District Information Office, Raigad

District Information Office, Raigad Official page of District Information Office, Raigad

'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' याअंतर्गत आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' ...
06/09/2026

'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' याअंतर्गत आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी अर्ज सादर करण्यास शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत #मुदतवाढ देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
स्पर्धेसाठीचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.
#महागणेशोत्सव
#गणेशोत्सव२०२६
#महाराष्ट्रशासन

गणेशोत्सवात भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठी पनवेल परिवहन कार्यालयाची कडक भूमिकाप्रवाशांकडून अवाजवी भाडे आकार...
04/09/2026

गणेशोत्सवात भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठी पनवेल परिवहन कार्यालयाची कडक भूमिका
प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, गैरवर्तन व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

रायगड, दि. ४ (जिमाका) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह विविध भागांतून कोकणात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय, लूटमार, अवाजवी भाडे आकारणी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व मालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत देण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानक, बसस्थानके तसेच प्रमुख वाहतूक केंद्रांवर दाखल होणार असल्याने रिक्षा व प्रवासी बस वाहतूकदारांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. रिक्षा चालकांनी वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे वैध ठेवणे बंधनकारक असून, रेल्वे स्थानक तसेच महत्त्वाच्या थांब्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशा शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उभ्या कराव्यात.
प्रवाशांकडून शासनाने अथवा परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अवाजवी भाडे आकारू नये, तसेच प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करू नये. रिक्षाची प्रवासी क्षमता लक्षात घेऊनच प्रवाशांची वाहतूक करावी. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
खासगी तसेच प्रवासी बस चालक आणि मालकांनीही गणेशोत्सवाच्या काळात विशेष दक्षता घ्यावी. बसमधील आपत्कालीन खिडकी किंवा दरवाजा, अग्निशामक यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत व वापरण्यायोग्य असणे आवश्यक आहे. चालकाने मद्यपान करून किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये. अशा प्रकारचे नियमभंग आढळल्यास संबंधित चालकासह बस मालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल.
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवासी बसच्या फेऱ्या आणि सुटण्याच्या वेळांचे योग्य नियोजन करावे. परिवहन विभागाने निश्चित केलेल्या भाडेदरांपेक्षा अधिक भाडे प्रवाशांकडून आकारू नये. प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन जादा भाडे आकारणाऱ्या वाहतूकदारांवरही कारवाई केली जाणार आहे.
तक्रारीसाठी परिवहन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन
रिक्षा किंवा बस वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारले जात असल्यास, प्रवाशांशी गैरवर्तन होत असल्यास अथवा वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास प्रवाशांनी संबंधित वाहनाचा क्रमांक, प्रवासाचा मार्ग व तक्रारीचा तपशील नमूद करून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलच्या अधिकृत ई-मेलवर [email protected] तक्रार नोंदवावी.
गणेशोत्सवाच्या काळात सर्व वाहतूकदारांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच कोकणात येणाऱ्या चाकरमानी भाविकांनीही सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारची अडचण अथवा गैरप्रकार आढळल्यास परिवहन विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
0000

ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सीचे भाडेमीटर ३० नोव्हेंबरपर्यंत रिकॅलिब्रेशन करून घेण्याचे आवाहनविहित मुदतीनंतर दररोज ५० रुपये, कम...
04/09/2026

ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सीचे भाडेमीटर ३० नोव्हेंबरपर्यंत रिकॅलिब्रेशन करून घेण्याचे आवाहन

विहित मुदतीनंतर दररोज ५० रुपये, कमाल ५ हजार रुपये विभागीय दंडात्मक शुल्क; अलिबाग व पेण तालुक्यातील वाहनधारकांसाठीही लागू

