11/03/2013
Dosto,
Hame kisi bhi haalat mein is Pranhita Chavhela pariyojna ka virodh karna hai aur ise rokna hai nahi to hamare shetra aur is shetra ke logo ka bahut bada nuksaan hoga.
Jai Vidarbha!
हे प्राणहिता चव्हेला बांध ( Dr. B.R. Ambedkar प्राणहिता चव्हेला श्रवंती परियोजना) ही महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या प्राणहिता नदीवर येथे प्रस्तावित आहे. या परीयोजनेसाठी ३८,५०० कोटी रुपये खर्च येणार असून यातून पूर्णपणे आंध्रप्रदेशातील हैदराबादला पिण्यासाठी आणि तेलंगाना क्षेत्राला सिंचाईसाठी सिंचन व्यवस्था होणार आहे, तसेच ३३७५ मेगावाट विद्युत निर्मिती होऊन याचा फायदा सुद्धा आन्ध्राप्रदेशाला होणार आहे. ही परियोजना पूर्ण झाली तर विदर्भ आणि खासकर गडचिरोली जिल्हेला तसेच अहेरी, सिरोंचा तालुकाला खूब नुकसान होणार आहे आणि आम्हाला एक बुंद पाणी नाही भेटणार आहे.
या परियोजना आमचा जमिनीवर आहे, ते आमचा पाणी आहे, आणि ते आमचा हक़ आहे, पण या परियोजनेतून विदर्भाला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. महाराष्ट्र सरकाराच्या या निर्णयामुळे आमच्या क्षेत्रात अधिक नुकसान होणार आहे. संपूर्ण नदीचे पाणी कालव्याद्वारे अंध्राप्रदेशाकडे वडते केल्यामुळे प्राणहिता नदी पूर्णपणे कोरडे होईल.
महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती व आठ महिने दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. ही परियोजना पूर्णपणे विदर्भाच्या जनतेच्या विरोधात असून याद्वारे अनेक कुटुंब उध्वस्त होणार आहे व बारमाही वाहणारी प्राणहिता नदी पूर्णपणे कोरडी होऊन विदर्भातील लाखो हेक्टर शेतीला सिंचन व्यवस्था करणारी, तहान भागवनिरी व मत्सव्यवसायास चालना देणारी नदी या क्षेत्राला अभिशाप ठरणारी आहे. यामुळे ही परियोजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण न होऊ देणे हे आपले क्षेत्रातील जनतेच्या हिताचे राहील.
तरी Raje Ambreish Rao Maharaj आणी नाग विदर्भ आंदोलन समिती आपल्या क्षेत्रातील जनतेच्या हिताकरिता या परीयोज्नेला प्रखर विरोध करत आहे व ही परीयोज्नेला थांब्ण्याकरिता आम्ही आंदोलन करणार आहो आणी आपल्या हक्कासाठी आपण सगळे एकत्र येउन याचा विरोध करायला पाहिजे.
जय विदर्भ !