G.Sreekanth, IAS

G.Sreekanth, IAS श्री. जी. श्रीकांत (आयएएस),
🏛️ विभागीय आयुक्त
📍 छत्रपती संभाजीनगर विभाग
🤝 जनसेवा | सुशासन | विकास

21/08/2026

मिटमिटा येथील झुलॉजिकल सफारी पार्कची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मा. श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी आज, दि. २० ऑगस्ट रोजी मिटमिटा येथे साकारल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित झुलॉजिकल सफारी पार्क परिसराचा प्रत्यक्ष दौरा करून संपूर्ण जागेची सविस्तर पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त मा. श्री. अमोल येडगे हे देखील उपस्थित होते.

दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सफारी पार्कच्या विस्तीर्ण जागेत प्रत्यक्ष फिरून प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंती, जलव्यवस्था आणि पर्यटकांसाठीच्या मूलभूत सुविधांसह सुरू असलेल्या सर्व विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असल्याने हे सफारी पार्क शहराच्या पर्यटनाला नवी ओळख देईल, या दृष्टिकोनातून विभागीय आयुक्तांनी सर्व कामे दर्जेदार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

वन्यजीवांची सुरक्षा आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या (CZA) मानकांचे काटेकोर पालन करत सर्व संबंधित विभागांनी योग्य समन्वयाने उर्वरित कामांना वेग द्यावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्नभारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री. संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या निमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, बलिदान आणि राष्ट्रसेवेच्या स्मृतींना उजाळा देत देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी., विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार, महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करूया.

#स्वातंत्र्यदिन

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!तिरंग्याच्या रंगात सारे भेद विसरून, एकतेचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रभक्तीचा...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तिरंग्याच्या रंगात सारे भेद विसरून, एकतेचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश मनामनात जागवूया.

भारतीय स्वातंत्र्य दिन हा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, बलिदान, संघर्ष आणि देशभक्तीचे स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांच्या अमूल्य योगदानामुळे आज आपण स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचा अभिमानाने अनुभव घेत आहोत.

चला, विकसित, सक्षम, स्वच्छ, समतामूलक आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचा संकल्प करूया.

समस्त देशवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

– श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.)
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग

#स्वातंत्र्यदिन

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांनी पुष...
14/08/2026

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राष्ट्रध्वज घडी करण्याची योग्य पद्धतभारतीय राष्ट्रध्वज हा आपल्या राष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान आणि एकात्मतेचे प्रतीक आहे....
14/08/2026

राष्ट्रध्वज घडी करण्याची योग्य पद्धत

भारतीय राष्ट्रध्वज हा आपल्या राष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत त्याची योग्य पद्धतीने घडी करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

राष्ट्रध्वज घडी करताना केशरी व हिरव्या पट्ट्यांचा भाग आतमध्ये येईल आणि मध्यभागी असलेले अशोकचक्र स्पष्टपणे दिसेल, अशा पद्धतीने घडी करावी. घडी केलेला राष्ट्रध्वज स्वच्छ हातांनी किंवा तळहातावर घेऊन योग्य ठिकाणी सन्मानपूर्वक ठेवावा.

चला, राष्ट्रध्वजाचा मान राखूया आणि ध्वजसंहितेचे पालन करूया.

– श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.)
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग

#राष्ट्रध्वज

नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचा आढावानक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र (WTP) ये...
14/08/2026

नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचा आढावा

नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र (WTP) येथे विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

शहरातील नागरिकांना शाश्वत, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

बैठकीत प्रकल्पातील पूर्ण झालेली कामे, प्रगतीपथावर असलेली कामे तसेच प्रलंबित कामांचा टप्पानिहाय आढावा घेण्यात आला. जलशुद्धीकरण केंद्रातील कामांची प्रगती, आवश्यक यंत्रसामग्री, तांत्रिक बाबी, जलवाहिनीचे काम, पाणी शुद्धीकरण क्षमता आणि प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने, वेळेचे काटेकोर नियोजन करून आणि गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता कामे पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

प्रत्येक टप्प्याची नियमित पाहणी करून प्रगती अहवाल सादर करावा, आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि संसाधनांचा प्रभावी वापर करावा, तसेच प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.

शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अधिक सक्षम आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

बैठकीस मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी, प्रकल्पाचे कंत्राटदार GVPR Engineers Limited कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला.

