05/01/2026
शेवगाव पंचायत समितीत 'उमेद अभियान' यांच्या वतीने एकल महिलांसाठी कार्यशाळा संपन्न
शेवगाव पंचायत समिती येथे उमेद अभियान यांच्या मार्फत एकल महिलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा मॅडम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. या कार्यशाळेस निमंत्रक प्रा. हेरंब कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. शेवगाव तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यात ५ हजारांहून अधिक एकल महिला असल्याचे निदर्शनास आले आहे. या महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात अ आहेत. कार्यशाळेत एकल महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी, रोजगारनिर्मितीचे मार्ग, तसेच लघुउद्योग सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आपल्या जीवनातील संघर्ष, अडचणी आणि मेहनतीने उभे केलेले छोटे उद्योग याबाबत अनुभव कथन केले.
यावेळी उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी महिलांना स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली.
प्रा. हेरंब कुलकर्णी यांनी महिलांसाठी कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या व्यवसायांची कपड्यांची अशा सुमारे ५० व्यवसायांची माहिती देण्यात आली. माहिती दिली.
गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी एकल महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच श्रावणबाळ योजना, रेशन कार्ड आदी अडचणी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी दिले. यावेळी एकल महिलांनी त्यांच्या यशोगाथा सादर केल्या.
या कार्यक्रमास उमेश घेवरीकर, नितेश बनसोडे, गजानन शिंदे (महिला व बालविकास अधिकारी), तारामती दिवटे, प्रशांत शेळके, फिरोज सय्यद, हरिबा चांदगावे, राऊसाहेब भोरे, दिनेश काशिद, दीपक लोढे, विकास तुतारे, रुपाली झारखंड, कारभारी गरड, अमोल घोलप, प्रथमेश सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या.