District Information Office, Akola. जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

  • Home
  • India
  • Akola
  • District Information Office, Akola. जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

District Information Office, Akola. जिल्हा माहिती कार्यालय, अकोला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन

Mega walkathon–Walk for Water receives good response in Akolaमहावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर; अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद    ...
22/08/2026

Mega walkathon–Walk for Water receives good response in Akola
महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर; अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

#महावॉकेथॉन–वॉकफॉरवॉटर

जलसंवर्धनासाठी चालले अकोलेकर महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर        #महावॉकेथॉन–वॉकफॉरवॉटर
22/08/2026

जलसंवर्धनासाठी चालले अकोलेकर
महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर

#महावॉकेथॉन–वॉकफॉरवॉटर

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर...
21/08/2026

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा.

थीम: Save Soil, Save Water, Secure Tomorrow

विषय: माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन – उद्याचे सुरक्षित भविष्य.
यातील कोणत्याही एका विषयावर रील करू शकता !

रील अपलोड कालावधी: १५ ते ३१ ऑगस्ट
रीलची वेळ: ३० ते ६० सेकंद
रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक.
रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी.
हा हॅशटॅग वापरणे आणि विभागाच्या अधिकृत अकाउंट mahawalkathon2026 Tag करणे आवश्यक.

रील पोस्ट केल्यानंतर अधिकृत QR Code स्कॅन करून Registration Form भरावा आणि रीलची लिंक Submit करावी.

प्रत्येक जिल्ह्यातील बक्षिसे

प्रथम विजेता: २५,००० रुपये

द्वितीय विजेता: १५,००० रुपये

तृतीय विजेता: १०,००० रुपये

३६ जिल्ह्यातील युवकांच्या कल्पनेसाठी मोठं व्यासपीठ.

बक्षीस वितरण: २१ ऑगस्ट

तुमची रील बनवा, माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश द्या आणि महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीत सहभागी व्हा.

https://register.mahaevent.co.in

मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ! #शेतकरीकर्जमुक्ती  #कर्जमुक्तीयोजना२०२६  #शेतकरी
21/08/2026

मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ!

#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#शेतकरी



माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या वि...
21/08/2026

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या विशेष मुलाखत (भाग-२) मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही प्रसारित होणार आहे.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे, कृषी क्षेत्र अधिक सक्षम व शाश्वत करणे तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांची माहिती तसेच सहकार विभागाची भूमिका आणि ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या विकासदृष्टीच्या पूर्ततेमध्ये या योजनेचे महत्त्व याबाबतचीही माहिती या मुलाखतीतून देण्यात येणार आहे.

#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन
#महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#विकसितमहाराष्ट्र२०४७
#जयमहाराष्ट्र

21/08/2026

जिल्ह्यात साखर निर्बंध साठा आदेश लागू
अकोला, दि. २१ : केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तु अंतर्गत साखर साठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यातील साखर व्यावसायिकांना साखरेची ४ हजार क्विंटल इतकी साठा मर्यादा (स्टॉक होल्डिंग‍ लिमीट) निश्चित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना साखर वेळेत उपलब्ध व्हावी, साखरेच्या किमती नियंत्रीत राहाव्यात, साखरचे साठेबाजी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. केंद्रशासनाच्या अधिसूचनेत नमुद केलेला साठा मर्यादा आणि इतर अटी निर्बंध आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू राहतील.
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूअंतर्गत साखरेच्या व्यावसायिकांना ४ हजार क्विंटलपर्यंतचा साखर साठा करता येईल. तशी निर्बंध मर्यादा निश्चित करण्यात आलेली असून, संपुर्ण जिल्हयात सदरहू साखर मर्यांदा निर्बंध आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
यासंबंधी कार्यक्षेत्रात पुरवठा विभाग यंत्रणेद्वारे वेळोवेळी भेटीदरम्यान पडताळणी करण्यात येईल. सर्व साखर व्यापा-यांनी अन्नसाठा देखरेख पोर्टलवर https://foodstock.dfpd.gov.in/ तात्काळ नोंदणी करून साखर साठ्याची स्थिती पोर्टलवर नमूद करावी. प्रत्येक शुक्रवारी साखर स्टॉक पोझिशन अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती अचूक आणि वेळेवर दिली जाईल याची खात्री करणे आवश्यक आहे. पोर्टलवर नोंदणी अयशस्वी होणे किंवा पोर्टलवर चुकीची,अपूर्ण, उशिरामाहिती देणे ही बाब गंभीर मानली जाईल आणि अशा व्यावसायिक, संस्थांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार कठोर कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिला आहे.
०००

