Santosh Nagubhau Barne Yuva Manch

Santosh Nagubhau Barne Yuva Manch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Santosh Nagubhau Barne Yuva Manch, Chinchwad.

*अभिष्टचिंतन समारंभ*  *मावळ लोकसभेचे कार्यसम्राट महासंसदरत्न  खासदार आदरणीय श्री. श्रीरंग अप्पा बारणे* यांच्या *वाढदिवसा...
16/02/2026

*अभिष्टचिंतन समारंभ*

*मावळ लोकसभेचे कार्यसम्राट महासंसदरत्न खासदार आदरणीय श्री. श्रीरंग अप्पा बारणे* यांच्या *वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करताना.*
🎂💐

महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व स्व.अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 📍 स्थळ: संत...
01/02/2026

महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व
स्व.अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
📍 स्थळ: संतोष नगर, संतोष मंगल कार्यालय, थेरगाव. 🗓 तारीख: मंगळवार, ०३ फेब्रुवारी २०२६ | सायंकाळी ६ वाजता. आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. 🙏

कामाचा वादा हे नुसते वाक्य नाही, तर ज्यांनी ते आयुष्यभर जगून दाखवले... पहाटेची ती कामाची सुरुवात आणि जनतेसाठीची ती अखंड ...
28/01/2026

कामाचा वादा हे नुसते वाक्य नाही, तर ज्यांनी ते आयुष्यभर जगून दाखवले...
पहाटेची ती कामाची सुरुवात आणि जनतेसाठीची ती अखंड धडपड आता फक्त आठवणीत राहील.
शब्दाला जागणारा आणि 'कामाचा वादा' शेवटच्या श्वासापर्यंत निभावणारा
आपला दादा आज हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐

*विश्वास, विकास आणि सेवाभावाचा हॅट्रिक इतिहास*✌️*प्रभाग क्रमांक २४  थेरगाव*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निव...
19/01/2026

*विश्वास, विकास आणि सेवाभावाचा हॅट्रिक इतिहास*
✌️

*प्रभाग क्रमांक २४ थेरगाव*

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग क्रमांक २४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार *सौ. मायाताई संतोष बारणे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक नगरसेविका होण्याचा मान पटकावला.* हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून, थेरगावच्या जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या अढळ विश्वासाची पावती आहे.

या यशामागे *श्री. संतोष अण्णा नागुभाऊ बारणे* मा. विरोधी पक्षनेते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे भक्कम नेतृत्व आहे. २००७ साली प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेले. संतोष अण्णा यांनी २००९ मध्ये विरोधी पक्षनेतेपद भूषवले. २०१२ व २०१७ मध्ये *सौ. मायाताई संतोष बारणे नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि २०२६ मध्ये त्यांनी विकासाच्या जोरावर नवा इतिहास रचला.*

*संतोष अण्णा आणि मायाताई दोघांची मिळून ही नगरसेवक पदाची चौथी टर्म असून, हे यश म्हणजे थेरगावकर नागरिकांनी त्यांच्या कार्यावर टाकलेला सार्थ विश्वास आहे.*

थेरगाव परिसरात राबवलेल्या भरीव विकासकामांमुळे हा विजय अधिक ठळक ठरतो.
डांगे चौक येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ग्रेड सेपरेटर, गुजर नगर परिसरात सबवे, मंगल नगर ते थेरगाव फाटा २४ मीटर रस्ता रुंदीकरण व शोभिकरण, नगर येथील लक्ष्मी बारणे उद्यानाचे नूतनीकरण, लक्ष्मीबाई बारणे उद्यानात ओपन जिम, गुजर नगर येथे महिलांसाठी बंदिस्त जलतरण तलाव, तसेच २५ दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली.

आनंदवन येथे खेळाचे मैदान विकसित, थेरगाव परिसरात १५ ट्रान्सफॉर्मर उभारणी, डांगे चौक येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य शिल्प, तसेच शासन आपल्या दारी ही कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात आली.

कोविड १९ महामारीच्या कठीण काळात बारणे कुटुंबीयांनी स्वतःच्या स्वखर्चाने औषध फवारणी, अन्नधान्य किट वाटप, डॉक्टर आपल्या दारी, कोविड लसीकरण, ट्रॅव्हल ई-पास, रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे अशा अनेक सेवा दिल्या. दुःखद प्रसंगी प्रत्यक्ष सहभाग ही त्यांच्या कार्याची ओळख ठरली.

