Chhatrapati Sambhajinagar Smart City

Chhatrapati Sambhajinagar Smart City Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chhatrapati Sambhajinagar Smart City, Public Service, War Room, Babasaheb Ambedkar Research Centre, Aurangabad.

important update  # महत्त्वाची सूचना 📣
30/08/2026

important update # महत्त्वाची सूचना 📣

🚨अर्जेंट: महत्त्वाची माहिती *टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती,**समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली*छत्रपती संभाजीनगर, दि...
29/08/2026

🚨अर्जेंट: महत्त्वाची माहिती *टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती,*
*समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली*

छत्रपती संभाजीनगर, दि. २९(जिमाका)-समृद्धी महामार्ग लगत असणाऱ्या टाकळीवाडी ता. गंगापूर येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली असून खबरदारीचा उपाय म्हणून समृद्धी महामार्गा वरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यानची (३० किमी अंतर-हडस पिंपळ गाव ते माळीवाडा) वाहतूक धुळे सोलापूर महामार्गावरून वळविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी कळविले आहे.

आज सायं. ५ वा. सुमारास टाकळी वाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली. या घटनेची प्रशासनाने तात्काळ दखल घेत, त्वरित उपाययोजना सुरु केल्या. घटनास्थळी तात्काळ गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले. तसेच अग्निशमन यंत्रणा सज्ज करण्यात आली.

वाहतूक वळवली

तथापी, खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यान ३० किमी वरील वाहतूक धुळे सोलापूर महामार्गावरून वळवण्यात आली आहे. मुंबई कडुन जाणारे वाहने हे हडस पिंपळगाव इंटरचेंज वरून उतरून धुळे सोलापूर महामार्गावर जातील व माळीवाडा येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर येतील. नागपूर कडुन येणारी वाहने माळीवाडा इंटर चेंज वरून धुळे सोलापूर महामार्गावर येतील व हडस पिपंळगाव येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर येतील.

रहदारी धुळे सोलापूर महामार्ग वरून वळविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सांगितले.

दरम्यान गेल कंपनी च्या तज्ञानी दोन्हीही बाजू कडील व्हॉलव्ह बंद केले असून पाईप लाईन मधील दाब कमी होत आहे. लवकरच रहदारी सुरळीत होईल यासाठी प्रशासन अथक प्रयत्न करीत असून जिल्हाधिकारी व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

अधिक माहिती साठी समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष क्रमांक 1800 233 22 33 व
8181818155 वर संपर्क साधता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Heritage WalkStart point: Neher E Ambari Gomukh Opposite Hotel Taj Gatew...
29/08/2026

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Heritage Walk
Start point: Neher E Ambari Gomukh Opposite Hotel Taj Gateway
Date: Sunday 30 August 2026
Time: 7 am to 9 am

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हेरिटेज वॉक
सुरुवात: नहर ए अंबरी गोमुख, ताज गेटवे हॉटेल समोर
रविवारी ३१ ऑगस्ट २०२६
वेळ सकाळी ७-९

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हेरिटेज वॉक सुरुवात: नहर ए अंबरी गोमुख, ताज गेटवे हॉटेल समोर रविवारी ३१ ऑगस्ट २०२६वेळ सका...
29/08/2026

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हेरिटेज वॉक
सुरुवात: नहर ए अंबरी गोमुख, ताज गेटवे हॉटेल समोर
रविवारी ३१ ऑगस्ट २०२६
वेळ सकाळी ७-९

🥇 राज्यस्तरीय फेंसिंग स्पर्धेत पृथ्वीराज नलावडेची सुवर्ण कामगिरी! 🤺🏆परभणी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय फेंसिंग स्पर्धे...
22/08/2026

🥇 राज्यस्तरीय फेंसिंग स्पर्धेत पृथ्वीराज नलावडेची सुवर्ण कामगिरी! 🤺🏆

परभणी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय फेंसिंग स्पर्धेतील चाइल्ड (१० वर्षांखालील) गटात मनपा एन-११ शाळेचा विद्यार्थी पृथ्वीराज नलावडे याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. 🥇

Big moves for Mitmita Zoo! 🐾 Divisional Commissioner G. Sreekanth & Municipal Commissioner Amol Yedge are ensuring world...
21/08/2026

Big moves for Mitmita Zoo! 🐾 Divisional Commissioner G. Sreekanth & Municipal Commissioner Amol Yedge are ensuring world-class standards and Central Zoo Authority compliance for our upcoming Zoo. A major shoutout to Endurance Technologies’ Managing Director Anurag Jain and Director Priya Jain for joining hands with CSMC for tree plantation under CSR. Tourism and sustainability leveling up together! 🌿🐅

🚨 प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यामुळे जुना मोंढा येथील एका बेकरीवर ₹२५,०००/- दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांप...
08/08/2026

🚨 प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यामुळे जुना मोंढा येथील एका बेकरीवर ₹२५,०००/- दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीही याच बेकरीवर प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबद्दल दंड आकारण्यात आला होता. सर्व व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार आणि फेरीवाले यांना आवाहन करण्यात येते की, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री किंवा वितरण पूर्णपणे बंद करावे; अन्यथा यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येईल.

प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांची मनपा प्रियदर्शनी विद्यालयास सदिच्छा भेट! 🏫✨महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा व...
06/08/2026

प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांची मनपा प्रियदर्शनी विद्यालयास सदिच्छा भेट! 🏫✨
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची आणि गुणवत्तेची प्रशंसा केली. शाळेतील लेझीम व सिम्फनी बँड पथकाचे सादरीकरण आणि कॉम्प्युटर लॅबच्या कामाबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले! 👏📚
याप्रसंगी तुषार महाजन उपसचिव शालेय शिक्षण विभाग मुंबई आणि एम. जी. आरेसवड अव्वर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे,
मिपा संचालक प्रकाश मुकुंद ,विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ, प्राचार्य डायट डॉ.राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद श्रीमती अश्विनी लाटकर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. सतीश सातव , सहाय्यक शिक्षण संचालक सुनील पोलास, शिक्षण उपनिरीक्षक श्री भारत पालवे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

कचरा तुमचा, जबाबदारीही तुमचीच! 🛑✨छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल्स, मॉल्स, मॅरेज हॉल्स आणि मोठ्या संस्थांसाठी मनपाचे कडक...
06/08/2026

कचरा तुमचा, जबाबदारीही तुमचीच! 🛑✨
छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल्स, मॉल्स, मॅरेज हॉल्स आणि मोठ्या संस्थांसाठी मनपाचे कडक नियम. नियम मोडल्यास होणार दंडात्मक कारवाई! चला, एकत्र येऊन आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर बनवूया. 🌿

Address

War Room, Babasaheb Ambedkar Research Centre
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Sambhajinagar Smart City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category