शिवगर्जना मित्र मंडळ जावसई गाव

  • Home
  • India
  • Ambarnath
  • शिवगर्जना मित्र मंडळ जावसई गाव

शिवगर्जना मित्र मंडळ जावसई गाव कर्तव्यशिल युवक. गावाच्या विकासाठी गावाची एकी

आमच्या परिसरातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन वर्गणी जमा करून तसेच श्रमदाना...
28/08/2026

आमच्या परिसरातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन वर्गणी जमा करून तसेच श्रमदानातून स्मशानभूमीची स्वखर्चाने दुरुस्ती व स्वच्छता करण्याचे काम सुरू केले आहे. याबाबतची दखल स्थानिक वृत्तपत्रांनीही घेतली आहे.

CA. Tejashree Vishwajeet Karanjule Patil मात्र स्मशानभूमीचे अजून बरेच काम बाकी आहे. त्यामुळे आपण कृपया या विषयाकडे लक्ष देऊन नगरपरिषदेमार्फत आवश्यक ती मदत व सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

शासनाच्या माध्यमातून किंवा नगरपरिषदेकडून या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

Tejashrii Karranjule मॅडम कृपया या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. 🙏

माझ्या अंबरनाथ मधील बंधूंनो आणि भगिनींनो…आज मी तुमच्यासमोर एकच प्रश्न घेऊन उभा आहे —आपण मतदान करताना कोणावर विश्वास ठेवत...
15/04/2026

माझ्या अंबरनाथ मधील बंधूंनो आणि भगिनींनो…

आज मी तुमच्यासमोर एकच प्रश्न घेऊन उभा आहे —
आपण मतदान करताना कोणावर विश्वास ठेवतो?

आपण Indian National Congress च्या चिन्हावर विश्वास ठेवून मतदान केलं…
पण निवडून आलेल्या नगरसेवकाने काय केलं?

👉 सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलला!

हा फक्त पक्ष बदल नाही…
👉 हा जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात आहे!

तुम्ही दिलेलं मत हे तुमचं हक्क आहे…
कोणालाही ते विकण्याचा अधिकार नाही!

आज जर आपण गप्प बसलो,
तर उद्या प्रत्येक मताची किंमत शून्य होईल!

19/01/2026

आज मनातून एक वेदना बोलतेय…

आपण सगळेच पाहतोय —
निवडणुका आल्या की बाहेरून आलेल्या लोकांसाठी सगळं सहज होतं.
मतदार यादी, पाण्याची नळ, रस्ते, लाईट…
सगळं काही क्षणात.

आणि जे या मातीमध्ये जन्मले,
ज्यांनी या गावाला आपलं सर्वस्व मानलं,
ज्यांच्या वडिलांनी-आजोबांनी या गावासाठी कष्ट उपसले —
ते मात्र आजही प्रश्न विचारतच राहतात.

हे लोक पोट भरण्यासाठी इथे आले,
यात त्यांची चूक नाही…
पण एक प्रश्न मनाला छळतो —
👉 उद्या त्यांची संख्या वाढली आणि त्यांनी संख्याबळ दाखवून गावाच्या निर्णयांना विरोध केला,
तर आपलं गाव कोणाच्या हातात राहील?

आज मतांसाठी सगळं दिलं जातंय,
पण उद्या त्या निर्णयांचा भार, परिणाम, संघर्ष
आपल्याच गावकऱ्यांना सहन करावा लागेल,
याचा विचार कोणी करतोय का?

आपण कोणाच्या विरोधात नाही,
पण आपल्या गावाच्या भविष्यासाठी आवाज उठवणं चुकीचं कसं ठरू शकतं?

आज जर आपण गप्प बसलो,
तर उद्या आपल्याच गावात
आपलंच मत, आपलंच अस्तित्व दुर्लक्षित होईल.

आता तरी गावातील तरुणांनी जागं व्हायला हवं.
भावनेने नाही, तर भविष्यासाठी विचाराने निर्णय घ्यायला हवेत.

🟢 हे गाव आपलं आहे.
त्याचा विचार करणं ही आपली जबाबदारी आहे.

🔥 जावसई गावाचा अभिमान – आपल्या गावचा मुलगा! 🔥💪 श्री. संजय रामवॉर्ड क्र. १ मधून नगरसेवक पदासाठी निवडणुकीत उभे आहेत 🇮🇳🌾 गा...
09/11/2025

🔥 जावसई गावाचा अभिमान – आपल्या गावचा मुलगा! 🔥

💪 श्री. संजय राम
वॉर्ड क्र. १ मधून नगरसेवक पदासाठी निवडणुकीत उभे आहेत 🇮🇳

🌾 गावाचा विकास, तरुणांना दिशा,
आणि सर्वांना न्याय — हाच त्यांचा ध्यास!