महानगरपालिकेतील अनेक भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणत त्यांनी प्रशासनाला जबाबदार धरले.
जय गणेश नागरी पतसंस्था यांच्या माध्यमातून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला जातो.

शिक्षण, आरोग्य व सामाजिक बांधिलकी यावरही त्यांचा भर आहे. थेरगाव परिसरातील दहावी, बारावी व उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी सन्मान सोहळा, मार्गदर्शन व्याख्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत, गौरी गणपती सजावट स्पर्धा, तसेच प्रगती शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ दिला जातो.

अध्यात्माची आवड जपत आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा सन्मान करण्याची परंपराही बारणे परिवाराने जपली आहे.

*या सर्व कार्याची दखल घेतच थेरगावच्या जागरूक नागरिकांनी सौ. मायाताई संतोष बारणे यांना तिसऱ्यांदा नगरसेविकेपदी विराजमान केले आहे.*
⏰✌️💐🤝

*२४ तास नागरिकांसाठी उपलब्ध, नागरिकांच्या सुख–दुःखात नेहमी सहभागी राहणारे हे नेतृत्व म्हणजेच खऱ्या अर्थाने लोकसेवेचे प्रतीक आहे.*

*लेखन* 🖋️:
*श्री. ऋषिकेश रेवणनाथ काशिद*
डायरेक्टर : हेड ऑपरेशन : नमस्ते टीव्ही मराठी.

*पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक : रंगत वाढतेय, पारडे झुकतेय!*पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांना आता अवघे आठ ...
08/01/2026

*पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक : रंगत वाढतेय, पारडे झुकतेय!*

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांना आता अवघे आठ दिवस शिल्लक राहिले असून, सुरुवातीला भाजपसाठी सोपी वाटणारी ही निवडणूक आता संघर्षाच्या टप्प्यावर आल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपाकडून “१२५ पार” असा आत्मविश्वासपूर्ण नारा देण्यात आला होता. भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी हा नारा दिल्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया अत्यंत गुप्त पद्धतीने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणापर्यंत सुरू ठेवण्यात आली.

मात्र, याच धोरणाचा फटका भाजपलाच बसल्याचे सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे. अनेक इच्छुक उमेदवार नाराज झाले असून, काहींनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. ही नाराजी भाजपाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम करणारी ठरत आहे.

दरम्यान, राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (श्री अजितदादा पवार गट) आणि शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृत युती काही ठिकाणी जाहीर केली होती. या युतीनंतर निवडणुकीचे राजकीय समीकरणच बदलले आहे. अजित पवार यांनी पिंपरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर नाव न घेता सविस्तर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रचारसभेत थेट उत्तर देणे टाळले. परिणामी, त्या सभेचा अपेक्षित परिणाम मतदारांवर झाला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने वातावरणनिर्मिती होऊ लागली आहे. सूक्ष्मस्तरावर निवडणूक नियोजन करत अजित पवार स्वतः पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत सभा घेताना दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे हळूहळू जड होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मात्र, येणाऱ्या आठ दिवसांत दोन्ही पक्षांकडून कोणत्या घडामोडी घडतात, यावर अंतिम निकालाचा कल ठरणार आहे.

*विशेषतः प्रभाग क्रमांक २४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री अजितदादा पवार गट) आणि शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) यांच्या युतीमुळे ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.*

*शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री अजित पवार गट) चे नेते व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते श्री संतोष अण्णा नागुभाऊ बारणे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.*

*प्रचारादरम्यान वाढणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री अजित दादा पवार गट )व शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) युतीचे अधिकृत उमेदवार यांची लोकप्रियता हीच त्यांच्या विजयाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.*

एकूणच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक आता अत्यंत चुरशीची बनली असून, शेवटच्या टप्प्यातील राजकीय हालचाली शहराचा कौल कोणाच्या बाजूने लागतो हे ठरवणार आहेत.

*लेखन*
*श्री ऋषिकेश काशिद*
डायरेक्टर : हेड ऑपरेशन : नमस्ते टीव्ही मराठी.

