Shrikant dhote

Shrikant dhote my persnoal page

प्रभात गुंजन या साप्ताहिकात आलेला माझा लेख *राष्ट्रसंतांच्या साहित्याचं वेगळेपण*            विसाव्या शतकातील मानवतावादी ...
05/11/2025

प्रभात गुंजन या साप्ताहिकात आलेला माझा लेख

*राष्ट्रसंतांच्या साहित्याचं वेगळेपण*

विसाव्या शतकातील मानवतावादी संत म्हणुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे बघीतल्या जातं. देवभक्तीपासुन सुरू झालेला माणीक नावाच्या बालकाचा प्रवास पुढे देशभक्ती, माणुसपण, विश्वशांती आणी शेवटी राष्ट्रसंत इथे येऊन थांबतांना शरीर रुपाने जरी राष्ट्रसंत थांबले असले तरी पुढच्या दोन हजार वर्ष पुरेल एवढी साहित्यरुपी शिदोरी ते देवुन जातात. ज्यात फक्त माणुस, मानवता, समन्वयाचा विचार आहे आणी मानवोन्नतीचा विचार आहे. ज्या काळात पोटानंतर भक्ती हा विषय महत्वाचा होता काहिंना तर तो पोटापेक्षाही महत्वाचा वाटत असतांना त्या भक्तीचा आधार घेऊन मानवतावादी विचांराची पेरणी आपल्या आचार विचार व लिखाणातुन सतत करत असतांना जेव्हा देश परकियांच्या गुलामीखाली होता तेव्हा परकीयांची गुलामगिरी झुगारून देण्यासाठी डोळसपणाचा उपयोग करुन भजनाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती जागवणारे, क्रांती घडविणारे व त्याकरीता जेलवारी करणारेही राष्ट्रसंत होते.
राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यात खोटा आदर्शवाद निर्माण करण्याचा कुठेही प्रयत्न केला नाही किंवा कल्पनेचे मजले बांधण्याचे काम केले नाही. तर व्यवहारी विश्लेषण करून जगण्याचा वास्तव मार्ग दाखविला. विश्वशांतीची कल्पना मांडत असतांना सामुदायीक प्रार्थनेत ती क्षमता असल्याचे नमुद करतांना,
विश्वी नांदु शकेल शांतता, तेणे गावची कोण कथा,
सामुदायीक प्रार्थनाची करील एकता, तुकड्या म्हणे /
आपण फक्त प्रार्थना करायची व बाकीचं देव बघून घेईल असा त्याचा अर्थ नसुन सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून एकता कशी निर्माण, ती कशी निर्माण करावी हे प्रश्न प्रत्येकाला पडणे आवश्यक आहे कारण जर तो प्रश्न पडला नाही तर महाराजांनी सांगितलेले सामुदायिक प्रार्थनेचे तत्त्वज्ञान कळणार नाही. महाराजांनी हे तत्वज्ञान विश्वशांतीसाठी सांगितले असले तरी त्याची प्रथम घटक व्यक्ती व मग पुढे कुटुंब, गाव, देश आहे. त्या अर्थाने सामुदायिक प्रार्थनेत, ध्यानास येणाऱ्या उपासकाने,

