Mahavitaran Baramati Zone

Mahavitaran Baramati Zone Zone office of Maharashtra State Electricity Distribution Company Ltd.

कंदिलाच्या मंद प्रकाशापासून बल्बच्या उजेडापर्यंत, आणि बल्बपासून ऊर्जा कार्यक्षम एलईडी दिव्यांपर्यंत... #प्रकाशाचीप्रकाशय...
26/08/2026

कंदिलाच्या मंद प्रकाशापासून बल्बच्या उजेडापर्यंत, आणि बल्बपासून ऊर्जा कार्यक्षम एलईडी दिव्यांपर्यंत...

#प्रकाशाचीप्रकाशयात्रा #तंत्रज्ञानाचीवाटचाल #बदलतेतंत्रज्ञान #प्रकाशाचाप्रवास #ऊर्जाकार्यक्षमता #ऊर्जाबचत #नवीनतंत्रज्ञान #प्रगतीचाप्रकाश #वीजआणिविकास #अखंडप्रकाश #महावितरण

26/08/2026
बारामती परिमंडळात वीजचोरी प्रकरणी १७५९ जणांवर कारवाई२ कोटी ७२ लक्ष रूपयाचा दंड बारामती परिमंडळात वीजचोरी विरोधात धडक मोह...
26/08/2026

बारामती परिमंडळात वीजचोरी प्रकरणी १७५९ जणांवर कारवाई
२ कोटी ७२ लक्ष रूपयाचा दंड
बारामती परिमंडळात वीजचोरी विरोधात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. गत जुलै ते दि.१९ ऑगस्ट अखेर वीजचोरीप्रकरणी १७५९ जणांवर कारवाई करून २ कोटी ७२ लक्ष रूपये दंड आकारण्यात आला आहे. त्यात सोलापूर मंडळात १०८१ जणांवर कारवाई करून १ कोटी ५९ लक्ष रूपयांचा दंड , सातारा मंडळात २४५ जणांवर कारवाई करून २७ लक्ष रूपयांचा दंड तर बारामती ग्रामीण मंडळात ४३३ जणांवर कारवाई करून ३ ८६ लक्ष रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम १३५ नुसार अनधिकृत जोडणी करणे, मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटरची अचूक नोंदणी होऊ नये यासाठी उपकरण किंवा इतर पद्धतीचा वापर करणे, छेडछाड केलेल्या मीटरद्वारे वीज वापरणे यासारख्या कृती वीजचोरीच्या कक्षेत येतात. अशा गुन्ह्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. वीजचोरीच्या प्रकरणात संबंधित वीज भारानुसार प्रथम व त्यानंतरच्या दोषसिद्धीच्या वेळी दंडाच्या तरतुदीही लागू होतात. त्यामुळे वीजचोरी ही आर्थिकदृष्ट्याही गंभीर बाब ठरू शकते. तरी थोड्याशा लोभापायी वीजचोरी करू नका, कारण आजचा छोटासा फायदा उद्या मोठ्या कायदेशीर कारवाई आणि दंडाला कारणीभूत ठरू शकतो. वीजचोरीची कारवाई आर्थिकदृष्ट्या तर महागात पडतेच, पण त्यासोबत होणारा मानसिक त्रासही परवडणारा नसतो.
वीजचोरीस मदत करणाऱ्यांवरही कारवाई :
कलम १५० नुसार वीजचोरीला प्रोत्साहन देणे, मदत करणे किंवा अशा कृतीस सहकार्य करणे कायद्याने गुन्हा आहे. गुन्ह्यास प्रवृत्त किंवा मदत करणाऱ्या व्यक्तीवर संबंधित गुन्ह्याच्या शिक्षेप्रमाणे कारवाई होऊ शकते. तसेच वीजवाहिन्या, विद्युत साहित्य किंवा मीटरची चोरी करणे हा विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १३६ अंतर्गत स्वतंत्र गुन्हा आहे. त्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे. कलम १५१-ब अंतर्गत कलम १३५ ते १४० तसेच कलम १५० मधील गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र असल्याची तरतूद आहे. कायद्यातील कलम १५२ नुसार काही परिस्थितींमध्ये वीजचोरीच्या गुन्ह्याचे तडजोडीने निस्तारण करण्याची तरतूद आहे.
वीजचोरीचे सामाजिक दुष्परिणाम:
वीजचोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होते तसेच विद्युत यंत्रणेवरअनधिकृत भार पडून वीजपुरवठ्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता प्रभावित होते. अनधिकृत जोडण्यांमुळे विद्युत अपघात, आग आणि जीवितहानीचा गंभीर धोका निर्माण होतो. तरी वीजचोरी करू नका, वीजचोरीला प्रोत्साहन किंवा सहकार्य करू नका. अनधिकृत वीजजोडणी अथवा वीजचोरीची माहिती असल्यास ती संबंधित महावितरण कार्यालयास कळवावी, असे आवाहन आहे.