05/01/2026

फक्त आश्वासने नाही, तर प्रत्यक्ष काम! 🏗️💯

गुजर नगर भुयारी मार्गाचे हे दृश्य साक्ष देतेय आपल्या प्रभागातील विकासाच्या वेगाची.
सौ. मायाताई संतोष बारणे यांच्या नेतृत्वाखाली,
प्रभाग क्रमांक २४ मध्ये विकासाची गंगा अशीच वाहत राहणार आहे.

जिथे प्रश्न सुटतात आणि प्रगती दिसते, तिथेच जनता विश्वास ठेवते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ करिता आपल्या हक्काच्या नेत्याला साथ द्या! 🙏

प्रभाग २४ च्या सर्वांगीण विकासासाठी एकच पर्याय - सौ. बारणे मायाताई संतोष.
१५ जानेवारीला आपले अमूल्य मत 'घड्याळ' चिन्हा समोरील १ नंबरचे बटण दाबून द्या
आणि विकासाला साथ द्या. ⏰☝️

📍 प्रभाग क्र. २४ | शिवसेना - राष्ट्रवादी युती

⏰  ➕  🏹  ➕  🛺*एकता, निष्ठा आणि लोकहितासाठी घेतलेला निर्णय*पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (श...
03/01/2026

⏰ ➕ 🏹 ➕ 🛺

*एकता, निष्ठा आणि लोकहितासाठी घेतलेला निर्णय*

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री अजितदादा पवार गट) यांची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर, प्रभाग क्रमांक २४ मध्ये एक महत्त्वाचा व आदर्श निर्णय घेण्यात आला आहे. या युतीच्या पार्श्वभूमीवर *श्री संतोष अण्णा नागुभाऊ बारणे* आणि *श्री मंगेश मच्छिंद्र बारणे* यांनी *आपले निवडणूक अर्ज माननीय श्री अजित दादा पवार यांच्या सूचनेनुसार मागे घेतले आहेत.*

हा निर्णय म्हणजे केवळ राजकीय डावपेच नाही, तर संघटनात्मक शिस्त, नेतृत्वावर विश्वास आणि लोकहिताला प्राधान्य देणारी परिपक्व भूमिका आहे. आम्ही सर्वजण श्री संतोष अण्णा बारणे यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या दूरदृष्टीला सलाम करतो. वैयक्तिक इच्छांपेक्षा पक्ष, युती आणि कार्यकर्त्यांचे हित महत्त्वाचे मानणारे नेतृत्व म्हणजेच खरे लोकनेतृत्व.

प्रभाग क्रमांक २४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री अजितदादा पवार गट) आणि शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) यांच्या युतीमुळे, *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. मायाताई संतोष बारणे*⏰ यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. तसेच *शिवसेना श्री एकनाथ शिंदे गटातील युतीचे उमेदवार श्री विश्वजीत श्रीरंग बारणे( 🏹) , श्री निलेश हिरामण बारणे (🏹) व शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अपक्ष पुरस्कृत उमेदवार सौ रुपालीताई लालासाहेब गुजर ( 🛺) यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून, पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करण्याचा आम्ही निर्धार करीत आहोत.*⏰➕🏹 ➕🛺

ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी एकत्रितपणे लढण्याची वचनबद्धता आहे. कार्यकर्त्यांची ताकद, नेत्यांची दिशा आणि जनतेचा विश्वास याच्या बळावर ही युती प्रभाग क्रमांक २४ मध्ये नक्कीच विजयी ठरेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

एकजूट, निष्ठा आणि लोकसेवेच्या या मार्गावर आम्ही अखंडपणे पुढे जात राहू हेच या निर्णयातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

*आपला*
*श्री ऋषिकेश रेवणनाथ काशिद*
*अध्यक्ष* : कुंभार समाजोन्नती मंडळ, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

⏰➕🏹➕🛺
✌️💐🤝

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री अजितदादा पवार गट) व शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) युतीचे उमेदवार*

*सौ.बारणे मायाताई संतोष*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (श्री अजित दादा पवार गट) च्या अधिकृत उमेदवार
निवडणूक चिन्ह : ⏰ ( घड्याळ)

