Amol Khatal-Patil

Amol Khatal-Patil आमदार, २१७ संगमनेर विधानसभा
Member of the Legislative Assembly (MLA) Sangamner

Jansevak - जनसेवक

अध्यक्ष - संजय गांधी निराधार योजना समिती संगमनेर

निवडणूक प्रमुख - संगमनेर विधानसभा भाजपा
अध्यक्ष - संजय गांधी निराधार योजना संगमनेर

अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे विधानपरिषद निवडणुकीतील अधिकृत उमेदवार श्री. प्राजक्त तनपुरे या...
04/06/2026

अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे विधानपरिषद निवडणुकीतील अधिकृत उमेदवार श्री. प्राजक्त तनपुरे यांची विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!



📍संगमनेर | खांबे गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेशसंगमनेर मतदारसंघात होत असलेल्या विकासकामां...
04/06/2026

📍संगमनेर | खांबे गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

संगमनेर मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांची गती पाहून, शिवसेनेची सर्वसामान्यांच्या हिताची ध्येय धोरणे आणि विचारसरणी यांपासून प्रेरित होऊन खांबे गावातील अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी सरपंच श्री. रवींद्रजी दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीरपणे शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी सर्व नवप्रवेशितांचे पक्षात स्वागत करून त्यांना राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा आणि पाठबळ दिले.

शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कामांवर विश्वास व्यक्त करत तालुक्यातील अनेक जण शिवसेनेचा भगवा हाती घेत आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी, विकासाला प्राधान्य देणारी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना पुढे नेणारी शिवसेना अधिकाधिक बळकट होत असल्याचे हे द्योतक आहे.

जेव्हा एकाच विचारांची माणसे एकत्र येतात, तेव्हा प्रगतीची नवी पहाट उगवते. शिवसेना महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या सोबतीने खांबे परिसराच्या विकासाला आणि जनसेवेला अधिक गती मिळेल, यात शंका नाही.

याप्रसंगी लक्ष्मणजी जोशी, विठ्ठलजी दातीर, गबाजी कोरडे, भिकाजी वाघ, सुखदेव भुतांबरे, पुंजा जोशी, रावसाहेब भांड, बाबुराव कापडी, बारकू पेकारी बाबा, एकनाथ जोशी, नवनाथ दातीर, एकनाथ दातीर, प्रेमराज बुधे, सुभाष केदार, बाळासाहेब दातीर, राघू शेंडगे, बाबासाहेब दातीर, खुशाल वाघ, जनार्दन जोरी, संजय दातीर, रामेश्वर शिंदे, ठाकाजी दातीर, नामदेव दातीर, ज्ञानेश्वर दातीर, दिगंबर दातीर, रवी जोरी, सोमनाथ शेंडगे, माणिक जोरी, भाऊसाहेब शेंडगे, सखाराम दातीर, रविराज जोशी, पवन जोशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#शिवसेना

लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री स्व. ग...
03/06/2026

लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवसेना-महायुती जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

#गोपीनाथरावजी_मुंडे_साहेब

जोर्वे येथील कै.चंद्रभागा रामचंद्र जाधव यांचे दुःखद निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन के...
03/06/2026

जोर्वे येथील कै.चंद्रभागा रामचंद्र जाधव यांचे दुःखद निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

आश्वी येथे सौ.कांचनताई मांढरे यांच्या हार्डवेअर दुकानास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांच्याशी विविध विषयांवर आस्थेवाईक...
03/06/2026

आश्वी येथे सौ.कांचनताई मांढरे यांच्या हार्डवेअर दुकानास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांच्याशी विविध विषयांवर आस्थेवाईक संवाद साधला. अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने व्यवसाय सांभाळणाऱ्या कांचनताईंच्या या व्यावसायिक प्रवासाला नेहमी असेच यश लाभो, हीच सदिच्छा!

आमचे सहकारी श्री. सुजितजी क्षिरसागर यांच्या आजी कै.कलावतीबाई पांडुरंग क्षिरसागर यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त आयोजित क...
03/06/2026

आमचे सहकारी श्री. सुजितजी क्षिरसागर यांच्या आजी कै.कलावतीबाई पांडुरंग क्षिरसागर यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना पुष्पांजली वाहिली. क्षिरसागर परिवारातील सदस्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या.

मालदाड येथे स्व. संपतजी महादू नवले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित वर्षश्राद्ध कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना...
03/06/2026

मालदाड येथे स्व. संपतजी महादू नवले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित वर्षश्राद्ध कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. नवले कुटुंबीयांची भेट घेतली तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला.

संगमनेर, इंदिरानगर येथील श्री. अशोक भुरके यांच्या मातोश्री कै. गीताबाई मुरलीधर भुरके यांच्या दुःखद निधनाने शोकसागरात असण...
03/06/2026

संगमनेर, इंदिरानगर येथील श्री. अशोक भुरके यांच्या मातोश्री कै. गीताबाई मुरलीधर भुरके यांच्या दुःखद निधनाने शोकसागरात असणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

आमचे सहकारी श्री.अजित जाधव यांची प्रकृती हृदयविकाराने काहीशी खालावली होती परंतु ईश्वरकृपेने आणि वेळेवर मिळालेल्या वैद्यक...
03/06/2026

आमचे सहकारी श्री.अजित जाधव यांची प्रकृती हृदयविकाराने काहीशी खालावली होती परंतु ईश्वरकृपेने आणि वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. या पार्श्वभूमीवर श्री. अजितजी यांची निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. तब्येतीची आत्मीयतेने विचारपूस केली आणि सध्या सुरू असलेल्या औषधोपचारांविषयी माहिती घेऊन ते सक्तीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना जाधव कुटुंबियांना दिल्या.

संगमनेरमध्ये सुरू झालेल्या "प्रथम मल्टिटेक सोलर" या नूतन व्यवसायाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झा...
03/06/2026

संगमनेरमध्ये सुरू झालेल्या "प्रथम मल्टिटेक सोलर" या नूतन व्यवसायाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित राहून देशमुख परिवाराच्या आनंदाच्या क्षणात सहभागी झालो. देशमुख परिवाराने पर्यावरणपूरक आणि शाश्वत सौर ऊर्जेच्या क्षेत्रात टाकलेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे.

या नवीन उद्योगाच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा मिळेल आणि व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती होईल, असा विश्वास वाटतो. देशमुख परिवारास या नूतन व्यवसायाबद्दल अभिनंदन व पुढील यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!

Address

Sangamner
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Khatal-Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amol Khatal-Patil:

Share