*है प्रार्थना गुरुदेव असे या स्वर्ग सम संसार हो,*

*आओ सभी मिल जाये के प्रभू ध्यान धरेंगे
सबका भला करो यही आवाज करेंगे*
हे शब्द फक्त उच्चारण्यापुरते मर्यादीत नसुन व्यक्तीचे चरित्र मन शुद्ध करण्याचे साधन महाराजांनी मानले. प्रार्थना ही देवाला आळविण्याचे साधना नसुन मानसाला जागृत करुन सक्षम बनविण्याचे साधन आहे हे राष्ट्रसंतांनी सांगीतले. जेव्हा माणसाची वृत्ती हा संसार स्वर्गासारखा व्हावा, सर्वाचे भले व्हावे ही परोपकाराची भावना निर्माण होणे व ती ऐका पासून अनेकांच्यात येणे हा सामुदायिक प्रार्थनेचा गाभा असून ज्या दिवशी व्यक्ती, कुटुंब, गाव, देशाच्या बहुसंख्य किंवा पर्यायाने विश्वाच्या प्रत्येक माणसाच्या मनात हा विचार आला तर विश्वात कोणीही शत्रू राहणार नाही व त्यातूनच विश्वात शांती नांदेल हा सामुदायिक प्रार्थनेचा गाभा आहे. व तेच राष्ट्रसंताच्या साहित्याचं वेगळेपण आहे.
राष्ट्रसंतांनी परमार्थ मोक्ष या संकल्पनेचा कुठेही उदो उदो केल्याचे आपल्या साहित्यात दिसून येत नाही तर प्रत्येक व्यक्ती हा तन-मन-धनाने सक्षम झाला पाहिजे याबाबत महाराज म्हणतात
*आपुली साधावी उन्नती सौख्य द्यावे इतरांप्रती
या कारणे जी संस्कृती धर्म म्हणावे तिज लागी*
माणूस पहिले स्वतः सक्षम झाला पाहिजे. तो स्वतः उन्नत होईल तेव्हाच तो समाजाचे, देशाचे कल्याण करण्यास सक्षम होईल व अशा सक्षम व्यक्तीने इतरांना सौख्यची वागणूक दिली तर खऱ्या अर्थाने धर्माचे काम होणार आहे म्हणजे पर्यायाने मानवतेचे काम होणार आहे. राष्ट्रसंतांची धर्माची संकल्पना, "माझा धर्म न्यारा नी तुझा धर्म न्यारा" अशी संकुचित नसून "परस्परांशी वागणूक ज्यात न्यायनीती सम्यक" आपण आपली स्वतःची उन्नती साधून इतरांशी आपली न्यायाने वागतो, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो, स्वत:ची जबाबदारी जाणतो व सर्वांशी न्याय नितीन वागतो तो म्हणजे धर्मवान.
जगात अनेक धर्म जे स्वतःला मानवतावादी म्हणून घेतात तेही धर्म मानवतेची पेरणी करण्याऐवजी आपल्या धर्माच्या नावाचे लेबल लावून त्या लेबलचा विस्तार अनेक प्रलोभने, जुलूम, जबरदस्ती करून करीत असतानाच राष्ट्रसंत "सर्व विश्वचि व्हावे सुखी ही धर्माची दृष्टी नेटकी" असा जेव्हा संदेश देतात तेव्हा राष्ट्रसंतांच्या विचारांच्या वेगळेपणाचा ठसा जाणवतो. राष्ट्रसंतांनी लिहिलेला ऐतिहासिक ग्रंथ हा ग्रामगीता. ग्रामगीतेतील ऐक्केचाळीस अध्यायात मानवतेची पेरणी करणारे बीज वंदनीय महाराजांनी पेरून ठेवले. विश्वातला मानवतावादी विचारांचा कोणताही माणूस स्वतःचा विवेक जागरूक ठेवून मग तो कोणत्याही पंथ, संप्रदाय, धर्म, जातीचा असला तरी त्याने ग्रामगीतेचे आकलन केले तर त्याला ग्रामगितेत स्वतःच्या विचारांचे प्रतिबिंब दिसल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रसंतांनी आपल्या समग्र साहित्यात मानवतावाद पेरला असला तरी त्यांनी कोणत्याही जाती, धर्म, पंथ, यावर टीका टिपणी न करता सर्वांचा समन्वय साधून एका सूत्रात गोवण्याचे काम केले. ज्याची जी गोष्ट चांगली आहे ती गोष्ट कशी चांगली आहे हे ठळकपणे सांगण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. न पटणाऱ्या गोष्टीवर वादविवाद करण्यापेक्षा महाराजांनी त्यातून निघण्याचा मार्ग राष्ट्रसंतांनी सांगितला. जे साहित्य कोणत्याही धर्म,पंथ, संप्रदायाच्या व्यक्तीस आपल्या जवळचे वाटू शकते ते साहित्य महाराजांनी निर्माण केले.

