03/11/2024
*सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरपंचांच्या मागण्या पोहचल्या मुख्यमंत्र्यांच्या दारी*
मंजुर करण्यात येणाऱ्या मागण्या खालील प्रमाणे
१) 15/ L रुपयांची विकास कामे करण्याचा हक्क ग्रामपंचायतीला पूर्ववत बहाल करण्याचा जीआर तयार झाला असून तो विधी व न्याय विभागाच्या मंजुरी नंतर पारित होईल.२) मानधनांचा प्रस्ताव तयार झाला असून वित्त विभाग, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत मंत्रिमंडळासमोर येईल.३) प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समितीत सरपंचांची बैठक व्यवस्था ( सरपंच कक्ष ) करण्यासाठीचे पत्र तयार असून ते लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. ४) ग्रामपंचायतच्या थकितकरांच्या वसुलीसाठी
" अभय " योजना लवकरच होईल.५) विमा व पेन्शन संदर्भातही विमा कंपन्याकडून प्रस्ताव मागवले आहेत. ६) मुंबईत सरपंच भवन विचारविनिमय सुरू आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पहिले सरपंच भवन गडचिरोली ला होणार जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा परिषद ला पत्र दिले.७) दैनिक लोकमत राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींना 25/15 मधून निधी मंजूर.८) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी मागील थकबाकी फरक साठी 200 कोटी तातडीने रिलीज करण्यात येत आहेत तर संगणक परिचालकांना वाढीव पगार शासनच देईल असे सांगितले आहे---🎉🎉🎉🎉
या सह इतर मागण्या संदर्भात अभ्यासू अधिकाऱ्यांचा गट कार्यरत करण्यात आलेला आहे, त्यामुळे सरपंच उपसरपंच सदस्यांना न्याय मिळेल आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळेल असे वाटते----🌷
*आपला विश्वासू*
*माआदर्श सरपंच पुरुषोत्तम घोगरे* *संस्थापक अध्यक्ष*
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य
संपर्क 9766276978
टीप - हा मॅसेज जास्तीत जास्त आपल्या बंधू-भगिनीपर्यंत पोहोचवण्यात मदत करा, धन्यवाद.🙏🌷🙏