25/08/2026

क्रीडापटूंच्या स्वप्नांना नवे बळ!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक रकमेत भरीव वाढ करत नॅशनल गेम्स, खेलो इंडिया तसेच दिव्यांगांच्या ६ स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.

#महाराष्ट्र

महावितरणच्या विद्युत यंत्रणेवर होर्डिंग्ज, जाहिरात फलक, बॅनर व पोस्टर्स लावू नयेत--महावितरणचे आवाहन महावितरण कंपनीच्या व...
25/08/2026

महावितरणच्या विद्युत यंत्रणेवर होर्डिंग्ज, जाहिरात फलक, बॅनर व पोस्टर्स लावू नयेत--महावितरणचे आवाहन

महावितरण कंपनीच्या विद्युत खांब, रोहित्रे, वीजवाहिन्या, डीपी स्ट्रक्चर, फिडर पिलर, उपकेंद्र परिसर तसेच अन्य विद्युत यंत्रणेवर अनधिकृतपणे होर्डिंग्ज,जाहिरात फलक,बॅनर, पोस्टर्स, स्टिकर्स अथवा अन्य प्रचार साहित्य लावू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

विद्युत खांब, रोहित्रे व इतर वीज यंत्रणा जाहिरातींसाठी वापरणे धोकादायक व नियमबाह्य-

वीज खांब किंवा अन्य विद्युत यंत्रणेवर जाहिरात साहित्य लावण्यासाठी तार किंवा दोर बांधणे, लोखंडी फ्रेम बसविणे अथवा इतर कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केल्यास विद्युत यंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच संबंधित व्यक्ती तसेच वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः पावसाळ्यात बॅनर, पोस्टर्स किंवा फ्लेक्स वाऱ्यामुळे विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. अशा घटनांमुळे शॉर्टसर्किट, वीजपुरवठ्यातील व्यत्यय, विद्युत अपघात तसेच जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो. महावितरणच्या वीज यंत्रणेवर अनधिकृत जाहिरात साहित्य आढळल्यास ते संबंधित यंत्रणेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हटविण्याची कार्यवाही करण्यात येऊ शकते.

विद्युत यंत्रणा ही जाहिरातीसाठीची जागा नाही

जाहिरातदार, संस्था, व्यावसायिक आस्थापना तसेच नागरिकांनी जाहिरात व प्रचारासाठी अधिकृत आणि सुरक्षित जागांचाच वापर करावा. विद्युत यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचे साहित्य लावू नये तसेच असे साहित्य लावताना कोणी आढळल्यास नागरिकांनी संबंधित महावितरण कार्यालयास माहिती द्यावी. आपली सुरक्षितता हीच महावितरणची प्राथमिकता आहे. विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि अनधिकृत जाहिरातींना आळा घाला.

कायदेशीर कारवाईचा इशारा

यापुढे महावितरणच्या विद्युत पायाभूत सुविधांवर अनधिकृतपणे होर्डिंग्ज, जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर्स, स्टिकर्स अथवा अन्य प्रचार साहित्य लावल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायदे, नियम व विनियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महावितरणने दिला आहे. ही सूचना विद्युत अधिनियम, 2003 तसेच केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधीचे उपाय) विनियम, 2023 मधील विनियम क्र.14 यांच्या अनुषंगाने देण्यात येत आहे. नागरिक आणि विद्युत वितरण यंत्रणेची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी सर्व संबंधितांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------------------------

25/08/2026

देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची 1 सप्टेबर रोजी निवड
सातारा दि. 25 – राज्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी प्राप्त अर्जांची लॉटरी पध्दतीने निवड दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वा. सातारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकरी कार्यालयातील बळीराजा सभागृहात करण्यात येणार आहे. अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
00000

Address

Urja Bhavan
Baramati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahavitaran Baramati Zone posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share