ग्रामगीता हा ऐक्केचाळीस अध्यायाचा ग्रंथ लिहिल्यानंतर महाराजांना एक सात ओव्यांची अर्पण पत्रिका लिहिली. ही अर्पण पत्रिका महाराजांनी ग्रामनाथ म्हणजे शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना अर्पण करतांना,
*म्हणोनी तुजशी करिता अर्पण, तु विश्वाचे अधिष्ठान*
या विश्वाच्या अधिष्ठानावर कष्टकऱ्यांना नेवुन बसविण्याचे धाडस खऱ्या अर्थाने राष्ट्रसंतानी केले जे या विश्वाच्या निर्मितीपासून कुणीही करू शकले नाही. त्यामुळे राष्ट्रसंतांचे साहित्य व विचार हे वेगळे आहेत.
राष्ट्रसंतानी निर्माण केलेले साहित्य हे मानवतावादाची पेरणी करणारे असुन व्यक्ती त्याची उन्नती, ग्राम ग्रामाची उन्नती, मानवतावाद, दुबळा भाविकपणा यावर महाराजांनी टिका न करता आपल्या समग्र साहित्यात जगण्याचा वास्तव मार्ग दाखविण्याचा व कुणासही हिन न लेखता एक माणुस घडविण्यासाठी जी पेरणी आवश्यक आहे ती करण्याचा प्रयत्न केला आहे आणी हेच राष्ट्रसंताच्या साहित्याचं वेगळेपण आहे.

श्रीकांत दिगांबरराव धोटे
टाकळी चनाजी तालुका देवळी जिल्हा वर्धा
८०८७३३२५९३

14/10/2025

आमची संधी

*राष्ट्रसंतांच्या साहित्याचं वेगळेपण*            विसाव्या शतकातील मानवतावादी संत म्हणुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे ब...
25/03/2025

व्हा सावध सकल सुजनहो ! द्या निज-कर्माची ग्वाही ।।चहू बाजूनि ज्वाल उफळला, ही वेळ  सुखाची  नाही ।।धृ0।।कोणी कुणावर प्रेम ...
21/03/2025

व्हा सावध सकल सुजनहो ! द्या निज-कर्माची ग्वाही ।।
चहू बाजूनि ज्वाल उफळला, ही वेळ सुखाची नाही ।।धृ0।।

कोणी कुणावर प्रेम करीना ।
सत्तेसाठी मुरगळी माना ।
स्वार्थास्तव करिताती धिंगाणा ।। होss
देइल ही साक्ष कुणीही ।।१।।

नच मानवता उन्नत दिसते ।
नैतिकता ढासळली गमते ।
शब्दांचे अवडंबर नुसते ।। होss
हे कुठवर आता राही ।।२।।

म्हणोनी विनंती प्रिय बंधूंना ।
सहकारी जीवन बनवाना ।
सकळावरती प्रेमे करना ।। होss
तरि देश प्रगत हा होई ।।३।।

या संकटिया ! सहकारी व्हा ।
जातियतेच्या विसरुनि भावा ।
तुकड्यादास म्हणे सांगा हो-।। होss
संदेश भरा उत्साही ।।४।।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
गुरुकुंज आश्रम, दि. २0-0६-१९५९

19/02/2025

जय जिजाऊ जय शिवराय
संधी श्रीकांत धोटे

03/01/2025

सावित्रीची लेक मी
सावित्रीची लेक गं

21/10/2024

Tukdyadas told everyone, We are One
संधी श्रीकांत धोटे

देशाच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावुन येणारा मदतीचा हात हरपला ..... देशातील अनेक उद्योगपती वेगवेगळ्या मार्गाने शासनाकडे सवलत...
10/10/2024

