Shivkanya aani Mavle

Shivkanya aani Mavle मराठी लोकांचे एकत्रीकरण आणि येथील लोकांनी एकत्र राहणे हा उद्देश.

चला परत एकदा सिद्धार्थ च चित्रपट पाहू यातारीख : ४ फेब्रुवारीवेळ : दुपारी ४ वाजताठिकाण : आपले नेहमीचे स्टार गलेरिया, डेरा...
28/01/2024

चला परत एकदा सिद्धार्थ च चित्रपट पाहू या
तारीख : ४ फेब्रुवारी
वेळ : दुपारी ४ वाजता
ठिकाण : आपले नेहमीचे स्टार गलेरिया, डेरा, दुबई, गोल्ड सुख मेट्रो स्टेशन जवळ
संपर्क : ९७१५२७४४३३८९
971 52 052 744 3389

15/12/2023

Types of share market

1. Equity market
a. NSE
b. BSE
2. Commodity Market
a. Agri (MCX)
b. Non Agri (NCDEX)
3. Currency Market
a. Currency Pairs (NSE)

23/08/2023

Proud moment for
Sucessful landing on the Moon. 👏👏💐💐

सॉफ्ट लँडिंग यशस्वी..🔥🔥🔥

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत जगातला पहिला देश ठरला.💪वंदे मातरम्.🇮🇳


भारतीय स्वतंत्र दीन झेंडा वंदन ल इथे जाऊ शकता
14/08/2023

भारतीय स्वतंत्र दीन झेंडा वंदन ल इथे जाऊ शकता

दुबई मध्ये स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी consulat मध्ये जाऊ शकता, फक्त पासपोर्ट किंवा एमिरेट्स आयडी घेऊन जाणे.जय हिंदजय ...
13/08/2023

दुबई मध्ये स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी consulat मध्ये जाऊ शकता, फक्त पासपोर्ट किंवा एमिरेट्स आयडी घेऊन जाणे.

जय हिंद
जय महाराष्ट्र
जय भवानी जय शिवाजी

02/08/2023

मी दामले,पुण्यात सदाशिव पेठेत , नागनाथ पार जवळ,राहतो, माझी बायको, पुण्यातील senior सिटिझन साठी accompany and assistance देते (ज्यांना घराबाहेर जाऊन काही कामे (जसे बँक, पोस्ट, dental, eye, medical test किंवा short duration family function attend )करायची आहेत पण सोबत यायला कोणी नाही अशा ज्येष्ठांसाठी हे काम करते, आणि मी, फक्त पुण्यात ज्येष्ठ नागरिक, आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला यांच्यासाठी रात्री ९ ते सकाळी ९ अशी टॅक्सी सेवा देतो. (पुणे airport व पुणे रेल्वे station साठी) आमच्या या सेवेचे नाव *प्रवासनीस* असे आहे.

18/07/2023

*🌹अधिक मास व श्रावण मास 🌹*

प्रश्न एकच *ह्यावेळी श्रावण महिना २ महिने आहे का? सोमवाराचे ८ सोमवार उपवास करायचे का?* आम्ही दरवर्षी नवनाथ पारायण वाचतो मग ते कधी वाचन करायचं? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.

ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच ते म्हणजे *श्रावण महिना दरवर्षी प्रमाणे एकच महिना आहे*.

कॅलेंडरवर *अधिक श्रावण, निज श्रावण असं लिहलेलं असल्यामुळे श्रावण महिन्याबाबत संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे*. त्यातच, Social media व वर्तमानपत्र ह्यावरही वेगवेगळी माहिती देणारे मतप्रदर्शन बघायला मिळत आहे.

सविस्तर सांगायचं झाल्यांस *सौरवर्ष व चांद्रवर्ष यांच्यांत दरवर्षी साडेएकरा दिवसांचा फरक पडतो*.कालगणनेच्या सोयीसाठी, ह्यांत मेळ घालण्यासाठी दर ३२ महिन्यां नंतर एक अधिक महिना घेतला जातो. व हे अंतर पुर्ववत केले जाते. अधिक महिन्यांत रविची संक्रांत होत नाही.ह्या महिन्यांस पुढील महिन्याचे नाव असते. जसे, ह्यावर्षी आषाढ महिन्यानंतर व श्रावण महिन्यापुर्वी अधिक महिना येत असल्यांने अधिक श्रावण असे म्हटले आहे. साधारणतः फाल्गुन ते अश्विन हे महिनेच अधिक महिने येतात. अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास, मल मास, धोंड्याचा महिना अशी नावंही प्रचलित आहेत.

वर्तमानपत्र व Social media वरील चर्चेचा विषय बघता उत्तर भारतांत पौरोहित्य करणार्‍या मंडळींनी,ज्योतिषींनी ८ सोमवार करा, दोन महिने श्रावण महिना आहे, असे मत प्रदर्शित केलं आहे. त्यांच्या व आपल्याकडील *कालगणनेत ही फरक* आहे. *त्या भागांत पौर्णिमा ते पौर्णिमा महिना असतो. आपल्याकडे अमावस्या ते अमावस्या महिना असतो*.

