01/09/2026
🏛️ *अमरावती महानगरपालिका, अमरावती*
*ULB Code : 802690*
♻️ *स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७*
🌿 *माझी वसुंधरा अभियान ७.०*
🗑️ *घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६*
📢 *जाहीर आवाहन*
🙏🚩 *पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२६*🚩🙏
# # # 🌱 चला, बाप्पाचे स्वागत करूया…
# # *निसर्गाच्या संवर्धनासह...!*
🪔 *१. शाडू मातीची मूर्ती वापरा*
PoP ऐवजी शाडू मातीची/ पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करा.
♻️ *२. कचऱ्याचे वर्गीकरण करा*
ओला कचरा, सुका कचरा व निर्माल्य वेगळे ठेवा.
🌸 निर्माल्य निर्माल्य कलशातच जमा करा.
🚫 *३. प्लास्टिक व थर्मोकॉल टाळा*
सजावटीसाठी कागद, कापड, फुले व नैसर्गिक साहित्याचा वापर करा.
🔇 *४. ध्वनी व वायू प्रदूषण टाळा*
अतितीव्र आवाजातील डीजे व फटाक्यांचा वापर टाळा.
🎶 पारंपरिक वाद्ये व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्या.
💧 *५. कृत्रिम विसर्जन कुंडाचा वापर करा*
नदी, तलाव व जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत यासाठी
🙏 गणेशमूर्तीचे विसर्जन *महानगरपालिकेच्या कृत्रिम विसर्जन कुंडातच* करा.
🏠 शक्य असल्यास घरच्या घरी बादली/कुंडीत विसर्जन करा.
🌱 आपली एक छोटीशी दक्षता अमरावती शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवू शकते...!
चला, ‘माझी वसुंधरा’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या अमरावती शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवूया.
🙏 *स्वच्छ अमरावती • स्वस्थ अमरावती • सुंदर अमरावती • हरित अमरावती* 🌿
EcoFriendlyGanesha
GaneshUtsav
EcoFriendlyGaneshotsav
SwachhataAbhiyan
SwachhBharat
SwachhBharatMission
MissionLiFE
MajhiVasundharaAbhiyan
SwachhMaharashtraMissionUrban
Ganpati2026
AmravatiMunicipalCorporation
ULB802690
MajhiVasundhara7
SwachhSurvekshan2026
SWMRules2026
GreenAmravati
CleanAmravati