देशाच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावुन येणारा मदतीचा हात हरपला .....
देशातील अनेक उद्योगपती वेगवेगळ्या मार्गाने शासनाकडे सवलतींचे दान मागत असतांना देशासाठी सढळ हाताने मदत करणारा अवलिया म्हणजे रतनजी टाटा ..... माणसातला देव म्हणजे काय ही संकल्पना समजून घ्यायची असेल त्याचे बोलकं उदाहरण म्हणजे रतनजी टाटा.....
भावपूर्ण श्रद्धांजली

02/10/2024
30/09/2024

तु विश्वाचे अधिष्ठान

भारतात प्राचिन काळापासुन काही अंशी नागर संस्कृती होती त्याचे अवषेश हडप्पा संस्कृतीच्या रुपाने आपणाला बघायला मिळाले. त्यानंतर राजे महाराजांच्या काळातही नागरी संस्कृती होती. ब्रिटीशांच्या आगमनानंतर औघोगीकरणामुळे नागरीकरणाला मोठया प्रमाणात चालना मिळाली. प्राचिन काळापासुन अर्वाचीन काळापर्यंतचा विचार केल्यास आर्थीक, सामाजीक व शैक्षणीकदृष्टया नागरीकरणाचे प्रमाण कमी असले तरी ग्रामाीण व नागरी हा भेद प्राचीन काळापासुन असल्याचे स्पष्ट होते. वंदनिय महाराजांनी ज्या काळात ग्रामगीता हा ग्रंथ लिहीला त्या काळात औघोगीकरणाचे व नागरीकरणाचे वारे वाहण्यास गती येत होती असे दिसुन येते त्यामुळे राष्टसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ निर्मीतीमागचे कारण स्पष्ट करतांना महाराज म्हणतात,
ईश्वरे व्यापीले हे विश्व् | म्हणोनी जगची आम्हा देव |
विश्वाचा मुळ घटक गाव | ग्रामगीता त्याचेसाठी ||
ईश्व्र हा सर्वाठायी आहे. विश्वाच्या प्रत्येक कणात देव आहे. त्याच्या उत्पत्तीचे मुळ हे गाव आहे. त्या गावातील लोकांना कल्याणाचा मार्ग दाखविण्यासाठी हा ग्रामगिता ग्रंथ आहे. गावातील सर्व घटकांचे कल्याण करण्यासाठी ग्रामगीता आहे. जसे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास भगवतगितेच्या रुपाने उपदेश देवुन कर्तव्याप्रती जागरुक केले होते त्याचप्रमाणे प्रत्येक गावास व गावातील प्रत्येक माणुस आपल्या स्वत:च्या कल्याणाप्रती जागरुक व्हावा याकरीता ग्रामगीता हा ग्रंथ आहे असे सांगतांना महाराज म्हणतात,
गिता बोधीली अर्जुनाला | ग्रामगीता ही सर्व ग्रामाला |
राहु नये कुणी मागासला | म्हणोनी बोलीला देव माझा ||
राष्टसंत तुकडोजी महाराजांनी विश्वकल्याणाची संकल्पाना ही ग्राम हे केंद्र माणुनच मांडली आहे.