06/08/2026
🙏 विशेष निमंत्रण 🙏
सप्रेम नमस्कार!
चर्मकार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करण्याचे व्रत आपण सर्वांनी अंगीकारले आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपणास हे विशेष निमंत्रण देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
जगतगुरू संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त (दि. २० फेब्रुवारी २०२७) संपूर्ण देशभरात जनजागृती व्हावी आणि समरसतेचा संदेश प्रत्येक समाजघटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने शासनाच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने मराठवाड्यातील चर्मकार समाजाच्या वतीने,
दि. ७ ऑगस्ट २०२६, शुक्रवार
सकाळी ९.०० वाजता
संत रविदास महाराज मंदिर, हनुमान मंदिर, ज्ञानेश्वर कॉलनी, मुकुंदवाडी येथून कलश पूजन करण्यात येईल. त्यानंतर भव्य रथ मिरवणूक मंदिर येथून हॉटेल एव्हॉन, भाजी मंडई मार्गे कासलीवाल गार्डन, एन-२ सिडको येथील सभास्थळी पोहोचेल.
त्यानंतर सकाळी १०.०० वाजता कासलीवाल गार्डन, एन-२ सिडको, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे "श्री गुरु रविदास समरसता संकल्प अभियान" अंतर्गत मा. भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते "कलश वितरण समारंभ" आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. श्री. अतुलजी सावे साहेब, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवतजी कराड साहेब, आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, मा.आमदार सुहास भाऊ शिरसाठ, आमदार संजयजी केनेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष मा. श्री. किशोर शितोळे साहेब, माजी महापौर भगवान बापू घडामोडे, महापौर समीरजी राजूरकर , सभापती अनिल भैय्या माकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, ज्येष्ठ नेते बन्सीलाल गांगवे मामा तसेच अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे....
या प्रेरणादायी कार्यक्रमास आपण कुटुंबीय, मित्रपरिवार व समाजबांधवांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र व आग्रहाची विनंती.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आपले स्नेहांकित,
आ. नारायण कुचे,
बदनापूर विधानसभा मतदारसंघ