08/12/2024
राज्यात पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे म्हणजेच महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी राजभवन येथे महामहिम राज्यपाल मा.श्री.सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि इतर मित्र पक्षांनी एकमताने मुख्यमंत्री पदासाठी श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन देणारे पत्र राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केले आहे.
याप्रसंगी भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री मा. निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री मा.श्री. विजय रूपानी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार, शिवसेना पक्ष प्रमुख मा. श्री. एकनाथजी शिंदे, मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.श्री. प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनिलजी तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, खा.श्री. अशोकरावजी चव्हाण, श्री. रावसाहेब दानवे तसेच महायुतीतील इतर मान्यवर उपस्थित होते.
Governor of Maharashtra Nirmala Sitharaman Vijay Rupani Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Praful Patel Sunil Tatkare Ashok Chavan Raosaheb Patil Danve
Chandrashekhar Bawankule