विश्वाचे कल्याण साधायचे असेल तर गावे ही सर्व दृष्टीने समृध्द झाली तर आणी तरच या अखील विश्वाचे कल्याण होणार आहे. विश्वकल्याणाची संकल्पना मांडतांना महाराजांनी पायावर भर दिला आहे आणी जोपर्यंत पाया मजबुत होणार नाही त्याशिवाय विश्वकल्याणाचा मार्ग प्रशस्त् होणार नाही. या विश्वातील सर्व माणुस आर्थीक दृष्टीनेच नाही तर सर्व दृष्टीने समृध्द व्हावा याकरीता ग्रामगिता हा ग्रंथ वंदनिय महाराजांनी निर्मीला आहे. महाराजांनी एकुण 41 अध्यायाचा ग्रामगीता ग्रंथ लिहील्यानंतर हा ग्रामगीता ग्रंथास एक 07 ओव्यांची अर्पण पत्रीका लिहीली आहे. आणी त्यात खऱ्या ग्रामनाथाच्या किंवा गावकऱ्यांच्या व्यथेचे चित्रण महाराजांनी केले आहे. ग्रामनाथाच्या व्यथेचे चित्रण करतांना महाराज अर्पण पत्रीकेत म्हणतात,
सर्व ग्रामासी सुखी करावे | अन्न् वस्त्र पात्रादी द्यावे |
परि स्वत: दु:खची भोगावे | भुषण तुझे ग्रामनाथा ||
कष्ट करोनी महाल बांधशी | परि झोपडीही नाही नेटकीशी |
स्वातंत्र्याकरीता उडी घेशी | मजा भोगती इतरची ||
राष्टसंतांच्या समग्र साहित्यात ग्राम व ग्रामनाथ हा केंद्रबिंदु आहे. सर्वांना अन्नधान्य पुरविणारा शेतकरी शेतात राब राब राबुन अन्नधान्य् पिकवितो, जगाची भुक भागवितो. महाल, राजवाडे, मोठमोठया इमारती बांधणारा मजुरास स्वत:चे घर नसते. या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामास या देशातील सर्वसामान्य् माणसाने बळ दिलं, आपल्या जिवाची बाजी लावली, प्रसंगी प्राणही समर्पीत केले पण स्वातंत्र्याच्या फळाचा त्याला किती फायदा झाला हा सुध्दा प्रश्न महाराज उपस्थित करतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लिहिलेल्या एका भजनात महाराज म्हणतात,
अब तो आया है स्वराज, अपना सुंदर गाव बनालो,
पहिला धर्म बढाओ किसानी, सुधरो अपनी घरजिंदगानी…
तुकडोजी महाराज हे संत असले तरी ते फक्त् आध्यात्मिक संत नव्हते तर वास्तववादी व पोटाची भुक जानणारा संत होता. ज्याने कधीही कर्तव्यकर्मासच रामनाम संबोधले. आणी खरे कर्तव्य करणाराच दु:ख भोगत आहे. त्याविषयीचे भाव त्यांच्या आचार विचारातुन प्रगट होतांना दिसुन येते त्यांनी तर ग्रामनाथास, शेतकऱ्यास, कष्टकऱ्यास ग्रामगिता अर्पण करतांना,
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो | सकळांचे लक्ष तुजकडे वळो मानवतेचे तेज झळझळो | विश्वामाजी या योगे ||
राष्ट्रसंतांच्या साहित्यात श्रमप्रतिष्ठेचे मोल हे जपले आहे व तशी जाण संपुर्ण समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या साहित्यातुन केला आहे. श्रमीकांची श्रीमंती ही गरिबाचे रक्त् आहे तर श्रम ही खरी गावाची देशाची दौलत आहे असे महाराज म्हणतात. अण्णाभाउु साठे जसे म्हणतात की, पृथ्वी हे शेषनागाच्या मस्तकावर नसुन कष्टकऱ्यांच्या घामावर उभी आहे तोच विचार महाराज आपल्या संपुर्ण लिखाणात मांडतात.आपण मानवतेच्या, मानवी हक्काच्या बाता मारतो पण जेव्हा या विश्वातील कष्टकऱ्यांच्या कष्टाचे खरे मोल होईल त्याच दिवशी मानवता खऱ्या अर्थाने या सृष्टीवर येईल आणी हे सांगतांना महाराज या कष्टकऱ्यास ग्रामनाथास विश्वाच्या अत्युच्च् शिखरावर घेउुन जातांना व ग्रामगीता ग्रामनाथास अर्पण कशासाठी हे स्पष्ट करतांना महाराज म्हणतात,
