MNS Vasind Adhikrut

  • Home
  • MNS Vasind Adhikrut

MNS Vasind Adhikrut महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहराचे अधिकृत फेसबुक पेज

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहर आयोजित 🚩🌺🙏 सुंदर आमचा बाप्पा 🙏🌺घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६वासिंद शहरातील सर्व...
23/08/2026

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहर आयोजित 🚩

🌺🙏 सुंदर आमचा बाप्पा 🙏🌺
घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६

वासिंद शहरातील सर्व गणेशभक्तांना मनःपूर्वक आवाहन! 🙏

आपल्या घरच्या गणरायाचे आगमन म्हणजे केवळ उत्सव नाही, तर आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि सर्जनशीलतेचा सोहळा आहे. ❤️

यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाची सुंदर, आकर्षक, पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण सजावट करून या स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या कल्पकतेला एक सुंदर व्यासपीठ मिळवून द्या! 🌺✨

🏠 आपल्या घरातील बाप्पाची सजावट दाखवा…
🎨 आपली कल्पकता दाखवा…
🙏 आपली भक्ती दाखवा…
🏆 आणि ‘सुंदर आमचा बाप्पा’चा मान मिळवा!

गणेशभक्तांनो, बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू करा…
कारण यंदा वासिंदमध्ये सजणार आहेत अनेक सुंदर बाप्पा आणि उजळणार आहे गणेशभक्तीची नवी ओळख! ❤️🚩

गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
मंगलमूर्ती मोरया! 🌺

21/08/2026

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना – वासिंद शहर आयोजित 🚩

विद्यार्थी सदस्य नोंदणी अभियान

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सदस्य नोंदणीसाठी आवाहन व मार्गदर्शन करताना... 🚩
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वासिंद शहर अध्यक्ष
अमोल अरुण बोराडे साहेब

21/08/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वासिंद शहर आयोजित विद्यार्थी सदस्य नोंदणी अभियान आज पार पडले हे सदस्य नोंदणी अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकारी मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!🙏🏽
या अभियानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहापूर तालुका अध्यक्ष विकी मांजे, विद्यार्थी सेना तालुका सचिव जयेश भेरे, ज्येष्ठ कार्यकर्ते जयराम ठाकरे, विद्यार्थी सेना शहापूर शहराध्यक्ष रोहन गगे, विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष कल्पेश हरड,शेखर गगे,यांची प्रमुख व सक्रिय उपस्थिती लाभली

या अभियानासाठी वैभव काठोळे, उन्मेश साळुंखे, शुभम आगीवले, योगेश गुंड, प्रवीण सानप, मिलिंद कुमावत.तसेच वासिंद शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, दिलेला वेळ आणि केलेले नियोजन निश्चितच कौतुकास्पद आहे. 👏🔥

प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी आणि विद्यार्थी सेनेची संघटनात्मक ताकद मजबूत करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.

हे अभियान केवळ एका व्यक्तीचे यश नसून आपल्या सर्वांच्या एकजुटीचे, मेहनतीचे आणि संघटनात्मक ताकदीचे यश आहे! 🚩

ज्यांनी कॅम्पच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष सदस्य नोंदणीपर्यंत वेळ दिला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सहकार्य केले आणि पडद्यामागे राहूनही योगदान दिले — त्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता आणि सहकाऱ्याचे मनःपूर्वक कौतुक व धन्यवाद! 🙏

अशीच एकजूट, अशीच मेहनत आणि असाच उत्साह कायम ठेवून वासिंद शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम करूया! 🔥🚩

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

🚩 विद्यार्थ्यांची ताकद – महाराष्ट्राची ताकद!
🚩 जय महाराष्ट्र! 🚩

आपला
अमोल अरुण बोराडे
अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वासिंद शहर

वासिंद व वासिंद परिसरातील सर्व पालकांना नम्र आवाहन 🙏कृपया आपल्या लहान मुलांना बाईक किंवा स्कूटी चालवायला देऊ नका. 🛵🚨 काय...
21/08/2026

वासिंद व वासिंद परिसरातील सर्व पालकांना नम्र आवाहन 🙏

कृपया आपल्या लहान मुलांना बाईक किंवा स्कूटी चालवायला देऊ नका. 🛵

🚨 कायदेशीर वयाची अट लक्षात घ्या:
भारतामध्ये सामान्यतः दुचाकी चालविण्यासाठी किमान वय १८ वर्षे आहे. मात्र, १६ वर्षांच्या व्यक्तीसाठी ५० सीसीपर्यंतच्या विशिष्ट दुचाकीसाठी कायद्यानुसार परवानगीची तरतूद आहे, आवश्यक परवाना व अटींसह.

अनेक लहान मुले शाळा परिसरात तसेच बाजारपेठेत वाहने अतिशय वेगाने चालवताना दिसून येतात. यामुळे त्यांच्या स्वतःच्या जीवाला तसेच इतरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

उद्या एखादा अपघात घडला, तर त्याची जबाबदारी कोणाची?
म्हणून अपघात होण्याची वाट पाहण्यापेक्षा आजच काळजी घेऊया.

👉 आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना वाहन चालवायला देऊ नका.
👉 कायदेशीर वय आणि वैध परवाना नसताना वाहन देणे टाळा.
👉 आपली थोडीशी काळजी, आपल्या मुलांचे व इतरांचे आयुष्य वाचवू शकते.

