19/08/2026
॥ श्री सातेरी भगवती देवस्थान ॥
हळदोणा, बार्देश - गोवा
पंचायत स्थापनेच्या मंगलमय सोहळ्याचा पहिला दिवस
श्री सातेरी भगवती देवस्थान, हळदोणा येथे पंचायतन स्थापनेच्या पावन सोहळ्याचा पहिला दिवस आज अत्यंत भक्तीभावाने व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
आजच्या दिवसासाठी निर्धारित सर्व धार्मिक विधी, शास्त्रोक्त पद्धतीने भावपूर्ण वातावरणात पार पडले.
या पवित्र सोहळ्यास भाविकांची लक्षणीय उपस्थिती लाभली आणि संपूर्ण देवस्थान परिसर भक्तीरसाने भारून गेला.
पंचायत स्थापनेच्या या मंगलमय सोहळ्याचा पुढील व अंतिम दिवस उद्या, २० ऑगस्ट रोजी भक्तीभावाने संपन्न होणार आहे.
माय माऊली , ग्रामस्वामिनी, आदिशक्ती जगन्माता श्री सातेरी भगवतीच्या पावन कमल चरणी नमन !