उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुर

  • Home
  • India
  • Badlapur
  • उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुर

उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुर उल्हास नदी आणि नाल्यावर होणार्‍या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम विरोधात लढा.
माझ शहर!! माझा अभिमान!!

उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुरआंदोलनाला यश; अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटींचा दंडहेंद्रेपाडा, 23 एप्रिल 2025 – उल...
20/05/2025

उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुर

आंदोलनाला यश; अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटींचा दंड

हेंद्रेपाडा, 23 एप्रिल 2025 – उल्हास नदीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत भराव, संरक्षण भिंतीचे बांधकाम व नदीपात्रातील अतिक्रमण प्रकरणी उल्हास नदी बचाव समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. हेंद्रेपाडा येथील सत्संग विहार समितीने नदीपात्रात अनधिकृतपणे भराव टाकण्याचे आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू केले होते.

या अतिक्रमणाची माहिती मिळताच बचाव समितीने महसूल, पोलीस आणि पालिका प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्वरित कृती करत प्रशासनाने संबंधित काम थांबवले आणि वापरात असलेल्या जेसीबी, पोकलेन मशिनरी सील केली होती.

याप्रकरणी तहसीलदार मा. अमित पुरी यांनी ठोस कार्यवाही करत सत्संग विहार समितीवर १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्या या निर्णयाचे उल्हास नदी बचाव समितीने मनःपूर्वक कौतुक करत त्यांचे आभार मानत आहोत

तसेच सर्व पत्रकार बांधव यांनी महत्व पूर्ण सहकार्य केले यांचे सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद.🙏🙏🙏🙏
#आपले_शहर_आपला_अभिमान



उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुर  आयोजित. नदी आईच्या जलपूजनाचा कार्यक्रमआपल्या शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात अत...
15/05/2025

उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुर आयोजित.

नदी आईच्या जलपूजनाचा कार्यक्रम

आपल्या शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आपल्या येथे सत्संग विहार च्या कृपेने मातीचा भराव घातला आहे. तरी या बाबत प्रशासनाने कोणतीही कारवाही न केल्याने आभार व्यक्त करण्यासाठी आणि देवाला साकडे घालून हे गंगा माई तूच आम्हाला सांभाळ आता, आमच्या मुलाबाळांचे संरक्षण कर म्हणून आम्ही सर्व नागरिकांनी आपल्या नदी आईच्या जलपूजनाचा आयोजित केला आहे.

कार्यक्रम वेळ : शुक्रवार दि. 16 मे 2025 रोजी सकाळी 9.30 ते 5 पर्यन्त

आपले स्वागतोत्सुक
उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुर

या प्रतिकात्मक पूजनाला आम्ही पुढील खास पाहुण्यांना जाहीर निमंत्रित करित आहोत, त्यांनी लोकहितासाठी नक्की भेट देऊन, जनसामान्यांचे प्रश्न समजून घ्यावेत!

#आपली_उपस्थिती_प्रार्थनीय_आहे

मा. उप अभियंता साहेब पाटबंधारे विभाग ठाणे

मा. तहसीलदार साहेब अंबरनाथ

मा. मुख्याधिकारी साहेब बदलापूर

मा. तलाठी मॅडम बदलापूर

मा. मंडळ अधिकारी साहेब

#आपले_शहर_आपला_अभिमान



बदलापुर हेंद्रेपाडा परिसरातील सत्संग विहार या ट्रस्ट कडून उल्हास नदीत अनधिकृतपणे भराव टाकून बांधकाम सुरू केले आहे. यामुळ...
13/05/2025

बदलापुर हेंद्रेपाडा परिसरातील सत्संग विहार या ट्रस्ट कडून उल्हास नदीत अनधिकृतपणे भराव टाकून बांधकाम सुरू केले आहे. यामुळे सभोवतालच्या परिसरात पावसाळय़ात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन येथे राहणार्‍या रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागु शकतो.

या विरोधात उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापूर यांच्या मार्फत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेला सामान्य जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.

याची विविध वृत्तपत्रांनी सुद्धा नोंद घेतली.

#आपले_शहर_आपला_अभिमान


Address

बदलापुर
Badlapur
421503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उल्हास नदी व नाले बचाव समिती, बदलापुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category