*१७ जुलै २०२३ ला मध्यरात्री अमावस्या संपुन १८ जुलै २०२३ पासुन अधिक महिना* सुरु होत आहे.तर *१६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०३ वाजुन ०७ मिनिटांनी अधिक महिना संपेल*, व नेहमीप्रमाणे, दरवर्षी प्रमाणे श्रावण महिना सुरु होणार आहे. अधिक श्रावण व निज श्रावण ह्यामुळे संभ्रम झाला असला तरी त्या महिन्यांची विभागणी वरील प्रमाणे आहे.*थोडक्यात,१८ जुलै ते १६ ऑगस्ट २०२३ अधिक मास व १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ हा श्रावण मास आहे* त्यामुळे, जावायाला, ब्राम्हणाला, गाईला वाण देणे, अधिक माहात्म्य वाचणे, आईची पुजा करुन आईची ओटी भरणे, देवालयांतील देवांना, गंगेला वाण देणे हे सर्व १८ जुलै ते १५ ऑगस्ट ह्या दरम्यांन करायचं आहे. तसेच, श्रावणांतील व्रत-वैकल्य, सोमवार व इतर उपवास, पारायण वाचन हे सगळं १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ ह्या दरम्यांन करायचे आहे. इतर कोणत्याही माहितीनुसार नव्हे तर वरील प्रमाणे श्रावण महिन्याची व्रत-वैकल्य, उपवास करायचे आहेत.
अधिक महिन्यांत दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा ह्या विशेष तिथींना दान देण्याचं अधिक महत्त्व आहे.त्याच प्रमाणे पंचपर्व म्हणजेच वैधृती योग, व्यतिपात योग,अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी तिथी हि पंचपर्व,त्यांची दानंही महत्त्वाची आहेत. अधिक मासांत गंगास्नानाचंही तितकंच महत्त्व आहे. अनेकजण अधिक मासांत संपुर्ण महिनाभर गंगास्नान करतात. दान देतांना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक,बर्फी तसेच सप्तधान्याची दानं दिली जातात. अनारसे, बत्तासे ह्यासारख्या वस्तु ३३ नग ह्या प्रमाणांत देतात.दान शक्यतो तांब्याच्या पात्रांत द्यावे. तांब्याचे ताम्हण घेऊन त्यावर पळसाच्या पानाची पत्रावळ ठेवावी.त्या पत्रावळीवर थोडेसे गहु ठेवुन त्यावर दान द्यायची वस्तु ठेवावी. हळद-कुंकु वाहुन वस्तुवर तुळशी पत्र ठेवावं.त्यावर रुमाल,उपरणं झाकुन त्यावर दिपदान ठेवुन तुपाची वात लावावी. दान देणार्‍या व्यक्तीचं पुजन करुन यथाशक्ती प्रमाणे दान वस्तुवर दक्षिणा ठेवुन ते दान संबंधित व्यक्तिला द्यावे. वस्त्रदानही देता येते. अर्थातच,काय द्यावे? किती प्रमाणांत द्यावे? हा प्रत्येकाच्या इच्छाशक्तीचा व आर्थिकतेचा प्रश्न आहे. त्यामध्ये कोणतेही बंधन नाही. सक्ती नाही.
*आईने केलेल्या कन्यादाना बद्दलची कृतज्ञता म्हणुन अधिक मासांत मुली आपल्या आईची साडी, खण-नाराळाने ओटी भरतात*.
अधिक मासांत विष्णु स्वरुप देवतांचं विशेषतः कृष्णाचं महत्त्व जास्त असल्यांने कृष्णाला महिनाभर तुळस वाहणे, दररोज थोडासा लोण्याचा नैवैद्य दाखवुन तो एका लहान बाळ-गोपाळाला देणे असे अनेक उपक्रम करता येतात.
*श्रावण महिन्यांतील सोमवार २१ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर ह्याचं दिवशी श्रावण सोमवार उपवास करायचे आहेत

अधिक मास व श्रावण मास* ह्यांची माहीती
Forwarded......

टिपिकल हिंदू वेषात,डोक्यात गजरा माळलेल्या,कपाळावर कुंकू लावलेल्या या ज्या बायका दिसतायत, त्या कोण्या खेडेगावातल्या , गाव...
16/07/2023

टिपिकल हिंदू वेषात,डोक्यात गजरा माळलेल्या,कपाळावर कुंकू लावलेल्या या ज्या बायका दिसतायत, त्या कोण्या खेडेगावातल्या , गावंढळ बायका नसून त्या आहेत ISRO च्या उच्च शिक्षित शास्त्रज्ञ..
काल त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालेलं आहे अन त्याचाच जल्लोष अन एकमेकांचं अभिनंदन करतायत...
तुमचं शिक्षण किती यावर तुमची किंमत ठरत् नाही तर तुम्ही तुमची संस्कृती,परंपरा किती जपता यावर ठरते...!!
संपूर्ण देशाला यांचा गौरव आहे...!

गुरु आहे सावली, गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, ...
03/07/2023

गुरु आहे सावली, गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात
गुरु पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
🙏🏻🌹🙏🏻
श्री गुरूदेव दत्त 💐🙏💐
💐🙏💐दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐🙏💐

जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन. भावविभोर श्रद्धांजली 🙏🙏💐💐💐
04/06/2023

जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन. भावविभोर श्रद्धांजली 🙏🙏💐💐💐

Address

Al Ajman
0000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivkanya aani Mavle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category