21/08/2026

जिल्हा उद्योग केंद्रप्रमुखांच्या पदनामात बदल

अकोला, दि. २१: जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयप्रमुखाचे पदनाम आता ‘महाव्यवस्थापक’ऐवजी आता ‘उपायुक्त (उद्योग व सेवा)’ असे झाले आहे.
तसा शासन निर्णय उद्योग व खनिकर्म विभागाने निर्गमित केला आहे. विभागाने जाहीर केलेल्या सुधारित आकृतीबंधात नविन पदनामाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुषंगाने उद्योग आयुक्तालयाने परिपत्रक काढून कार्यालयीन कामकाजात सुधारित पदनामाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्राशी संबंधित सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये यापुढे उपायुक्त(उद्योग व सेवा) असे पदनाम वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
०००

रेडक्रॉसच्या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादआरोग्यदायी व स्त्युत्य उपक्रम-जिल्हाधिकारी वर्षा मीनाअकोला...
21/08/2026

रेडक्रॉसच्या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्यदायी व स्त्युत्य उपक्रम
-जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. २१ : इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने लोकनेते,माजी मंत्री स्व. पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित या शिबिरात उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित होत्या. अकोला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित या शिबिरात रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉ किशोर मालोकार, सचिव प्रभजीत सिंह बछेर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे,बहुजन पत्रकार संघाचे मार्गदर्शक अँड सुधाकर खुमकर,अध्यक्ष अनिल मोहोरे,जावेद जकारिया आदी उपस्थित होते.
शासन व समाजाचा दुवा असणारा पत्रकार वर्ग हा खऱ्या अर्थाने आरोग्यमय झाला पाहिजे, यासाठी सातत्याने अशा आरोग्यदायी उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षां मीना यांनी करून या उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अकोला येथे एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय वर्गाने उपस्थित पत्रकारांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार वितरित करण्यात आला. शिबिरात श्री. फुंडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत या शिबिराची उपयुक्तता प्रतिपादित केली.
रेडक्रॉसचे चेअरमन डॉ किशोर मालोकार यांनी यावेळी या आगळ्यावेगळ्या व अत्यावश्यक असणाऱ्या उपक्रमाची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. व्यवस्थापन रेडक्रॉसचे सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी केले. सूत्रसंचालन कपिल रावदेव यांनी तर आभार ॲड. सुभाषसिह ठाकूर यांनी मानले. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, रेडक्रॉसचे डॉ संदीप चव्हाण, डॉ गजानन वाघोडे, एड सुभाष मुंगी,सीए मनोज चांडक, डॉ एन के माहेश्वरी,रामहरी डांगे,प्रकाश गवळी,राजू बुळुकले, अँड आशिष फुंडकर, अभयसिंग , रजपूत,संजय ढेपे, विजयराव भोरे, प्रशांत लोथे नितीन मेतकर, गोकुळ पोतले, रविंद्र वानखड, मंगला डोंगरे, अनमोल सिह बछेर समवेत वैद्यकीय वर्ग ,परिचारिका आदी उपस्थित होते.
000

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती अर्थात जलसंधारण दिनमहावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये चालले हजारो अकोलेकर        ...
21/08/2026

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती अर्थात जलसंधारण दिन
महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये चालले हजारो अकोलेकर

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

‘महा वॉकेथॉन’ला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



अकोला, दि. २१ : जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे माती आणि पाण्याची बचत, संवर्धन करण्यासाठी मृद व जलसंधारणतर्फे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.
मृद व जलसंधारण विभागातर्फे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ ला अकोला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, महापालिका आयुक्त डॉ सुनील लहाने, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महेश परंडेकर, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल मस्कर, जलसंधारण अधिकारी सचिन वानरे, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.

जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यासाठी स्व. सुधाकरराव नाईक यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून जलसंवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, माय भारत, नेहरू युवा केंद्र, होमगार्ड, विविध क्रीडा संस्था, व्यायामशाळा, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उपक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी झुंबा व वॉर्म अप सरावाने सहभागींमध्ये उत्साह जागवण्यात आला. उपक्रमात प्रथम क्रमांक रूपेश गुम्मे व द्वितीय क्रमांक मनोज गोटे यांनी पटकावला.
उपस्थितांनी घेतली जलसंवर्धनाची शपथ
कार्यक्रमात सहभागी मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संदेशातून जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविण्याचा संकल्प करण्यात आला.

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
जलसंधारण सप्ताहानिमित्त आयोजित मृद व जलसंवर्धन विषयावरील रील्स स्पर्धेच्या प्रवेशिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. युवकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मृद व जलसंवर्धनाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध घटकांचा मोठ्या संख्येने सहभाग

महा वॉकेथॉनमध्ये विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, माय भारत, नेहरू युवा केंद्र, होमगार्ड, विविध क्रीडा संस्था, व्यायामशाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

महा वॉकेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी जलसंधारण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. विविध विभागांच्या समन्वयातून आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून जलसंवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यात आला.
०००

Address

Collector Office Campus
Akola
444001

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Information Office, Akola. जिल्हा माहिती कार्यालय, अकोला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to District Information Office, Akola. जिल्हा माहिती कार्यालय, अकोला:

Shortcuts

Share