म्हणोनी तुजसी करीतो अर्पण | तु विश्वाचे अधिष्ठाने |
तुझेच व्हावे आधि उत्थान | विश्वामाजी म्हणोनिया ||
यामध्ये अधिष्ठान हा शब्द अतिशय महत्वाचा आणी श्रमाचे खरे मोल जानणारा आहे. हा शब्द महाराज जाणीवपुर्वक वापरतात. अधिष्ठान या शब्दाचा अर्थ पहायला गेलो तर अधिष्ठान म्हणजे आधार ज्यावर दुसरी कोणतीही वस्तु आधारलेली असते. अधिष्ठान म्हणजे श्रध्दास्थान ज्यावर आपला विश्वास असतो. मुख्यत: आपण आपल्या घरातील देव्हाऱ्यास, ज्याठिकाणी आपले श्रध्दास्थान असते त्यास अधिष्ठान असे म्हणतो. राष्टसंतांनी सामुदायीक प्रार्थना सांगीतली त्यात सामुदायीक प्रार्थनेप्रसंगी कोणत्याही देवीदेवतेची मुर्ती, फोटो न ठेवता त्याठिकाणी एक आसन ठेवुन त्या अधिष्ठानावर आपण आपल्या पुज्यनियास पहावयाचे आहे. आपले अधिष्ठान ते असते ज्याविषयी आपले सर्वस्व् समर्पीत असते. त्या अधिष्ठानावर तुकडोजी महाराजांनी ग्रामनाथास, शेतकरी व कष्टकऱ्यास बसवुन संपुर्ण विश्वाचा आधार हा ग्रामनाथ असल्याचे व त्या ग्रामनाथावरच सर्व सृष्टीचा डोलारा उभा असल्याचे निक्षुन सांगीतले आहे. आणी त्या ग्रामनाथाचा जोपर्यंत उध्दार होणार नाही तो समृध्द होणार नाही तोपर्यंत या विश्वात आनंदीआनंद निर्माण होणार नाही हा विचार महाराजांनी देवुन शेतकऱ्यास, कष्टकऱ्यास विश्वाच्या देव्हाऱ्यात नेवुन बसविले आहे. आणी खऱ्या अर्थाने कष्टकरी ग्रामनाथाच्या कष्टास खरी किंमत दिली आहे. यापुर्वी कष्टकऱ्यास देव्हाऱ्यात नेउुन बसविण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही कदाचित तो भविष्यातही होणार नाही. त्यामुळे फक्त् राष्टसंतानी दिलेले हे स्थान फक्त् कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी ओळखणे आवश्यक नसुन श्रमाचे मोल, पिकविणाऱ्याचे मोल अखिल मानवजातीने लक्षात घेणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने मानवतावादी दृष्टीकोनाचा विकास होणार असुन या विश्वात समृध्दी येणार आहे मात्र या कष्टकऱ्यांच्या श्रमाची कुचेष्ठा होतांना पाहुन राष्टसंतांचा विचार सर्वसामान्य व उच्चशिक्षीतात, राज्यकर्त्यांमध्ये होणे आवश्यक आहे.
सगळीकडे याबाबत उलटी गंगा वाहत असतांना राष्टसंतांचा हा क्रांतीकारी विचार जो विश्वकल्याण साधणारा आहे. खरी मानवता रुजविणार आहे. तो विचार रुजविण्याकरीता आपल्या खारीचा वाटा या भुतलावरील प्रत्येक मानसाने दिल्यास तो मंगल दिवस उगवेल याबाबत शंका असण्याचे कारण नाही.