💬 चला, आपण सगळे जावसईकर
आपल्या गावच्या मुलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया 🙌

✨ शुभेच्छा आणि मनःपूर्वक समर्थन ✨

#संजयराम #जावसईगाव_अभिमान #गावाचामुलगा #विकासाच्याप्रवासात

29/10/2025

गावातील अत्यंत दु:खद घटना 😔

२७-१०-२०२५ पहाटे साधारण २.३० वाजता, जावसई गावातील महिंद्रनगर येथून काही अज्ञात इसमांनी गायींना औषध आणि इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले, आणि त्या गायींना कारमध्ये भरून घेऊन गेले.

ही घटना फक्त एका जनावराची नाही — ही आपल्या धर्माची, संस्कृतीची आणि गावाच्या सन्मानाची गोष्ट आहे.
आम्ही सर्वजण हिंदू आणि गावकरी म्हणून या प्रकाराचा तीव्र निषेध करतो.

# Jawsai

🙏 पोलीस प्रशासनाने या घटनेची तत्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची सर्वांची मागणी आहे. Ambernath Ki Awazz

नगरसेविका सौ. वंदना वसंत पाटील यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर संतप्त प्रतिक्रिया देत कठोर शब्दांत ...
25/09/2025

नगरसेविका सौ. वंदना वसंत पाटील यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर संतप्त प्रतिक्रिया देत कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. गावातील जनतेच्या न्यायासाठी त्यांनी “भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चा काढण्याचे आवाहन” केले आहे.

जावसई गावातील जनतेचे प्रश्न, विकासकामांमधील भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा याविरुद्ध लढा सुरू झाला आहे.
👉 जनता आता गप्प बसणार नाही!
👉 भ्रष्टाचाराला थारा नाही!

चला आपण सर्वजण एकत्र येऊन गावाच्या न्याय आणि विकासासाठी नगरसेविकांच्या या लढ्यात खंबीर साथ देऊया.

#
#भ्रष्टाचारविरोध #जनतेचाआवाज

अंबरनाथ जावसाई: भ्रष्टाचार पर वंदना पाटिल ने चेतावनी दी, RTI से मिली जानकारी !.......... ...

अंबरनाथमध्ये ट्रॅफिक पोलीस नो पार्किंगमधून गाड्या उचलून त्या अधिकृत RTO यार्डऐवजी पेट्रोल पंपावर ठेवतात!नियमांचे पालन न ...
15/07/2025

अंबरनाथमध्ये ट्रॅफिक पोलीस नो पार्किंगमधून गाड्या उचलून त्या अधिकृत RTO यार्डऐवजी पेट्रोल पंपावर ठेवतात!
नियमांचे पालन न करता रोख दंड वसूल केला जातो, कोणतीही पावती दिली जात नाही, आणि सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास दिला जातो.

❌ अंबरनाथमध्ये पार्किंगची सोयच नाही
❌ गाड्या उचलताना कोणतीही पारदर्शक प्रक्रिया नाही
❌ पेट्रोल पंपावर गाड्या ठेवणे कायदेशीर आहे का?

🛑 हे सगळे प्रकार मनमानी, अन्यायकारक व भ्रष्टाचार दर्शवणारे आहेत.

🙏 विनंती:
✅ अधिकृत टोईंग यार्डची माहिती जाहीर करावी
✅ पेट्रोल पंप प्रकरणाची चौकशी व्हावी
✅ ट्रॅफिक पोलिसांवर नियंत्रण ठेवलं जावं
✅ पार्किंगसाठी पर्याय उपलब्ध करावा

कृपया दखल घ्या.

अधिकाऱ्यांकडून कोणत्याही चौकशीविना अनधिकृत बांधलेल्या घरांना कर पावती, वीज मीटर, आणि मतदार ओळखपत्र देण्याचे प्रकार सुरू
03/01/2025

अधिकाऱ्यांकडून कोणत्याही चौकशीविना अनधिकृत बांधलेल्या घरांना कर पावती, वीज मीटर, आणि मतदार ओळखपत्र देण्याचे प्रकार सुरू

अवैध बांधकामामुळे क्षेत्रात अस्वच्छता, सुरक्षिततेचा अभाव, तसेच कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन होत आहे. यामुळे इतर स्थानिक ...
25/12/2024

अवैध बांधकामामुळे क्षेत्रात अस्वच्छता, सुरक्षिततेचा अभाव, तसेच कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन होत आहे. यामुळे इतर स्थानिक नियमांचे पालन करणार्‍या नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरत आहे.
आम्ही गावकरी आपणास नम्र विनंती करतो की सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध बांधकाम थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी.

Unauthorized construction and sale of houses on forest land, illegal madrasa and factory operations, and leasing of such properties in hilly areas. Urgent action needed!

"

Location -Jawsai goan 140 Ambarnath Assembly









Address

Hanuman Mandir Jawsai Goav Ambarnath West
Ambarnath
421502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवगर्जना मित्र मंडळ जावसई गाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category