Parmeshwar Adhav Patil

Parmeshwar Adhav Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parmeshwar Adhav Patil, Latur.

11/03/2024

मी मराठा आहे! होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी! असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे. ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला". दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये. घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत. इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा. आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात".

02/03/2024
26/02/2024

हनुमान जेव्हा सीतेला लंकेत शोधण्याच्या आपल्या मोहिमेवर निघाले तेव्हा त्याच्या मनात संशयाचे वातावरण पसरले. शक्तीशाली ऋषींनी आपल्या शक्तींना सर्वात जास्त गरज असताना विसरून जाण्याचा शाप दिल्याने, त्याला समोरच्या कठीण कार्याला तोंड देणारा ठग वाटला. त्याला वाटले की समुद्र पार करणे त्याच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. प्रेरणा आणि नेतृत्व करण्याच्या इतरांच्या अपेक्षांच्या वजनामुळे त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

आज बऱ्याच नेत्यांना अनेकदा इम्पोस्टर सिंड्रोमचा सामना करावा लागतो, असे वाटते की ते त्यांच्या भूमिकेसाठी पुरेसे चांगले नाहीत किंवा पात्र नाहीत. इम्पोस्टर सिंड्रोम म्हणजे तुमचे यश तुमची कौशल्ये, बुद्धिमत्ता किंवा पात्रता यापेक्षा नशीब किंवा इतर बाह्य घटकांमुळे आहे असा आंतरिक विश्वास आहे. तुम्हाला अनिश्चितता आणि आत्म-संशयाची भावना येऊ लागते.

इम्पोस्टर सिंड्रोम तुम्हाला नवीन प्रकल्प किंवा नवीन भूमिका नियुक्त केल्यापासून सुरू होऊ शकते. चिंता बळावते, आणि तुम्ही एकतर विलंब लावू शकता किंवा तणावाच्या बिंदूपर्यंत जास्त तयारी करू शकता. खोटेपणाच्या भावनांशी लढण्यासाठी येथे काही संरक्षण यंत्रणा आहेत:

तुमच्या सामर्थ्याचा दावा करा: तुमच्या कमकुवततेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुमची मालमत्ता स्वीकारा आणि त्यांचा अधिकाधिक फायदा कसा घ्यायचा यावर विचार करा. स्वतःसाठी वकिली करा आणि तुमच्या सामर्थ्याचे मालक व्हा.

काही वेळाने स्वत:ला पाठीशी घालणे: पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही केलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला बरे वाटेल तेव्हा तुमचे कर्तृत्व साजरे करा. ओळखा की तुमची कौशल्ये आणि प्रतिभा तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी किंवा एखादा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण करण्यास सक्षम करते. तुमच्या यशाची यादी करा आणि तुम्हाला आतापर्यंत यश मिळवण्यास मदत करणाऱ्या कौशल्ये, क्षमता आणि गुणांचे वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करा.

तुमच्या समवयस्कांकडून शिका: इम्पोस्टर सिंड्रोमचे एक सामान्य लक्षण म्हणजे तुमची तुमच्या समवयस्कांशी तुलना करणे आणि तुम्ही तुमच्या कामात त्यांच्यापेक्षा वाईट आहात असा विचार करणे. स्वतःची इतरांशी तुलना करण्याची सवय लावू नका. एकमेकांना स्पर्धा म्हणून पाहण्यापेक्षा, तुम्ही तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी एकत्र काम करू शकता.

विश्वास मर्यादित करण्याचे आव्हान: यशाच्या निकषांबद्दल तुमच्या खोलवर बसलेल्या विश्वासांचे परीक्षण करा. नंतर हे निकष वैध आहेत की नाही आणि ते तुम्हाला कसे रोखू शकतात हे तपासण्यासाठी तथ्ये किंवा उदाहरणे शोधा.

