23/08/2026
अनुसूचित जातीला केंद्रात १५% आरक्षण दिलेले असतांना महाराष्ट्रातील बीजेपी सरकार अनुसूचित जातीला १३% च आरक्षण देत आहे... आमच्या हक्काचे २% आरक्षण मनुवाद्यानी कमी केलेले असल्याने त्याची अगोदर पूर्तता करावी... या दोन टक्क्यात महार (बौद्ध), मातंग, चर्मकार यासह सर्वच ५९ जातीचे नुकसान केलेले आहे... या हरामखोरीच्या विरोधात अगोदर अनुसूचित जातीच्या सर्वच जातीच्या लोकांनी जाब विचारावा...!
तसेच अनुसुचित जमातीला केंद्रात ७.५% आरक्षण दिलेले असतांना महाराष्ट्रातील बीजेपी सरकारने त्यांचे सुद्धा ०.५% आरक्षण कमी केलेले आहे... ही हरामखोरी च्या विरोधात अनुसूचित जमातीच्या जाती सुद्धा जाब विचारतील काय...?
यानंतर इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांना केंद्रात २७% आरक्षण असतांना महाराष्ट्रातील बीजेपी सरकारने फक्त १९% च जागा देऊन त्यांचा ८% जागा कमी करुन अन्याय केलेला असताना ओबीसी आजही अशा सरकारला जाब विचारणे तर सोडा उलट आरक्षण संपविण्यासाठी याच लोकांना मत देऊन निवडून आणत आहेत... अशा लोकांना काय म्हणावे...?
पण आता EWS चे उदाहरण घेतले तर त्यांना केंद्रात १०% आरक्षण जसे दिले आहे त्यांना महाराष्ट्रात सुद्धा १०% आरक्षण दिलेले आहे... यातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांनी आपल्या हक्काचे आरक्षण हिरावून घेतल्या नंतर हा भामटा मुख्यमंत्री आमच्याच कॅटेगरी मधील जाती जाती मध्ये बांधणे लावण्याचे काम चालू केलेले आहे... या भट कारस्थानाला आमचा समाज बळी पडलेला असून त्याने त्याच्या समाजाला फायदा मिळावा यासाठी काडीमात्र तडजोड करायला तयार नाही... त्यातील हिंदुत्वाची वज्रमूठ आवळणाऱ्या लोकांना त्याच्यातील २% आरक्षण सुद्धा काढून द्यायला तयार नाही... पण अनुसूचित जाती मध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी मात्र हा तत्पर आहे...
ज्या लोकांनी हिंदुत्वाची वज्रमूठ मजबूत केली आहे अशा लोकांना ब्राह्मण मुख्यमंत्री याने त्यांना स्वतंत्र २% आरक्षण अतिरिक्त द्यावे त्या अगोदर अनुसुचित जातीचे आजपर्यंत न दिलेले २% आरक्षण अगोदर १५% करावे त्यानंतर काय झक मारायची ती मारावी... अशा भाषेत बोलण्याची वेळ ब्राम्हण मुख्यमंत्र्याने स्वतः आणलेली आहे... म्हणून आता आमच्या भावा भावा मध्ये भांडणे लावणाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे... त्यातही त्यांनी शिव्या खाण्याची तयारी करावी... उद्या मत मागायला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्याकडे याल तर त्यांच्या हक्काचे आरक्षण दिल्यावरच त्यांच्या दारावर यावे... आणि यांच्यासाठी मत मागायला येणाऱ्या दलालांना सुद्धा समाजाने धडा शिकवावा...
#सत्यजीत_साळवे