07/02/2025
दिनांक - 25 जानेवारी 2025
वर्षातील पहिले गिर्यारोहण !
युवतींची संख्या -14
सकाळी नमस्ते घेऊन आम्ही केंजळगडाच्या दिशेने निघालो. गडाच्या पायथ्याशी सर्वांची ओळख करून घेतली आणि सकाळी ८ वाजता चढाईला सुरुवात केली. दहा वाजता गडावर पोहोचून नाश्ता केला आणि नंतर पुन्हा गडभ्रमंती सुरू झाली.
गडावर वेदिका ताईंनी इतिहासाची माहिती दिली. त्यानंतर, आई-मुलींचे नाते अधिक दृढ होण्यासाठी काही मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले. गड उतरून खाली आल्यावर गावात स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर गावातील काही महत्त्वाची ठिकाणे पाहिली, ज्यात पेशवेकालीन नागेश्वर मंदिर, जिवा महाले व कान्होजी जेधे यांची समाधी आणि येथील राजवाड्याचा समावेश होता.
प्रबोधिनीत परतल्यावर प्रार्थना घेऊन युवतींनी समाधानाने आपल्या घरी प्रस्थान केले.