इम्पोस्टर सिंड्रोम हा एक आव्हानात्मक अनुभव असू शकतो परंतु जागरूकता, आत्म-चिंतन आणि समर्थनासह त्यावर मात करता येते. म्हणून, जांबवन सारख्या उत्साहवर्धक मित्र आणि हितचिंतकांनी स्वतःला वेढून घ्या, जे आमच्या क्षमता आणि यशांचे एक मौल्यवान स्मरण म्हणून काम करतात, ज्याप्रमाणे हनुमानाने एका झेप घेऊन महासागर पार केला त्याप्रमाणे आम्हाला अडचणींवर मात करण्यास प्रवृत्त करते.

शूरता हा माझा आत्मा आहे,‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,क्षत्रिय हा माझा धर्म आहे,छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,हो...
19/02/2024

शूरता हा माझा आत्मा आहे,
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे.
जय शिवराय

07/08/2022

75 साल से तिरगां ही हमारा राष्ट्रीय ध्वज है
ध्यान न भटकाओ लोगो का ओर घर-घर रोटी हर घर रोज़गार दो ताकि देशवासी भुख से न मरें.

10/08/2020

माझ्या देशातील राजकारणी नेहमीच मूर्ती, मंदिरे आणि मशिदी बांधायला पुढे असतात पण चांगले आरोग्य आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारायला कधीच तयार नसतात. बहुतेक लोक धर्मापेक्षा कधीच पुढे येत नाहीत. # आता विचार करण्याची आणि भारताची भक्कम पाया उभारण्यासाठी पुढे येण्याची वेळ आली आहे. आपण कसे आणि केव्हा जागा होतो हे पाहूया.
think.

21/07/2020

ऊसाला पर्याय शतावरी एकरी सहा लाख

14/07/2020

युवा नेता होण्यासाठी लागणारं साहित्य अन पात्रता -

1) डुप्लिकेट कोल्हापुरी चप्पल
2) दोनशे रु.चा व्हाईट लिनन शर्ट अन पॅन्ट

(शर्टच्या खिशात बाहेरून दिसेल अशी पाचशेची एक नोट त्यातही आतून दहा-दहा च्या नोटा, पॅन्ट शक्यतो जास्त पातळ नसावी आतली लाल अंडरवियर दिसू शकते)

3) खिशात अन तोंडात मावा
4) एखादा ब्रँडेड दिसणारा पेन

5) फेसबुक अकाउंट, जरासा मोठा मोबाईल
6) नेत्यांसोबत चार-दोन फोटो
7) चार-दोन बातम्या आणि बॅनर
😎 पेट्रोल तळाला गेलेली एखादी बाईक (त्यावर साहेबांचा फोटो)
9) उधारी असलेलं चहाचं हॉटेल, टपरी
10) सत्तर रुपयाचा लिंबा खालचा गॉगल ( कलर शक्यतो काळा असावा )

पात्रता: प्रचंड बेरोजगार असावा

झाला लगी;
आमचं काळीज,
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, मार्गदर्शक,

भावी सरपंच, साहेबांचा विश्वासू,
उमलतं नेतृत्व,
आधारस्तंभ ....!!
वगैरे वगैरे .
😄😄🤣🤣😄😄

12/07/2020

प्रत्येक मंत्री आपल्या जिल्ह्याचा स्वतःला पाहिजे तसा निर्णय घेत आहे. अधिकारी वाट्टेल तसे बदलले जात आहेत.

कोरोनाचा नेमका किती फैलाव झाला की लाॅकडाऊन करायचा याची कोणतीही शास्त्रीय सांगड नाही. एकनाथ शिंदेंच्या मनात आलं की ठाण्यात लाॅकडाऊन, दादांना वाटलं की पुणे लाॅकडाऊन.

हाॅस्पीटलमध्ये जागा नाही कारण ज्यांना परवडतं ते लोक सौम्य लक्षणासाठीही हाॅस्पिटलचे बेड अडवत आहेत.

राज्यात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. मुख्यमंत्री पवार साहेबांच्या भेटीला किंवा साहेब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अशी बातमी दोन दिवसाला एकदा तरी दिसतेच. आरोग्यमंत्री राजेश टोपे अत्यंत गंभीरपणे काहीतरी सांगत होते. काय सांगतात ते ऐकण्यासाठी टीव्हीचा आवाज चालू केला तर ते अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीचं मेडिकल बुलेटीन अतिशय एकाग्रतेनं सांगत होते.