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी नियोजन, समन्वय आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी.

बिडकीनच्या विकासाला वेग; गावठाण हद्दवाढीसह रिंग रोडचा मार्ग मोकळाबिडकीनच्या वाढत्या लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाढत...
08/08/2026

बिडकीनच्या विकासाला वेग; गावठाण हद्दवाढीसह रिंग रोडचा मार्ग मोकळा

बिडकीनच्या वाढत्या लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दवाढ, रिंग रोड, सेवा रस्ता आणि वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांना गती देण्यात येणार आहे.

यासंदर्भात विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक टाऊनशिप येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बिडकीनजवळील टोलनाका योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर-पैठण मार्गावरील खड्डे आणि वाढते अपघात लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सेवा रस्ता, वाहतूक नियोजन आणि वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

बिडकीनची लोकसंख्या जवळपास एक लाखांपर्यंत पोहोचली असून, परिसरात मोठ्या औद्योगिक कंपन्यांचा विस्तार होत असल्याने वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील शहरी नियोजनावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

अवैध भूखंडविक्रीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, अंतिम आराखडा मंजूर होण्यापूर्वी भूखंड नोंदणी न करण्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच २०२० पूर्वी जमीन खरेदी केलेल्या पात्र नागरिकांच्या भूखंडांचे नियमानुसार नियमितीकरण करण्याबाबतही कार्यवाही केली जाणार आहे.

बिडकीनच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘ग्रोथ सेंटर’ चे काम युद्धपातळीवर सुरू असून, या संपूर्ण विकास प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

बैठकीला जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., आमदार मा. श्री. विलास भुमरे, सीएसएमआरडीएचे उपायुक्त श्री. लखनचंद चव्हाण यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नियोजनबद्ध विकास, सुरक्षित वाहतूक आणि औद्योगिक प्रगतीकडे बिडकीनची वाटचाल.

#बिडकीन

नाथसागर जलाशयाचे जलपूजन संपन्नपैठण येथील जायकवाडी धरण (नाथसागर) पूर्ण क्षमतेने भरल्याने आज नव्याने आलेल्या पाण्याचे विधि...
08/08/2026

नाथसागर जलाशयाचे जलपूजन संपन्न

पैठण येथील जायकवाडी धरण (नाथसागर) पूर्ण क्षमतेने भरल्याने आज नव्याने आलेल्या पाण्याचे विधिवत जलपूजन करून नारळ अर्पण करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. संजयजी शिरसाट साहेब यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी जलाशयातील पाणीसाठा व पाण्याच्या आवकेची पाहणी करण्यात आली.

याप्रसंगी विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी., मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे, पैठणचे आमदार मा. श्री. विलास बापू भुमरे पाटील, छत्रपती संभाजीनगरचे महापौर मा. श्री. समीर दादा राजुरकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते.

नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने मराठवाड्याच्या पाणीपुरवठा, शेती आणि समृद्धीसाठी नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

नाथसागर भरला… मराठवाड्याच्या समृद्धीला नवी आशा मिळाली!

#नाथसागर #जायकवाडीधरण #जलपूजन #मराठवाडा #छत्रपतीसंभाजीनगर #पैठण

08/08/2026

‘विकसित महाराष्ट्र व विकसित मराठवाडा’ संकल्पनेअंतर्गत विभागीय आढावा बैठक संपन्न

दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ‘विकसित महाराष्ट्र व विकसित मराठवाडा’ या संकल्पनेअंतर्गत सर्व प्रादेशिक विभाग प्रमुखांची महत्त्वाची आढावा बैठक विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या बैठकीत शासन स्तरावरील प्रलंबित विषय मार्गी लावणे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विभागीय पातळीवरील समन्वय अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच महावितरण वीज देयक थकबाकी या विषयाचाही सखोल आढावा घेण्यात आला.

विकासकामांना गती देण्यासाठी विभागीय स्तरावर अशा आढावा बैठका नियमितपणे घेण्यात येणार असून, योजनांची वेळेत व परिणामकारक अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

विकसित मराठवाड्यासाठी समन्वय, नियोजन आणि गतिमान अंमलबजावणी.

Address

Divisional Commissioner Office, Near Delhi Gate, Fazilpura, Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when G.Sreekanth, IAS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to G.Sreekanth, IAS:

Shortcuts

Share