11/04/2025
सेवाव्रती बापूसाहेब देशमुख "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय सामाजिक पुरस्काराने "सन्मानीत.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
तेलंगणाचे राज्यपाल महामहिम जिष्णुजी देव वर्मा यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मपीठ संस्थेच्या वतीने दिल्या जाणारा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील नरिमन पॉईंट स्थित यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पडला.
यावेळी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार " श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष तथा प्रमुख विश्वस्त गाडगे महाराज ट्रस्ट संस्था, तसेच नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार सेवाव्रती बापूसाहेब देशमुख यांना तेलंगणाचे राज्यपाल महामहिम श्री.जिष्णूजी देव वर्मा यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज व महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्री.रामजी शिंदे, मा.डॉ.मुरहरी केळे ज्येष्ठ साहितक तथा अध्यक्ष त्रिपुरा राज्य विद्युत मंडळ, मा.श्री.आसिफ भामला अध्यक्ष-भामला फाउंडेशन मुंबई आदी मान्यवर या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला विशेष उपस्थित होते.
यावर्षीचा हा "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार " निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या सेवाकार्याचा वसा व वारसा व्यापकपणे पुढे नेणारे सेवाप्रती बापूसाहेब देशमुख यांना प्रदान करून त्यांचा सेवाकार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
प्रामुख्याने "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" हे नाव भारताच्या इतिहासात अत्यंत सन्मानाने घेतले जाते. अहिल्याबाई होळकर या इंदूर संस्थानाच्या शासिका होत्या आणि त्या आपल्या न्यायप्रियता, दानशीलता व धर्मभावनेमुळे प्रसिद्ध होत्या.त्यांनी अनेक धार्मिक स्थळांचे पुनरुत्थान केले, घाट, मंदिरे बांधली, आणि गरीब-गरजूंना मदत केली. त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने जोपासत पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी या राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ संस्थेचे अध्यक्ष श्री.सागर धापटे पाटील, दानशूर श्रीमती सितादेवी संतोषकुमारजी झुनझुनवाला, सारिका झुनझुनवाला,व्यवस्थापक श्री.एकनाथ ठाकूर, श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे संचालक श्री. सागरभाऊ देशमुख, श्री गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे व्यवस्थापक तथा कर्करोग रुग्णसेवक श्री.प्रशांतभाऊ देशमुख, व्यवस्थापक श्री.वसंतराव देशमुख, संचालक तथा व्यवस्थापक श्री.कुणालभाऊ देशमुख, व्यवस्थापक श्री.प्रकाशभाऊ महात्मे, व्यवस्थापक श्री.अमोल ठाकूर समाजसेवी श्री.गजानन जवंजाळ आदींसह नागरवाडी,मूर्तिजापूर,अमरावती, येथील श्री बाबांची भक्त मंडळी यावेळी उपस्थित होती.