28/07/2026
लढा अजून संपलेला नाही...
आता दिल्ली गाठायची आहे!
मा. नितीनजी गडकरी यांनी यवतमाळ–आर्णी–हिवरा–माहूर–किनवट या नव्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री मा. व्ही. सोमन्ना यांना अधिकृत पत्र देऊन मागणीची शिफारस केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय रेल्वे कृती समितीला वेळ देऊन सकारात्मक चर्चा देखील केली.
ही मोठी पायरी आहे... पण अंतिम मंजुरीसाठी दिल्लीमध्ये सातत्याने पाठपुरावा करणे अत्यावश्यक आहे.
केंद्रीय रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधीमंडळ लवकरच दिल्लीला जाणार आहे.
या लढ्याचा पुढील टप्पा खर्चिक आहे. त्यामुळे या जनआंदोलनाला आपल्या भागातील प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने आर्थिक सहकार्य करावे, असे नम्र आवाहन.
हा लढा कोणत्याही व्यक्तीचा नाही... आपल्या संपूर्ण भागाच्या भविष्यासाठी आहे.
"आपला छोटासा हातभार... आपल्या भागाच्या विकासाचा मोठा आधार!"
🙏🙏🙏🙏