ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation

  • Home
  • India
  • Ambajogai
  • ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation

ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation We are a team of rural development professionals who are working on educational, livelihood, and governance initiatives.

We believe in the immense power possessed by the masses. Institutions need to play empowerment and enabling roles for channelizing it

15/07/2026

ग्रामऊर्जा फाऊंडेशन आयोजित वारी योजनेची.
@दगडवाडी

#योजना

''ग्रामऊर्जा फाऊडेशन आयोजित वारी योजनेची''न्युज अपडेट्स           CORO INDIA Dr K R Shroff Foundation Coro India Azim Pr...
13/07/2026

''ग्रामऊर्जा फाऊडेशन आयोजित वारी योजनेची''

न्युज अपडेट्स



CORO INDIA Dr K R Shroff Foundation Coro India Azim Premji Foundation Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड

जायभायवाडी येथून "वारी योजनांची" जनजागृती अभियानास उत्साहात प्रारंभधारूर, दि. 12 जुलै : ग्रामऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फा...
12/07/2026

जायभायवाडी येथून "वारी योजनांची" जनजागृती अभियानास उत्साहात प्रारंभ

धारूर, दि. 12 जुलै : ग्रामऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने आयोजित "वारी योजनांची" या विशेष जनजागृती अभियानाचा शुभारंभ आज धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

अभियानाच्या पहिल्या दिवशी जायभायवाडी येथील ग्रामस्थ, महिला, युवक आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करून योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

ग्रामऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आगामी दिवसांतही विविध गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

#जनजागृती

EnAble India Dr K R Shroff Foundation CORO INDIA Azim Premji Foundation

ग्रामऊर्जा फाऊडेशन च्या माध्यमातुन योजना वारी.ग्रामऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून 12 जुलै ते 20 जुलै य...
11/07/2026

ग्रामऊर्जा फाऊडेशन च्या माध्यमातुन योजना वारी.

ग्रामऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून 12 जुलै ते 20 जुलै या कालावधीत "वारी योजनांची" हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या अभियानाद्वारे शासनाच्या विविध योजना व पंचायत राज विषयी माहिती ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

चला, योजना समजून घेऊया... एक जबाबदार नागरिक बनूया! 🇮🇳

#वारीयोजनांची #जनजागृती #ग्रामीणविकास

Azim Premji Foundation CORO INDIA Dr K R Shroff Foundation Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड CMOMaharashtra

दिव्यांग बांधवांसाठी ग्रामऊर्जा च्या माध्यमातुन गर्व से सेंटर चे उदघाटन. #न्युजमीडिया    #दिव्यांग  #गर्वसेसेंटर EnAble ...
09/07/2026

दिव्यांग बांधवांसाठी ग्रामऊर्जा च्या माध्यमातुन गर्व से सेंटर चे उदघाटन.

#न्युजमीडिया #दिव्यांग #गर्वसेसेंटर
EnAble India

दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामऊर्जा चे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! 🌱अंबाजोगाई व परिसरातील दिव्यांग बांधवांना रोज...
08/07/2026

दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामऊर्जा चे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! 🌱

अंबाजोगाई व परिसरातील दिव्यांग बांधवांना रोजगार, कौशल्य विकास, शासकीय योजना आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून "गर्व से सेंटर" (रोजगार, प्रशिक्षण, सल्ला व मार्गदर्शन केंद्र) सुरू करण्यात आले.

या केंद्राचे उद्घाटन काल मा. नायब तहसीलदार स्मिता बाहेती मॅडम व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना रोजगार मार्गदर्शन, उद्योजकता विकास, शासकीय योजनांची माहिती, कागदपत्रांबाबत सहाय्य आणि विविध मोफत सेवा उपलब्ध करून देण्याचा ग्रामऊर्जा फाउंडेशनचा प्रयत्न राहील.

याच प्रसंगी दिव्यांग उद्योजकता विकास प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या २६ दिव्यांग सहभागी बांधवांना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

"संधी, कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक दिव्यांग व्यक्ती स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगू शकते." या विश्वासातून ग्रामऊर्जा फाउंडेशन पुढील काळातही दिव्यांग सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत राहील.

या उपक्रमासाठी EnAble India संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले असून, त्यांच्या सहकार्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी रोजगार, उद्योजकता आणि स्वावलंबनाच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी आम्हाला बळ मिळाले आहे.



Ashok Hatagale Dadasaheb Pandit Gaikwad Vaijanath Ingole Deepak P Er Datta Shingade Jadhav Pramod Suryabhan Hanmantrao Jadhav Patil CORO INDIA Vikas Gadade

ग्रामऊर्जा च्या शैक्षणिक प्रकल्पातील  विद्यार्थी चि.गायकवाड आर्यन रमेश याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशातील ...
06/07/2026

ग्रामऊर्जा च्या शैक्षणिक प्रकल्पातील विद्यार्थी चि.गायकवाड आर्यन रमेश याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी JEE Advanced परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे, त्याने 91% गुणांसह अखिल भारतीय स्तरावर 1090 वा क्रमांक (AIR 1090)मिळवत आपले IIT मधील स्थान निश्चित केले आहे.

या त्याच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने
त्याचा अध्यक्ष श्री दादासाहेब गायकवाड वैजनाथ इंगोले,धनराज मस्के सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला गायकवाड आर्यन रमेश गायकवाड याचे मनःपूर्वक अभिनंदन..!

ग्रामीण शिक्षणात परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल! 🌱ग्रामऊर्जा फाउंडेशन आणि डॉ. के. आर. श्रॉफ फाउंडेशन यांच्या सं...
02/07/2026

ग्रामीण शिक्षणात परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल! 🌱

ग्रामऊर्जा फाउंडेशन आणि डॉ. के. आर. श्रॉफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम हुनर फेलोशिप अंतर्गत निवड झालेल्या ८ गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्य करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि फेलो यांच्यासोबत परिचय व संवाद कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमामध्ये फेलोंची भूमिका, शाळांमधील कामाची दिशा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. शिक्षकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद ग्रामीण शिक्षणाच्या नव्या प्रवासाला बळ देणारा ठरला.

या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ उभी करणे, जिल्हा परिषद शाळांना नवे रूप देणे आणि प्रत्येक मुलापर्यंत आनंददायी, गुणवत्तापूर्ण व अनुभवाधारित शिक्षण पोहोचवणे हा आमचा प्रयत्न राहणार आहे.

एकत्र येऊ... शिकू... आणि ग्रामीण शिक्षणात सकारात्मक परिवर्तन घडवू!

#लेअरनिंगतोगेठेर

Dr K R Shroff Foundation शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड

Address

Vidyut Nagar, Beed Road, Morewadi
Ambajogai
431517

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919911887565

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन GramUrja Foundation:

Shortcuts

Share