25/12/2025
🌿 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत 🌿
प्लास्टिक मुक्त गाव – शाळा अंतर्गत उपक्रम
📍 ग्रामपंचायत उटी बु., ता. औसा, जि. लातूर
ग्रामपंचायत उटी बु. यांच्या वतीने शाळा स्तरावर प्लास्टिक कचरा संकलन व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
🎁 प्लास्टिक कचरा संकलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना
ग्रामपंचायतकडून पेन बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
♻️ प्लास्टिक वापर टाळा
🌱 स्वच्छ व पर्यावरणपूरक गाव घडवा
🌿 प्लास्टिकमुक्त उटी बु. – स्वच्छ उटी बु. हीच आमची शपथ! 🌿
अधिक माहितीसाठी भेट द्या 👉
🌐 www.gputibk.com