उद्घाटन सोहळा येत्या ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद पेटला आहे. महापौरांच्या वतीने काढण्यात आलेली ही निमंत्रण पत्रिका पालिका अधिकाऱ्यांकडूनच सर्वांना सर्क्युलेट केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे. या बेकायदेशीर आणि नियमबाह्य कारभाराचा जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह गुरुवारी सायंकाळी अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांची भेट घेऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले.

यावेळी अतिरिक्त आयुक्तांना धारेवर धरत विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर जोरदार प्रहार केला. "सदर लोकार्पण पालिका इमारतीचे आहे की एखाद्याच्या खासगी प्रॉपर्टीचे आहे?" असा रोकडा सवाल उपस्थित करत त्यांनी पालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले. या सोहळ्याचे निमंत्रण पूर्णपणे नियमबाह्य असून त्याद्वारे राजशिष्टाचाराचा उघडउघड भंग करण्यात आल्याचा थेट आरोप त्यांनी केला. सरकारी आणि पालिकेच्या अधिकृत कामांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलून विशिष्ठ वर्गाची लाचारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करत, "तुमच्या विरोधात हक्कभंग का आणू नये?" असा सनसनाटी इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. मनोज पाटील आणि भाजप नगरसेवकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भाजपने घेतलेल्या या कडक आक्षेपानंतर अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांची चांगलीच कोंडी झाली. विरोधकांच्या या थेट हल्ल्यापुढे हतबल झालेल्या अतिरिक्त आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत स्वतः अनभिज्ञ असल्याचे सांगत बचावात्मक पावित्रा घेण्याचा प्रयत्न केला. अखेर हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून, महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याशी तातडीने चर्चा करून येत्या काही तासांत यावर अधिकृत माहिती आणि स्पष्टीकरण देतो, असा खुलासा अतिरिक्त आयुक्तांना द्यावा लागला. पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ आणि पक्षपाती कारभाराविरोधात भाजप आता अधिक आक्रमक मोडमध्ये आली आहे.
***




*कौतुकाची थाप म्हणजे नव्या कामाची प्रेरणा!*मा. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री. रविंद्र दादा चव्हाण साहेब,...
29/09/2026

*कौतुकाची थाप म्हणजे नव्या कामाची प्रेरणा!*

मा. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री. रविंद्र दादा चव्हाण साहेब,
वसई विधानसभा मतदारसंघातील ‘मन की बात’ कार्यक्रमाचे १००% रिपोर्टिंग पूर्ण झाल्याबद्दल आपण दिलेल्या कौतुकाच्या पत्रासाठी मनःपूर्वक धन्यवाद!

आपले हे कौतुक आणि शुभेच्छा आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहेत.
आपले मार्गदर्शन आणि आशीर्वाद असेच कायम लाभोत!

मनःपूर्वक धन्यवाद दादा! 🙏

*सौ.स्नेहा दुबे पंडित*
*आमदार वसई* *विधानसभा*

देशात सण-उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. या आनंदाच्या वातावरणात आजचा दिवस हजारो कुटुंबांच्या आयुष्यात एक नवीन आनंद घेऊन आ...
19/09/2026

देशात सण-उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. या आनंदाच्या वातावरणात आजचा दिवस हजारो कुटुंबांच्या आयुष्यात एक नवीन आनंद घेऊन आला आहे. आज देशातील ५१ हजारांहून अधिक तरुणांना शासकीय सेवेसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत.

- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी

विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र निर्विघ्नपणे उभा राहावा, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना!
19/09/2026

विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र निर्विघ्नपणे उभा राहावा, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना!

17/09/2026

Heartiest birthday greetings to Hon. Prime Minister Shri Narendra Modi Ji, the architect of Atmanirbhar Bharat, whose leadership continues to drive India’s journey of growth, development and global dominance!

आत्मनिर्भर भारताचे शिल्पकार, विकासपुरुष, वैश्विक नेतृत्व, आमचे नेते व प्रेरणास्थान 'मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी' यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

#पंतप्रधान_नरेंद्र_मोदी

16/09/2026

'जनसेवा हीच राष्ट्रसेवा' हे ब्रीद उरी बाळगून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

राष्ट्रसेवेसाठी समर्पित २५ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासासाठी आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीला शुभेच्छा देऊया.

सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजता आपल्या घरी 'आशीर्वादाचा दिवा' प्रज्वलित करुया!

‘जनसेवा ही राष्ट्रसेवा’ के संकल्प को अपना मूलमंत्र मानकर आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी विकसित भारत के स्वप्न को साकार करने के लिए निरंतर कार्यरत हैं।

राष्ट्रसेवा के लिए समर्पित २५ वर्षों के सफर के लिए उन्हें शुभकामनाएँ दें और उनकी आगामी सफल यात्रा के लिए मंगलकामना करें।

सेवा संकल्प अभियान के अंतर्गत १७ सितंबर को शाम ६ से ७ बजे अपने घर पर ‘आशीर्वाद का दीप’ प्रज्वलित करें!

#सेवा_संकल्प_अभियान

Address

Vasai

Telephone

+918080061007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bjp4vasaivirar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share