निष्पत्ती नेमकी काय? परीणाम काय? कुठे दिसत आहेत?

राज्याची तीच गत केंद्राची. फार पूर्वी धारावीत त्यांचं पथक येऊन गेलं त्यानंतर केंद्रानं जणू महाराष्ट्रात कोरोना संपला असं मनोमन पटवून घेतलं. आयसीएमआरच्या, गृहमंत्रालयाच्या पत्रकार परिषदा बंद झाल्या.

देशभरातला लाॅकडाऊन मोदीजींनी त्यांच्या टीव्हीलोलूप प्रतिमेला जागून आधी आपल्या हातात ठेवला. एकवीस दिवसात पहा कसा कोरोनाला संपवतो छाप घोषणा दिल्या. मग अपयश येत गेलं तसा लाॅकडाऊनचा विषय हळूच राज्याकडे सरकवला. राज्याच्या कॅबिनेटनं संबंधित पालकमंत्र्यांकडे. पालकमंत्र्यांनी खालच्या अधिकार्यांकडे. तूर्त मंत्री आपापल्या जिल्ह्याचे जहागिरदार असल्यानं निर्णय आपल्या मनानं घेत आहेत. कुठं मंत्री कोरोना एक्स्पर्ट झालेत तर कुठं जिल्हाधिकारी तर कुठं मनपा आयुक्त. नेमकं कोण काय करतो आहे ते कोणाला कळत नाहीये. कोणत्या Standard Operating Procedures नेमक्या अवलंबिल्या जात आहेत आणि त्याच सगळीकडे एकसारख्या लागू व्हाव्यात म्हणून कोणते आदेश कोणी दिले आहेत का?

मुंबई पुण्यात कमी फैलाव होता तेव्हा मजुरांना, इतरांना गावाकडे जाऊ न देता कोंडून ठेवलं, कडक लाॅकडाऊन. आता दोन्ही शहरात फैलाव वाढल्यानंतर दरवाजे उघडे करून टाकले! खुशाल कुठंही जा आणि जाल तिथं कोरोना न्या. मोदी लाॅजिक!

खेडेगावात फैलाव सुरू झालाय. पवार साहेब- मुख्यमंत्री दैनंदिन भेटीगाठीतून थोडासा वेळ काढून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी व्हीडीओ काॅन्फरन्सींग करून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याची हीच ती वेळ!

सत्ताधारी आणि विरोधकही आमदारांच्या बैठका घेऊन तालुकानिहाय आढावा घेऊ शकतात. आमदार फक्त पळवापळवी आणि एसी बसमधून हाॅटेलात उतरवण्यसाठी नसतात. त्यांनी थोडंफार काम करायला हरकत नाही. खासदारसुद्धा कोरोना संकटाला आपल्यावरंच संकट समजू शकतात. सगळ्या पक्षांनी आमदार, खासदार, नगरसेवक यांचे बोलण्याचे, काम करण्याचे अधिकार स्वतःच्या खिशात ठेवलेत का?

कोरोनाचे साईड इफेक्ट्स आहेतच पण त्याहीपेक्षा जास्त साईड इफेक्ट्स असतील ते मनमानी लाॅकडाऊनचे. त्याचा फटका बसणार आहे तो हातावर पोट असलेल्यांना.

लाॅकडाऊनबाबत इतर देशांनी काय केलंय आणि त्याचे परिणाम काय याचा आपल्या यंत्रणांनी अभ्यास केला असेल असा संशयसुद्धा आपण घेऊ शकत नाही.

देशाला प्रभू श्रीराम सांभाळत आहे तर महाराष्ट्राला पंढरीचा विठोबा.

Vishwambhar Choudhari yanchya wall varun.

Address

Latur

Telephone

+918767635149

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parmeshwar Adhav Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Parmeshwar Adhav Patil:

Share