रायगड, दि. ४ (जिमाका) : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी यांच्या भाडेदरात वाढ करण्यात आली असून, नवीन भाडेदरानुसार भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील, तसेच पेण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अलिबाग व पेण या दोन तालुक्यांतील सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सीधारकांनी दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मीटर रिकॅलिब्रेशन संस्थांनी त्यांच्या निर्धारित कार्यक्षेत्राबाहेरील ऑटोरिक्षा किंवा मीटर टॅक्सीला रिकॅलिब्रेशन प्रमाणपत्र जारी करू नये. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील रिकॅलिब्रेशन संस्थांकडून जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र स्वीकारू नये, असा निर्णय घेण्यात आला आहे.
विहित मुदतीत भाडे मीटरचे रिकॅलिब्रेशन न केल्यास दि. १ डिसेंबर २०२६ पासून संबंधित ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालक अथवा मालकाकडून विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये विभागीय दंडात्मक शुल्क आकारण्यात येईल. हे शुल्क कमाल ५ हजार रुपयांपर्यंत आकारण्यात येणार आहे.
भाडेमीटर सील करण्यासाठी ऑटोरिक्षाच्या मीटरसाठी एक रेटो सील, आवश्यकता असल्यास दोन रेटो सील, तर टॅक्सी मीटरसाठी एकूण दोन रेटो सील वापरणे आवश्यक राहील. मीटरमध्ये बसविण्यात आलेल्या सीलचे क्रमांक संगणकीय बीजकावर नमूद करणे बंधनकारक असून, हस्तलिखित बीजकाचा वापर करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
मीटर संबंधित सेवांसाठी निश्चित शुल्क
सर्व मीटर उत्पादकांनी मीटर भाडे नूतनीकरण कार्यक्रमाचे शुल्क समान आकारावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीसह निश्चित करण्यात आलेले शुल्क पुढीलप्रमाणे आहे : मीटर उत्पादक – २८० रुपये, मीटर दुरुस्ती – २७५ रुपये, मीटर तपासणी – १२० रुपये आणि मीटर सील – २५ रुपये. एकूण शुल्क – ७०० रुपये.
मीटर उत्पादक, रिकॅलिब्रेशन करणाऱ्या संस्था तसेच मीटर दुरुस्ती करणाऱ्यांनी निर्धारित शुल्काचा फलक त्यांच्या आस्थापनेच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.
ऑटोरिक्षा व टॅक्सीधारकांनी विहित मुदतीची नोंद घेऊन आपल्या वाहनाच्या भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन वेळेत करून घ्यावे. प्रवाशांकडून नवीन भाडेदरानुसार योग्य भाडे आकारले जावे आणि मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रियेत संबंधित नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
000

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-पुणे, मुंबई-गोवा व कोकण महामार्गांवर वाढणारी वाहतूक लक्षात घेता, अपघातप्रवण ठिकाणे, धोकादायक ...
04/09/2026

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-पुणे, मुंबई-गोवा व कोकण महामार्गांवर वाढणारी वाहतूक लक्षात घेता, अपघातप्रवण ठिकाणे, धोकादायक वळणे व संभाव्य धोकादायक क्षेत्रांची पूर्वसूचना देणारे ‘Black Spot RTO Panvel’ अॅप वापरा.
#गणेशोत्सव2026 #रस्तेसुरक्षा #कोकणप्रवास #ब्लॅकस्पॉट #आरटीओपनवेल

राष्ट्रीय पोषण माह (१ ते ३० सप्टेंबर)सुपर फूड बाजरीचे फायदे जाणून घ्या...
04/09/2026

राष्ट्रीय पोषण माह (१ ते ३० सप्टेंबर)
सुपर फूड बाजरीचे फायदे जाणून घ्या...


निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित व पौष्टिक आहाराला प्राधान्य!शासकीय, निमशासकीय बैठक, कार्यक्रम व उपाहारगृहात आरोग्यदायी अन्नप...
04/09/2026

निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित व पौष्टिक आहाराला प्राधान्य!

शासकीय, निमशासकीय बैठक, कार्यक्रम व उपाहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थांचा समावेश करून संतुलित आहाराला प्रोत्साहन देण्याचा शासनाचा निर्णय.

अमली पदार्थमुक्त महाराष्ट्रासाठी ठोस पाऊल! २०२९ पर्यंत महाराष्ट्रातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ...
04/09/2026

अमली पदार्थमुक्त महाराष्ट्रासाठी ठोस पाऊल!

२०२९ पर्यंत महाराष्ट्रातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने राज्याने सर्वसमावेशक धोरण आखले आहे.

#व्यसनमुक्ती
#महाराष्ट्रशासन

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उत्सवाचा विस्तार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराव...
04/09/2026

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उत्सवाचा विस्तार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे.

2026 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील तसेच परदेशातील सामाजिक आणि विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

📌 अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 सप्टेंबर 2026

इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विहित नमुन्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज साद करावा.

🔗 https://ganeshotsav.pldmka.co.in

गणेशोत्सवाची परंपरा जपूया… समाजहिताच्या विधायक उपक्रमांना प्रोत्साहन देऊया!

महाविस्तार – एआय … शेतकऱ्यांचा डिजिटल साथी!शेतीसाठी आवश्यक माहिती एका फोनवर! #महाविस्तारएआय    #शेतकरी  #महाराष्ट्रशासन ...
04/09/2026

महाविस्तार – एआय … शेतकऱ्यांचा डिजिटल साथी!

शेतीसाठी आवश्यक माहिती एका फोनवर!

#महाविस्तारएआय #शेतकरी #महाराष्ट्रशासन

Address

Collector Office Premises, Opp. Addl. Collector's Office, Near Hirakot Lake
Alibag
402201

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Information Office, Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to District Information Office, Raigad:

Shortcuts

Share