Arvi City Times

Arvi City Times The page gives you complete update of Arvi and its sourrounding....
आर्वी शहर संतो की भूमि ....

06/08/2026

अमरावती के बेलोरा Airport पर निकला बहुत बड़ा अजगर...देखिए वीडीओ .


Part 7

खामगाव : विदर्भातील रेल्वे वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या भुसावळ–बडनेरा–वर्धा तिसरा व चौथा रेल्वेमार्ग प्रकल्पाला मोठी ग...
06/08/2026

खामगाव : विदर्भातील रेल्वे वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या भुसावळ–बडनेरा–वर्धा तिसरा व चौथा रेल्वेमार्ग प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, केंद्र सरकारने रेल्वे अधिनियम, १९८९ (सुधारणा अधिनियम, २००८) अंतर्गत भारताच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या प्रकल्पासाठी बुलढाणा, जळगाव, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत.
३१३ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे प्रकल्पामुळे विद्यमान मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रवासी गाड्यांचा विलंब कमी होण्यास मदत होईल, तसेच भविष्यात अधिक प्रवासी गाड्या, मेमू आणि वंदे भारतसारख्या आधुनिक गाड्या चालविण्याची क्षमता निर्माण होणार आहे.
सध्या भुसावळ–बडनेरा–वर्धा मार्गावर प्रवासी आणि मालगाड्यांची मोठी गर्दी असल्याने अनेक गाड्यांना आऊटरवर थांबावे लागते. तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होईल. मालवाहतुकीचा वेग वाढून विदर्भातील कापूस, सोयाबीन, संत्री तसेच औद्योगिक उत्पादन देशभर जलदगतीने पोहोचविणे शक्य होणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित होणार आहेत, त्यांनी राजपत्रातील सर्व्हे क्रमांक, ७/१२ उतारे आणि क्षेत्रफळाची माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत किंवा सूचना सादर करण्याची संधी उपलब्ध आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी, खामगाव विभाग यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांना सुनावणीदरम्यान स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

विज्ञापन* 🤷‍♂️ 🏦🏛️​➖➖➖➖➖➖➖💼 *व्यवसाय बढ़ाने का शानदार अवसर!* 💼➖➖➖➖➖➖➖​🛍️ *आर्वी के मुख्य मार्केट में 3 मंज़िला दुकान किरा...
05/08/2026

विज्ञापन* 🤷‍♂️ 🏦🏛️
​➖➖➖➖➖➖➖
💼 *व्यवसाय बढ़ाने का शानदार अवसर!* 💼
➖➖➖➖➖➖➖
​🛍️ *आर्वी के मुख्य मार्केट में 3 मंज़िला दुकान किराए से देना है!*
​✨ *शॉप की खूबियाँ:*
✔ *3 Floor Shop (3 मंज़िल पूरा सेट-अप)*
✔ *Ready Furniture (पूरी तरह से सजा हुआ)*
✔ *AC Fitted (फुल एयर कंडीशनर)*
✔ *Prime Location (ग्राहकों की भारी आवाजाही वाला क्षेत्र)*
​🏛️ *स्थान/पता:*👇👇
टाऊन हॉल के पास, सुनील एजेंसी के बिल्कुल पास,
आर्वी, जिला: वर्धा

​📞 *संपर्क करें* *(Contact):*
☎️ 7387033519
☎️ 9823441595
☎️ 8983773777

अमरावतीच्या जलप्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा; अपर वर्धा धरणाला दमदार पावसाची प्रतीक्षाअमरावती जिल्ह्यातील ५६ जलप्रक...
05/08/2026

अमरावतीच्या जलप्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा; अपर वर्धा धरणाला दमदार पावसाची प्रतीक्षा

अमरावती जिल्ह्यातील ५६ जलप्रकल्पांमध्ये सध्या ५०.४१ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वात मोठे अपर वर्धा धरण अद्याप अपेक्षित पातळीपर्यंत भरलेले नसून, मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रात चांगल्या पावसाची गरज आहे.
अपर वर्धा धरणात सध्या ५४.६२ टक्के उपयुक्त जलसाठा असून, चंद्रभागा आणि पूर्णा धरणांमध्ये पाणीसाठा वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमध्येही जलसाठ्यात वाढ झाली असून, आगामी काळातील पाणीटंचाईचा धोका काही प्रमाणात कमी झाला आहे.

04/08/2026
03/08/2026

Arvi News Update 🐍
*आर्वी में अलका टॉकीज परिसर से 7 फूट धामणसांफ को पकड़ा गया,रोड किनार झाड़ पर चढ़कर बैठी थी ,सर्फमित्र राम ओर साहिल द्वारा उसे झाड़ से सुरक्षित पकड़ जंगल में छोड़ा गया, कुछ दिनों से आस पास के लोगों को रोज दिख रही थी,रेलवे स्टेशन रोड की घटना* देखिए वीडीओ 👇👇

*Arvi City Times*💫
*सबसे पहले सबसे तेज*🌍

*विज्ञापन*🤷‍♂️ 🩺💁‍♀️

*सूर्योदय डायग्नोस्टिक सेंटर* 🩺🩻🩺

*​"सटीक स्वास्थ्य जानकारी, हमारी प्राथमिकता"*
*​अब आपके शहर आर्वी में, आधुनिक तकनीक के साथ सभी प्रकार की जांच उपलब्ध हैं। हम स्वास्थ्य सेवाओं में गुणवत्ता और सटीकता का भरोसा देते हैं।*
*​हमारी प्रमुख सेवाएँ:*👇👇
​✅ CT SCAN (सीटी स्कैन)
​✅ X-RAY (एक्स-रे)
​✅ SONOGRAPHY (सोनोग्राफी)
​हमें क्यों चुनें?
​🎯 सटीक निदान: उन्नत तकनीक के द्वारा।
​🛡️ विश्वसनीय सेवा: अनुभवी विशेषज्ञों की टीम।
​👥 मरीज का हित सर्वोपरि: आपके स्वास्थ्य की विशेष देखभाल।
​🕒 समय पर रिपोर्ट: त्वरित और भरोसेमंद परिणाम।
​📍 पता:
राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
साईं नगर, आर्वी।
​📞 संपर्क करें:
9422144936
*​"आपका स्वास्थ्य, हमारी जिम्मेदारी"*🩺





पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 14 स्थळांना तीर्थक्षेत्रांना 'क' वर्ग दर्जावर्ध्यात लोकशाहीर अण्ण...
03/08/2026

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 14 स्थळांना तीर्थक्षेत्रांना 'क' वर्ग दर्जा

वर्ध्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणार

वर्धा, दि. 2 : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील 14 देवस्थाने, यात्रास्थळे व तीर्थक्षेत्रांना 'क' वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर वर्धा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांसह खासदार अमर काळे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अरुण लखानी, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाचे स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय आणि सुमारे 300 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा शुभारंभ केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

'क' वर्गाचा दर्जा मिळालेल्या तीर्थक्षेत्रांमध्ये समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव (चौ.) येथील सद्गुरु जगन्नाथ बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, वर्धा तालुक्यातील नालवाडी येथील संत नरहरी महाराज देवस्थान ट्रस्ट, देवळी तालुक्यातील इंझाळा येथील महादेव मंदिर देवस्थान सेवा समिती, तळेगाव (टा.) येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थान, सावंगी (मेघे) येथील श्री महादेव मंदिर, बोरगाव (मेघे) येथील आई तुळजाभवानी (सुपारी माता) मंदिर, शिरपूर येथील संत पैगाजी महाराज देवस्थान, आलोडी येथील स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार परिसर, सेलू तालुक्यातील दोडकी येथील विठ्ठल-रुख्माई मारुती देवस्थान, आलोडी अंजनामाता चॅरिटेबल ट्रस्ट, महाकाळ येथील संत तुकडोजी महाराज देवस्थान संस्थान, आलोडी येथील पवनसुत हनुमान मंदिर सेवा मंडळ, म्हसाळा येथील श्री संत जगन्नाथ महाराज मंदिर सेवा समिती तसेच देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील विठ्ठल-रुख्माई देवस्थानांचा समावेश आहे.

या निर्णयामुळे संबंधित तीर्थक्षेत्रांमध्ये मूलभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून ग्रामीण भागाच्या विकासालाही गती मिळणार आहे. तसेच यामुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास, पर्यटनवृद्धी आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यास मोठी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नवीन वाहनांमुळे नागरीकांच्या सुरक्षेसोबत गुन्ह्याच्या तपासासाठी मदत हाईल     - पालकमंत्री डॉ. पंकज भोयरØ  पोलिस वाहन हस्...
02/08/2026

नवीन वाहनांमुळे नागरीकांच्या सुरक्षेसोबत गुन्ह्याच्या तपासासाठी मदत हाईल - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
Ø पोलिस वाहन हस्तांतरण कार्यक्रम

वर्धा, दि.1 : पोलिस विभागासाठी जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर करण्यात आलेल्या वाहनामुळे जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हे तपास करणे, गुन्हेगारावर आळा बसविण्यासाठी मदत होणार असून नवीन वाहनांमुळे पोलिसांना चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मनोबल उंचावेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पोलिस वाहन हस्तांतरण कार्यक्रमात केले.

पोलिस विभागाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून पोलिस विभागास प्राप्त झालेल्या वाहनाचे हस्तांतरण व फिर्यादीस मुद्देमाल जप्त करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे व पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

वर्धा पोलिस विभागासाठी नुकतीच फॉरेन्सिक लॅब मंजूर झाली असून सोबत राज्यात वर्धा येथे सायबर फॉरेन्सिक रिसर्च सेंटर सुध्दा मंजूर झाले आहे. लवकर सायबर फॉरेन्सिक सेंटर तयार करण्यात येणार असून यामुळे गुन्ह्याचा तपास करण्यास मदत होणार आहे. शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरामुळे वाहतुकीला होणारा अडथळा, अपघाता होण्याची शक्यता असते. यासाठी वाहतुक पोलीस व नगर पालिका प्रशासनानी लक्ष केंद्रीत करुन उपाययोजना कराव्यात. सध्या मोठया प्रमाणात सायबर गुन्हे वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असून पोलीसांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच युवकांमध्ये वाढलेले नशेचे प्रमाण कमी करण्यासाठी नशामुक्ती जनजागृती मोहिम राबवावी अशा सुचनाही पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यावेळी पोलीस विभागांना दिल्यात.

यावेळी विविध गुन्ह्यात फिर्यादीचे जप्त केलेले सोने, चांदी, वस्तू व रोख रक्कमेचे पालकमंत्री यांच्या हस्ते फिर्यादींना वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी, अंमलदार, पोलीस शिपाई, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी लाडेगाव, ता. आर्वी येथे आलेल्या चक्रीवादळामुळे गावातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झा...
01/08/2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी लाडेगाव, ता. आर्वी येथे आलेल्या चक्रीवादळामुळे गावातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांची छपरे उडून गेली, काही घरांच्या भिंती कोसळल्या तर घरातील जीवनावश्यक वस्तूंचीही मोठी हानी झाली.
आमदार सुमित दादा वानखेड़े यानी नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला, तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Address

Arvi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arvi City Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Arvi City Times:

Shortcuts

Share