श्रीकांत दिगांबरराव धोटे
टाकळी चनाजी जिल्हा वर्धा
8087332593

विद्यार्थिदशेतील शेतकऱ्याच्या पोरांनो बापाच्या शेतीला गृहीत धरू नका.             गावातून असाच फेरफटका मारत असतांना गावाच...
27/05/2024

विद्यार्थिदशेतील शेतकऱ्याच्या पोरांनो बापाच्या शेतीला गृहीत धरू नका.

गावातून असाच फेरफटका मारत असतांना गावाच्या जुन्या आठवणीत मन रमत होतं. ज्या गावाच्या गल्लीबोळातून आपण हिंडलो, खेळलो त्या आठवणी सहज येत होत्या. याच गावानं, या मातीनं आपलयाला घडवलं, जगवलं. जगायला आणि लढायला शिकवलं असे एकएक विषय नजरेसमोरून सरकत होते. हे सर्व होत असतांना गावातील नवयुवक म्हणजे कोवळी विद्यार्थीदशेत मुले बसली होती. हि तीच मुले जी या गावाचा उद्याचं भविष्य आहे. गावची शान, मान, सन्मान आणि झाला तर अपमानही. काय करत होती माहित नाही पण मी नकळत त्यांच्या संवादाचा कानोसा घेतला आणि थोडा अस्वस्थ झालो. तर काय होता त्यांचा संवाद......
१- काय लेका काय कराव तर काही समजत नाही मले.
२- काहून का झाला गा बापू ?
१- काही नाही बे, पेपर येईन आता अभ्यास करा लागण अन त्याच्यातही काय होते त....
२- मंग कायले टेन्शन घेत बे तू
१- टेंशन नाही बे पण लेका पास त झालो पाहिजे न...
३- काय लेका होईन त होईन नाही त नाही
१- नाही त नाही म्हणजे
३- आबे नाही झाला तरी काही फरक नाही पडत. आपल्याला कुठं नवकरी भेटणार आहे.
१- तस नाही बे ....
३- तसं नाही त कसं ?
१- पण आपल्या मायबापले वाटते नं, का आपल्या पोरानं शिकावं ..... नवकारीले लागावं ...
२. कायले टेन्शन घेतं बे आगाऊचं, सगळ्याच मायबापले तस वाटते .... का माया पोरानं शिकावं ... नवकरीले लागावं .....
१. हो ना यार...
३. अबे ! सगळेच नवकरी करण त शेती कोण सांभाळण बे..
२. काय बिनकामाचा टेन्शन घेता राज्या तुम्ही.... हे १० एकर आहे त ते कोण संभाळण ?
३. तिले त सांभाळले कोणीतरी लागण ना....
२. शेतीच जगवते लेका आपल्याले कायले कोणाची कुत्तेखानी कराची....
३. हो न ...... रिकामा टेन्शन घेता लेका तू ......
२. मायबाप म्हणतच असतात.... एका कानान आयकायचं अन दुसर्यांना सोडून द्याचं ....
३. दोन कान त्याच्यासाठीचं तर दिले आहे देवानं.... चार दिवस बोलन न देईन सोडून....
२. लक्षात ठेव वावर आहे त पावर आहे.
"वावर आहे तर पवार आहे" हि भावना शेतकऱ्यांच्या तरुण पोरांमध्ये असण्याचा सध्या ट्रेंड आहे. आणि तो असावाही. कारण शेतीच आपल्याला जगवते आणि त्याचा अभिमान शेतकऱ्यांच्या पोरांनी ठेवावा यात काही गैर नाही. कोणताही व्यवसाय कनिष्ठ नसतो, नाही. मात्र शेती आहे म्हणून आपल्याला काहीच करायची गरज नाही हि भावना चुकीची आहे. चुकीची म्हणण्यापेक्षा जीवघेणी आहे. आणि तीच भावना विद्यार्थिदशेतील युवकांमध्ये वाढत आहे जी धोकादायक आणि आपल्या भविष्याला खुंटवणारी आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण आज त्याची अवस्था काय आहे ते समजून घ्या, राष्ट्रसंत म्हणतात ,
सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे,
परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा .....