पालक म्हणून जबाबदारी आपलीच आहे.
सुरक्षित मुलं, सुरक्षित वासिंद! 🙏

जनहितार्थ जारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वासिंद शहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहर जनसंपर्क कार्यालय लवकरच आपल्या सेवेतअमोल अरुण बोराडे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण स...
20/08/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वासिंद शहर जनसंपर्क कार्यालय
लवकरच आपल्या सेवेत

अमोल अरुण बोराडे
अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहर
9270012345

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩📢 सदस्य नोंदणी अभियान – वासिंदसन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि...
19/08/2026

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩

📢 सदस्य नोंदणी अभियान – वासिंद

सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री. अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी सुरू आहे.

याच अनुषंगाने वासिंद शहरात सदस्य नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

📍 स्थळ : सरस्वती विद्यालयाजवळ, वासिंद
📅 दिनांक : २० व २१ — गुरुवार व शुक्रवार

🕚 सकाळी : ११.०० ते १.३०
🕓 संध्याकाळी : ४.०० ते ६.००

विद्यार्थी सेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मनसेच्या विचारांशी जोडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व सहकाऱ्यांनी या सदस्य नोंदणी अभियानात सक्रियपणे सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

🚩 विद्यार्थ्यांची ताकद – महाराष्ट्राची ताकद!
🚩 चला, महाराष्ट्र नवनिर्माणाच्या विचारांसोबत जोडले जाऊया!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
वासिंद शहर

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :

वैभव काठोळे — 9881704235
उन्मेश साळुंखे — 9561447797
शुभम आगीवले — 7028805165
योगेश गुंड — 7448221777
प्रवीण सानप — 9561165395
मिलिंद कुमावत — 7385325398

🚩 जय महाराष्ट्र! 🚩

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩📢 सदस्य नोंदणी अभियान – वासिंदसन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानेआणि सन्मान...
18/08/2026

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩

📢 सदस्य नोंदणी अभियान – वासिंद

सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने
आणि सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली
महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी सुरू आहे.

याच अनुषंगाने वासिंद शहरात सदस्य नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

📍 स्थळ : सरस्वती विद्यालयाजवळ, वासिंद
📅 दिनांक : २० व २१ — गुरुवार व शुक्रवार

🕚 सकाळी : ११.०० ते १.३०
🕓 संध्याकाळी : ४.०० ते ६.००

तसेच, या कॅम्पनंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी वासिंद जनसंपर्क कार्यालयात याच वेळेत पुढे सुरू राहणार आहे.

विद्यार्थी सेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मनसेच्या विचारांशी जोडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व सहकाऱ्यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, ही विनंती.

🚩 विद्यार्थ्यांची ताकद – महाराष्ट्राची ताकद!
🚩 चला, महाराष्ट्र नवनिर्माणाच्या विचारांसोबत जोडले जाऊया!

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

वासिंद शहर

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :

वैभव काठोळे — 9881704235
उन्मेश साळुंखे — 9561447797
शुभम आगीवले — 7028805165
मिलिंद कुमावत — 7385325398

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩📢 सदस्य नोंदणी अभियान – वासिंदसन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानेआणि सन्मान...
17/08/2026

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩

📢 सदस्य नोंदणी अभियान – वासिंद

सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने
आणि सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली
महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी सुरू आहे.

याच अनुषंगाने वासिंद शहरात सदस्य नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

📍 स्थळ : सरस्वती विद्यालयाजवळ, वासिंद
📅 दिनांक : २० व २१ — गुरुवार व शुक्रवार

🕚 सकाळी : ११.०० ते १.३०
🕓 संध्याकाळी : ४.०० ते ६.००

तसेच, या कॅम्पनंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी वासिंद जनसंपर्क कार्यालयात याच वेळेत पुढे सुरू राहणार आहे.

विद्यार्थी सेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मनसेच्या विचारांशी जोडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व सहकाऱ्यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, ही विनंती.

🚩 विद्यार्थ्यांची ताकद – महाराष्ट्राची ताकद!
🚩 चला, महाराष्ट्र नवनिर्माणाच्या विचारांसोबत जोडले जाऊया!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
वासिंद शहर

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :

वैभव काठोळे — 9881704235
उन्मेश साळुंखे — 9561447797
शुभम आगीवले — 7028805165
मिलिंद कुमावत — 7385325398

03/08/2026

दुर्दैवाने, आज मुंबई–नाशिक महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे एका तरुणाचा भीषण अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक घटना आहे.
ही दुर्घटना सहज टाळता आली असती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले,मागणीचे निवेदन दिले

मनसेच्या इशाऱ्यानंतर दुरुस्तीची कामे सुरू झाली असली तरी,
याआधी वेळेवर हे खड्डे बुजवले असते तर आज एका निष्पाप तरुणाचा जीव गेला नसता. त्यामुळे आम्ही व्यक्त केलेला इशारा दुर्दैवाने आज खरा ठरला.

या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या मृत्यूसाठी संबंधित NHAI प्रशासन जबाबदार असून, त्यांच्या हलगर्जी कारभाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करते.
आता तरी प्रशासनाने जागे होऊन महामार्गावरील सर्वच जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत आणि भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे आणखी एकही निरपराध नागरिकाचा बळी जाऊ नये, हीच आमची ठाम मागणी आहे.

Address

Vasind

421601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Vasind Adhikrut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share