23/05/2023
नमस्कार! 'स्मार्ट किड्स टॉईज अँड बुक्स लायब्ररी" मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे .या लायब्ररी मध्ये पुस्तके व खेळणी भाड्याने मिळतात. मुलांचे लहान वयातच मोबाईल विषयी वाढते आकर्षण हे अल्पवधीतच जास्त वेळ मोबाईल हाताळणे यामध्ये रूपांतर होत आहे लहान मुलांचे कार्टून, व्हिडिओज , युट्युब, गाणे इत्यादी बघतांना मुले एक ते दोन तास मोबाईल सोबत घालवतात लहान वयातच त्यांच्या डोळ्यांवर , मनावर मोबाईलचा परिणाम होतो .लहान वयापासून मोबाईलच्या वापराचे दुष्परिणाम होतात मुलांनी मोबाईल पासून दूर व्हावे त्याकरता त्यांची गुंतवणूक इतरत्र व्हावी या उद्देशाने त्यांना खेळणी खेळण्याची व पुस्तके वाचण्याची सवय लागावी करिता खेळणी व पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या लायब्ररीमध्ये असणारी खेळणी ही कृतिशील खेळणी या प्रकारातील आहे यामध्ये मुलांचे गुंतवणूक होऊन 20 ते 30 मिनिट पर्यंत मुले या खेळण्यांमध्ये गुंतून राहतात . येथे असणारी पुस्तके हे चित्र व त्यावर आधारित कथा या प्रकारातील असल्याने लहान मुलांना ती वाचना ची आवड निर्माण होते मुलांनी मोबाईल पासून दूर राहण्यासाठी त्यांना नेहमी नाविन्यपूर्ण खेळणी मिळावी असे अपेक्षित असते परंतु प्रत्येकच वेळी नवीन खेळणी देऊ शकत नाही करिता नाविन्यपूर्ण बाबी मिळणारा मोबाईल हेच त्यांचे साध्य बनत, हे घडू नये त्याकरिता नाविन्यपूर्ण खेळणी व नाविन्यपूर्ण पुस्तके उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही लायब्ररी लोकसेवेत सुरू करत आहोत आपल्या पाल्याच्या मोबाईल मुक्त जीवनासाठी एकदा या लायब्ररीला अवश्य भेट द्या ही विनंती. संचालिका 7385524865