आणि हे दुःख गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी भोगत आहे. आपला बाप आपल्याला लागेलं तेव्हा पैसे देतो, म्हणेल ते करतो, मोठमोठया कॉलेज ची फी भरतो याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी घबाड शिल्लक आहे असे समजू नका. आपला बाप आपल्यासाठी आडाचं देड करून हे सगळं करीत असतो. का तर आपला मुलगा / मुलगी शिकावी आणि मोठी व्हावी हीच त्याची प्रामाणिक इच्छा असते. कदाचित आपल्याला आपल्या घरी आलेलं पिकाचे मोठमोठे ढीग दिसतात. विकल्यावर त्याचे आलेले पैसे दिसतात त्या पैश्यावर हुरळून जाऊ नका. आपल्या बापाला विचारा त्यापैकी शिल्लक किती असणार आहे आणि मग आपल्या वाटा निवडा. अरे सगळ्यांनाच वाटतं कि शेती किती फायद्याची आहे ते. कशावरून तर आलेल्या पिकांच्या ढिगावरून. पण त्यामागे तुमच्या मायबापाचे कष्ट किती, त्यासाठी केलेला खर्च किती याचा कधीतरी मागोवा घ्या. बाहेरून बघणार्यांना शेती हि कायम फायद्याची आहे आणि शेतकरी हा नेहमी ओरडत असतो हा त्यांचा समज असतो तो तुमचाही कधी होऊ देऊ नका. कधी कधी तुम्हाला तुमचा बाप अडानीही वाटतो का तर तो पारंपरिक पद्धतीने शेती करतो, नवीन प्रयोग करत नाही म्हणून आणि माझ्या हातात शेती आली तर बघा मी कसे पैसे कमावतो, बापाला शेतीच करता येत नाही असे मनातहि आणू नका. कारण तुमचा बाप जे करतो ते त्याची ऐपत, संसाधने आणि त्यातून होणारे संभाव्य धोके व ते सोसण्याची आपल्या बापाची ऐपत, त्याचे पूर्वानुभव हे सगळे लक्षात घेऊनच कोणताही निर्णय घेत असतो. असं म्हणतात कि पैसे अक्कल शिकवितो त्याप्रमाणेच शेतीच आहे. आपल्या बापाला जसजसे अनुभव येतात त्यातून हे सगळं घडत असतं.
म्हणून विद्यार्थिदशेतील शेतकऱ्यांच्या पोरांनो आपल्या बापाच्या कष्टाचा कधीतरी कानोसा घ्या आणि आपल्या भविष्याची दिशा ठरवा. मी कधीही म्हणणार नाही कि तुम्ही नोकरीसाठी शिक्षण घ्या. आपण शिकल्याने आपल्याला नोकरी मिळेलच याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. आपल्याला मिळालेल्या नोकरीने आपण सुखी समाधानी होऊ असेहि काही नाही. नोकरी मिळाली तर पैसे मिळेल, शासकीय असली तर सुरक्षितपना वाटेल पण हा टप्पा खूप मोठा आहे. शेती करण्यासाठी सुद्धा शिक्षण हे आवश्यक आहेच. भविष्यात कोणतीही वाट निवडा, वाटल्यास शेती करा पण मित्रांनो आजच आपल्या मनात माझ्याकडे १०/२० एकर शेती आहे. आणि ती केली तरी मी जगेल हा गंड मनात वाढू देऊ नका. भविष्यात जे होईल ते होईल, जशी परिस्थिती येईल तसे निर्णय घ्या पण आज आपल्या हाती आहे त्या आजचा उपयोग प्रामाणिकपणे करा. कारण माझ्याकडे शेती आहे व भविष्यात मी ती करू शकतो व मला काही करायची गर नाही आताच्या सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास मी Already Settle आहे हि भावना मनात येऊ देऊ नका. जे होईल ते पुढे होईल पण माझा बाप ज्या आकांक्षेने माझ्यासाठी मरमर करतोय ते सार्थकी लावण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहे हि भावना कायम मनात ठेवा आपले भविष्य मग ते कोणत्याही क्षेत्रात असो उज्वलच असेल यात माझ्या मनात शंका नाही.

उज्वल भविष्याकरिता खूप खूप शुभेच्छा !

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी
८०८७३३२५९३

Address

Wardha
442001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrikant dhote posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share