*श्री.बारणे विश्वजीत श्रीरंग*
शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार
निवडणूक चिन्ह : 🏹 ( धनुष्यबाण )

*श्री. बारणे निलेश हिरामण*
शिवसेना (श्री एकनाथ शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार
निवडणूक चिन्ह : 🏹 ( धनुष्यबाण )

*सौ. गुजर रूपालीताई लालासाहेब*
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीच्या पुरस्कृत उमेदवार)
निवडणूक चिन्ह : 🛺 ( ऑटो रिक्षा )

*यांना प्रचंड बहुमताने विजयी करा*

*शिक्षणातून प्रगती, गुणवत्तेचा गौरव**समाजघडणीचा वसा पुढे नेणारे नेतृत्व*समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया शिक्षणावर उभा ...
28/12/2025

*शिक्षणातून प्रगती, गुणवत्तेचा गौरव*
*समाजघडणीचा वसा पुढे नेणारे नेतृत्व*

समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया शिक्षणावर उभा असतो. ही बाब कृतीतून सिद्ध करून दाखवणारे कार्य म्हणजे कै. नागुभाऊ गतीराम बारणे व त्यांच्या पत्नी कै. रणुबाई नागुभाऊ बारणे यांनी १९८९ साली सुरू केलेला शैक्षणिक प्रवास. पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेतील संतोषनगर, थेरगाव परिसरात गरीब व गरजू कुटुंबातील मुला-मुलींसाठी शिक्षणाचा प्रकाश पसरवण्याचा हा संकल्प आजही तितकाच प्रेरणादायी ठरत आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, कै. नागुभाऊ गतीराम बारणे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेला तब्बल १० गुंठे जागा विना मोबदला दिली. कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ समाजाच्या भविष्यासाठी आणि शिक्षणाच्या पवित्र कार्यासाठी दिलेले हे योगदान अत्यंत अनमोल व दुर्मिळ आहे. अशा त्यागातूनच शिक्षणसंस्थेची भक्कम पायाभरणी झाली.

या आदर्श विचारांचा वारसा पुढे नेत माजी विरोधी पक्षनेते श्री संतोष नागुभाऊ बारणे व माजी नगरसेविका सौ. मायाताई संतोष बारणे यांनी प्रगती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून शिक्षणाला आधुनिकतेची जोड दिली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर संस्कार, शिस्त, स्पर्धात्मक वातावरण आणि आत्मविश्वास देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले.

“विद्या सन्मान, प्रगतीचा आधार” हा संदेश समाजात रुजवत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबवून त्यांनी तरुण पिढीमध्ये आत्मविश्वास, प्रेरणा व प्रगतीची उमेद निर्माण केली. या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही प्रोत्साहन मिळाले, ही बाब या कार्याची व्यापकता दर्शवते.

या सर्व शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक कार्याची दखल घेत आज संपूर्ण परिसरात श्री संतोष नागुभाऊ बारणे व सौ. मायाताई संतोष बारणे यांच्याविषयी विश्वास, आदर व आपुलकी निर्माण झाली आहे. सामान्य जनतेशी नाळ जोडलेले, विकासाभिमुख आणि समाजहित जपणारे हे नेतृत्व पिंपरी–चिंचवडच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवत आहे.

म्हणूनच पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक सन २०२६ साठी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री अजितदादा पवार गट) चे इच्छुक उमेदवार,
*माजी विरोधी पक्षनेते श्री संतोष नागुभाऊ बारणे* व *माजी नगरसेविका सौ. मायाताई संतोष बारणे*
यांना प्रभाग क्रमांक २४ मधून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मी सर्व सुज्ञ मतदारांना करीत आहे.

शिक्षण, विकास आणि विश्वास यांची सांगड घालणाऱ्या या नेतृत्वाला साथ देऊन प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया.

प्रचंड बहुमताने विजय निश्चित करूया!
*प्रभाग २४*
⏰✌️

आपला,
*श्री ऋषिकेश रेवणनाथ काशिद*
*अध्यक्ष* : कुंभार समाजोन्नती मंडळ, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा.

28/12/2025

Address

Chinchwad

Telephone

+919890901081

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Nagubhau Barne Yuva Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Santosh Nagubhau Barne Yuva Manch:

Share